MLC Election Result: BJPने कोकणात मविआला लोळवलं, म्हात्रे ठरले जायंट किलर!
Konkan Teacher Constituency Result: नवी मुंबई: महाराष्ट्रातील (Maharashtra) 5 विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीचा (Vidhan Parishad Election Result) पहिला निकाल हाती आला असून त्यात भाजपने (BJP) अनपेक्षितरित्या महाविकास आघाडीला (MVA) धक्का दिला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात (Konkan Teacher Constituency) भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला […]
ADVERTISEMENT
Konkan Teacher Constituency Result: नवी मुंबई: महाराष्ट्रातील (Maharashtra) 5 विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीचा (Vidhan Parishad Election Result) पहिला निकाल हाती आला असून त्यात भाजपने (BJP) अनपेक्षितरित्या महाविकास आघाडीला (MVA) धक्का दिला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात (Konkan Teacher Constituency) भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. (bjp dnyaneshwar mhatre gave a shock to mva by winning unexpectedly in konkan teacher constituency)
ADVERTISEMENT
पहिला निकाल भाजपच्या बाजूने
कोकण शिक्षक मतदारसंघात शिंदे गट आण भाजपचे उमेदवार असलेल्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मोठा उलटफेर घडवून आणला आहे. शेकापचे उमेदवार असलेल्या बाळाराम पाटील यांना पराभूत करण्याची किमया ज्ञानेश्वर पाटलांनी केली आहे. महाराष्ट्रातील पाच विधान परिषद मतदारसंघात निवडणूक पार पडली होती. ज्यापैकी पहिला निकाल हा कोकण शिक्षक मतदारसंघाचा हाती आला आहे.
विधान परिषद निवडणूक 2023: पाच मतदारसंघात कोण कोणाला भिडणार?
हे वाचलं का?
पहिल्याच फेरीत केला कोटा पूर्ण
या निवडणुकीत पसंतीक्रम असल्याने त्याचा निकाल कोटा पद्धतीने ठरवला जातो. त्यानुसार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्याच फेरीत पहिल्या पसंतीचा कोटा मिळविल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे.
या मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील आणि महायुतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात थेट लढत होती. यावेळी ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, मतदारांनी ज्ञानेश्वर म्हात्रेंना भरभरून मतदान केल्याने त्यांचा पहिल्या फेरीतच एकतर्फी विजय झाला.
ADVERTISEMENT
या विजयामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजपचं खातंही उघडलं आहे तर महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
विधान परिषद: सत्यजीत तांबेंना भिडणारी ‘वाघीण’; कोण आहेत शुभांगी पाटील?
ज्ञानेश्वर म्हात्रेंना तब्बल 20 हजारांहून अधिक मतं
या निवडणुकीत एकूण 35 हजार 700 वैध मतं होती. ज्यापैकी ज्ञानेश्वर म्हात्रेंनी 20648 पहिल्या पसंतीची मतं मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे.तर बाळाराम पाटील यांना अवघी 9500 मतं मिळाल.
पसंती क्रमाच्या सूत्रानुसार जो कोटा होता तो पहिल्याच फेरीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT