MLC Election : भाजपच्या विजयात CM शिंदेंचा बालेकिल्ला ठरला गेम चेंजर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) विधान परिषदेच्या पाच जागांपैकी पहिला निकाल हाती आला आहे. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कोकण शिक्षक मतदारसंघात बाजी मारली आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. (bjp dnyaneshwar mhatre gave a shock to mva by winning unexpectedly in konkan teacher constituency)

ADVERTISEMENT

या निवडणुकीत एकूण 35 हजार 700 वैध मतं ठरली होती. ज्यापैकी ज्ञानेश्वर म्हात्रेंनी पहिल्या पसंतीची 20 हजार 648 मतं मिळवून दणदणीत विजय मिळवला. तर बाळाराम पाटील यांना अवघी 9 हजार 500 मतं मिळाली. पसंती क्रमाच्या सूत्रानुसार जो कोटा होता तो पहिल्याच फेरीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

MLC Election Result: BJPने कोकणात मविआला लोळवलं, म्हात्रे ठरले जायंट किलर!

हे वाचलं का?

दरम्यान, म्हात्रे यांच्या विजयात ठाणे जिल्ह्याने निर्णायक भूमिका बजावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून सर्वात जास्त मतदार होते. सर्वाधिक मतदान असल्याने विजयाची मदार ठाणे जिल्ह्यावर अवलंबून होती. त्यामुळेच भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्हीही पक्षांनी ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलं होतं.

विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 91.02 टक्के मतदान झालं होतं.

– एकूण 38 हजार 529 मतदार

ADVERTISEMENT

– सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यातील 35 हजार 75 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

ADVERTISEMENT

जिल्हानिहाय मतदार

  • ठाणे – एकूण मतदार 15300 – झालेलं मतदान 13595

  • रायगड – एकूण मतदार 10101 – झालेलं मतदान – 9452

  • पालघर – एकूण मतदार 6844 – झालेलं मतदान – 6013

  • रत्नागिरी – एकूण मतदार 4120 – झालेलं मतदान- 3909

  • सिंधुदुर्ग -एकूण मतदार 2164 – झालेलं मतदान 2106

  • ठाणे जिल्ह्यात कसं झालं होतं मतदान?

    • ठाणे जिल्ह्यात 88.86 टक्के मतदान झाले होते.

    • यात 6 हजार 29 पुरुष तर 9 हजार 271 महिला – एकूण 15 हजार 300

    • यापैकी 5 हजार 634 पुरुष तर 7 हजार 961 महिला अशा 13 हजार 595 शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

    MLC Election Result: तांबे की पाटील? अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष नाशिककडे

    एकूण मतदान – 35075

    • वैध मते 33450

    • अवैध मते – 1619

    • कोटा – 16726

    1. ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे – 20683

    2. बाळाराम दत्तात्रेय पाटील – 10997

    3. धनाजी नानासाहेब पाटील – 1490

    4. उस्मान इब्राहिम रोहेकर – 75

    5. तुषार वसंतराव भालेराव – 90

    6. रमेश नामदेव देवरुखकर – 36

    7. राजेश संभाजी सोनवणे – 63

    8. संतोष मोतीराम डामसे – 16

    कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात होते. पण यात खरी लढत भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे आणि महविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांच्यात होती. सुरुवातील एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी ५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले होते. यात वेणू कडू यांना भाजपच्या नेत्यांनी गळ घालून माघार घेण्यास सांगितल्याने म्हात्रे यांचा विजयातील अडसर दूर झाला होता.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT