विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांच्या नावाची घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: एकनाथ शिंदे आणि भाजपने आज सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यानंतर सर्व नेत्यांनी ठरावावर भाषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) देखील जोरदार फटकेबाजी केली आहे. त्याचबरोबर विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या अभिनंदन प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवारांचे अभिनंदन केले आहे.

ADVERTISEMENT

विरोधी पक्षनेता हा लोकांची न्यायबाजू मांडत असतो आणि लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवत असतो. अजित पवाराच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना एकनाथ शिंदे म्हणाले ”सभागृहात लोकशाहीचा परिणाम पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी चार वेळा उपमुख्यमंत्री पद तर अर्थमंत्री पद सांभाळलेले आहे.” असे शिंदे म्हणाले.

अजित पवार यांनी ७ वेळा बारामतीचे आमदार म्हणून काम केले आहे. त्यांनी बारामतीचे विकास मॉडेल विकसीत केले. अजित पवार यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा अजित पवार यांच्यासमोर अनेक दिग्गज नेते होते. मात्र शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वमान्य नेतृत्व होण्याची किमया अजित पवारांनी केली आहे. आम्ही ७२ तासांचे सरकारमधील सहकारी देखील होतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT