Chandrashekhar Bawankule: “मोदींवर तुटून पडण्यासाठी श्वापदांची टोळी”
India alliance meeting mumbai : मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन बैठक आहे. या बैठकीचे आयोजन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. यावरून आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT

India alliance Mumbai : इंडिया आघाडीतील पक्षांची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने विरोधकांकडून शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. तर दुसरीकडे भाजपने विरोधकांवर टीकेचे बाण डागले आहेत. इंडिया आघाडीला घमेंडियाची बैठक असं संबोधत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्ला चढवला आहे.
पाटणा, बंगळुरूनंतर आता इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीआधीच विरोधकांनी आघाडीचा लोगो जारी केला. तसेच या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, इंडिया आघाडीच्या या बैठकीवर भाजपने टीका केलीये. चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, “मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला तुम्ही ‘गरूड झेप’ म्हणत आहात ती गरुड झेप नाही. नरेंद्र मोदीजी यांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांची टोळी आहे.”
हेही वाचा >> PM पदासाठी आघाडीचा संभ्रम… INDIA बैठकीत ‘या’ 8 महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा!
“राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली. कोरोना काळात कोट्यवधीची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत”, असे म्हणत बावनकुळे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरलं आहे.










