संजय राऊतांकडून ‘कसिनो’तला फोटो ट्वीट, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
संजय राऊत यांनी कसिनोतला (casino) एक फोटो शेअर करून भाजपला डिवचलं होतं. कसिनोतल्या या फोटोवरून राजकारण तापले असतानाच आता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्वत: समोर येऊन यावर खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
Sanjay Raut vs Chandrashekhar Bawankule BJP vs Shivsena UBT Twitter War : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राऊत यांनी कसिनोतला (casino) एक फोटो शेअर करून भाजपला डिवचलं होतं. या आरोपावर उत्तर देताना भाजपकडूनच संबंधित व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याची पुष्ठी केली होती. कसिनोतल्या या फोटोवरून राजकारण तापले असतानाच आता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्वत: समोर येऊन यावर खुलासा केला आहे. (chandrashekhar bawankule clarification on casino photo sanjay raut tweet aditya thackeray bjp vs ubt shivsena war maharashtra politics)
ADVERTISEMENT
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
राऊतांनी शेअर केलेल्या त्या फोटोवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर असल्याचे सुरुवातीला बावनकुळे सांगतात. तसेच या हॉटेलच्याच ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो आहे.त्यामुळे जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो, त्यावेळी कुणीतरी काढलेला हा फोटो असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे स्पष्ट करतात.
हे ही वाचा : Crime: प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टवरच प्रियकराने झाडली गोळी!
मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे. pic.twitter.com/yzqdrmFh0Y
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 20, 2023
हे वाचलं का?
संजय राऊतांच्या ट्वीटमध्ये काय?
खंर तर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर एक फोटो ट्वीट केला होता. हा फोटो मकाऊतील कसीनोचा होता. या फोटोच्या कॅप्शनला, ‘महाराष्ट्र पेटलेला आहे…आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है…, असे लिहून संजय राऊतांनी सस्पेन्स कायम ठेवला.
महाराष्ट्र पेटलेला आहे…
आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत.
फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है…@BJP4Maharashtra @AmitShah @AUThackeray @Dev_Fadnavis pic.twitter.com/cfhswYn7Zx— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
ADVERTISEMENT
या ट्विटच्या लगोलग राऊतांनी आणखीण एक ट्वीट केले. ज्यामध्ये राऊतांनी मुक्काम पोस्ट मकाऊ असे लिहत कसीनोचा पत्ताच सांगितला. आणि कसीनोत संबधित व्यक्तीने 3.50 कोटी रूपये जुगारात उडवल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगितल्याचे राऊतांनी म्हटले. तसेच पुढे राऊतांनी हिंदुत्ववादी महाशय असल्याची ओळख सांगत सस्पेंन्स आणखीणच वाढवला. आणि खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? असे म्हणत राऊतांनी भाजपला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, संजय राऊतांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये संबंधित नेत्याचे नाव कुठेच घेतले नव्हते. फक्त हे ट्वीट भाजपला टॅग करण्यात आले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा :ICC World Cup Playing 11 : कमिन्सला डच्चू, टीम इंडियाचा डंका! ‘या’ 6 भारतीय ICC च्या संघात
19 नोव्हेंबर
मध्यरात्री
मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine.
साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात.
हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे?
ते तेच आहेत ना?@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @AmitShah pic.twitter.com/XlScC63h2Q— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
भाजनकडूनच नेत्याच नावच जाहिर
राऊतांनी टाकलेल्या या आरोपांच्या जाळ्यात उत्तर देताना मात्र भाजप फसली आणि नेत्याची नावच जाहीर करून मोकळी झाली. भाजपने राऊतांना ट्वीट करून उत्तर देताना ट्वीटमध्ये म्हटले की,आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते तिथला हा परिसर असल्याचे सांगितले. तसेच ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही, असा प्रतिहल्लाही भाजपाने राऊतांवर केला. तसेच आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणती विस्की आहे? असा सवाल भाजपाने राऊतांना करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला.
आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत.
ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर.
असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ @rautsanjay61 , आदित्य… pic.twitter.com/TGCTOeNpYx— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 20, 2023
फॅमिली चिनी आहे का?
भाजपने दिलेल्या उत्तरावर आता राऊतांनी पुन्हा हल्ला चढवला आहे. राऊतांनी ट्वीट करत म्हटलं की, तर म्हणे..फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत..जाऊ द्या. त्यांची फॅमिली चिनी आहे का? असा सवाल राऊत यांनी भाजपला पुन्हा घेरलं. आणि जर कधीच जुगार खेळले नाहीत..मग टेबलावर काय मारुती स्तोत्र आहे का? असा रोखठोक सवालचं केला. झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय! जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, असे म्हणत राऊंतानी भाजपला थेट इशाराच दिला.
ते म्हणे..
फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या.
त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का?
ते म्हणे..
कधीच जुगार खेळले नाहीत..
मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का?
जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल!
झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!@BJP4Maharashtra… pic.twitter.com/aIjd3eJTO0— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT