Babri Demolition: ‘मिंधे जे सत्तेसाठी चाटत बसले, त्यांनी…’, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य जिव्हारी, ठाकरे बरसले
Uddhav Thackeray criticizes Bjp: बाबरी मशिदीवरून बाळासाहेबांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे हे प्रचंड संतापले असून त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
मुंबई: ‘बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि शिवसेनेचा (Shiv Sena) बाबरी (Babari) पाडण्याशी काहीही संबंध नव्हता’, असं विधान भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केल्यानंतर शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (11 एप्रिल) तात्काळ ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद बोलावून भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील घणाघाती टीका केली आहे. (babri demolition after chandrakant patil statement uddhav thackeray criticizes bjp and cm shinde)
ADVERTISEMENT
बाबरी मशिद जेव्हा पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेबांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली. पण असं असताना भाजपकडून मुद्दाम अशी वक्तव्य केलं जात असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद जशीच्या तशी…
‘गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या आठवणीतीली खंदकातून बाहेर पडले. असे बाबरीच्या आठवणीच्या खंदकातून बरेच उंदीर आता बाहेर पडू लागले आहेत. पण संतापजनक गोष्ट ही आहे की, ज्यावेळेला ही बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळात लपले होते. एकही बाहेर यायला तयार नव्हते. अगदी आपले माननीय पंतप्रधानसुद्धा बांगलादेशच्या युद्धात म्हणजे सत्याग्रहात सहभागी होते. पण बाबरीच्या आंदोलनात कदाचित ते हिमालयात असतील ते मला माहित नाही. पण त्यांचंही नाव कुठे आलेलं नव्हतं. तेव्हाचे भाजपचे.. उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी त्यांनी अंगलट येऊ नये यासाठी जाहीर केलं होतं की, बाबरी पाडण्यामध्ये भाजप वैगरे कोणी नाही. हे काम असेल तर शिवसेनेच केलं असेल.’
हे वाचलं का?
‘तेव्हा बाळासाहेब एवढे चिडले की.. हा शब्द सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबाबत वापरलाय. म्हणून मी वापरतोय.. बाळासाहेब म्हणाले.. हे कसलं नपुंसक नेतृत्व म्हणे..’
अधिक वाचा- ‘बाबरी पाडण्याशी बाळासाहेबांचा, शिवसेनेचा संबंध नाही’, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
‘आता हे सगळे जणं हळूवारपणाने बिळातून बाहेर येत आहेत. कोणी शाळेच्या सहलीला गेले होते त्या वयात आणि सांगतायेत की माझ्या आजूबाजूने गोळ्या गेल्या होत्या.. कोण म्हणतं या तुरुंगात होतं.. त्या तुरुंगात होतो.. मग इतके वर्ष का गप्प होतात?’
ADVERTISEMENT
‘भाजपकडे कधीही शौर्य नव्हतं.. मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या दंगली झाल्या तेव्हा शिवसेना सत्तेत नव्हती. त्यावेळी मुंबई ही शिवसैनिकांनी वाचवली. गुजरात, अहमदाबादमध्ये घडलं त्यात पोलिसांचा वापर केला गेला.’
ADVERTISEMENT
‘आता प्रश्न असा राहतो की.. जे काही मिंधे.. मी मुख्यमंत्र्यांना बोलत नाही. राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांचा मी अपमान करू इच्छित नाही.. कारण ही दोन्ही पदं ही फार मोठी आहेत. पण आमच्याकडे मिंधे.. सत्तेसाठी लाचर होऊन लाललोटेपणा करत बाळासाहेबांचे विचार यांनी सोडले..’ॉ
अधिक वाचा- एकनाथ शिंदे यांना हा दावा मान्य आहे? नसेल तर…; संजय राऊतांचा चॅलेंज
‘एक त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे.. नाहीतर मिंध्यांनी स्वत: पदाचा राजीनामा दिला पाहिजे. नाहीतर आता हे कोणाला जोडे मारणार आहेत? की, स्वत:च जोड्याने आपलं थोबाड फोडून घेणार आहेत. कारण बाळासाहेबांचा एवढा मोठा अपमान केवळ सत्तेसाठी… काय चाटायचं असेल ते तुमचं तुम्ही चाटा.. आम्ही काय बघायला येत नाही.’
Uddhav Thackeray Live : Babri Masjid वरून Eknath Shinde यांचा राजीनामा मागणार? | Chandrakant Patil https://t.co/QIS0IFPqog
— Mumbai Tak (@mumbaitak) April 11, 2023
‘पण एवढं बोलल्यानंतर बाळासाहेबांचं नाव घेऊ नका.. हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. ज्या एका मस्तीत चंद्रकांत पाटील बोलतायेत तर त्यांनी आडवाणीची मुलाखत ऐकावी.. त्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की, जे लोकं घुमटावर चढले होते ते मराठी बोलणारे होते. ते प्रमोद महाजन किंवा कोणाचं ऐकायच्या मानसिकतेत नव्हते. आता हे नागोबा.. नागोबाही मोठा आहे.. हे उंदीर श्रेय घ्यायला बघत आहेत.’
‘एक तर मिंध्यांनी कल्याणमध्ये नाटक केलं होतं.. माझ्यामोर कल्याण महापालिका निवडणुकीत.. की, भाजप शिवसैनिकांवर जो अन्याय करतोय.. तो मला बघवला जात नाही.. म्हणून मी माझा राजीनामा तुमच्या हातात देत आहे. त्यांना तेव्हा माहित होतं..’
अधिक वाचा- “अरे भास्कर… आता बस कर…”, चित्रा वाघ भास्कर जाधवांवर का संतापल्या?
‘मात्र, भाजप किंवा भरकटलेला जनता पक्ष जो काही बाळासाहेबांचा अपमान करतोय. त्यांच्यासोबत तुम्ही त्यांचे किती दिवस तळवे चाटत राहणार हे पहिले सांगा… तुमची शिवसेना हे पवित्र नाव उच्चारण्याची तुमची लायकी नाही.’
‘मिंधे जे सत्तेसाठी चाटत बसले आहेत त्यांनी भूमिका घेतली पाहिजे की, अशा लोकांसोबत ते राहणार आहेत का? राहणार असतील तर त्यांनी शिवसेना, बाळासाहेबांचं नाव घेऊ नये.’
‘चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करावी.. जे बसलेले आहेत मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेबांचे विचारवाले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे..’
अधिक वाचा- ‘त्यांचा राम…’, ठाण्यात बाळासाहेब थोरातांनी एकनाथ शिंदेंवर चढवला हल्ला
‘मी तर मानतो ही भाजपची चाल आहे.. हळूहळू त्यांना बाळसाहेबांचं महत्त्व लोकांच्या मनातून कमी करायचं आहे. ज्यांच्याकडे कर्तृत्व नसतं त्यांना चोरीची गरज लागते.’
‘मला असं वाटतं की, जे मनावर ओझं ठेवून जे दगड बसवलेला आहे तो आता जड व्हायला लागलाय.. तो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. अशी परिस्थिती भाजपच्या इथल्या नेतृत्वाची झाली आहे.’ अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT