Uddhav Thackeray: “मी आज सगळ्या महाराष्ट्राच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतो आहे”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. फेसबुकवर येत उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला. सुप्रीम कोर्टाने फ्लोअर टेस्टच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर सोशल मीडियावर लाइव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आज मी महाराष्ट्राच्या साक्षीने माझ्या पदाचा त्याग करतो आहे. शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा आनंद त्यांना खुशाल लुटू दे. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. शिवसेना भवनात आता मी पुन्हा बसायला सुरूवात करणार आहे. माझ्या माता भगिनींना घेऊन शिवसेनेची वाटचाल नव्याने करणार आहे.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

साहेब काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असं मला मातोश्रीवर येऊन सामान्य माणसं सांगत होती. ज्यांना सगळं दिलं ते नाराज झाले. ज्यांना काही दिलं नाही ते मला आश्वासन दिलं की साहेब घाबरू नका आम्ही सोबत आहोत. न्यायदेवतेने जो निर्णय आपल्याला दिला आहे तो मान्य आहे. फ्लोअर टेस्ट होणारच असं त्यांनी सांगितलं. राज्यपालांचेही मला आभार मानायचे आहेत कारण त्यांनी लोकशाहीचं पालन करत चोवीस तासात फ्लोअर टेस्टचे आदेश दिले. हीच तत्परता विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या यादीबाबत का दाखवली नाही असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. जे काही म्हणत आहेत की आम्ही नाराज आहोत. तर तुमची नाराजी तुम्ही माझ्याकडे येऊन सांगायची होती. मातोश्री किंवा वर्षावर येऊन सांगायचं होतं. तुम्हाला आम्ही आपलं मानलं होतं.

ADVERTISEMENT

ज्या शिवसैनिकांनी ज्या आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला. त्यांच्या रक्ताने मुंबईचे रस्ते लाल करणार आहात का? लोकशाहीचा पाळणा हलतोय त्यांच्या मधे कुणीही शिवसैनिकांनी येऊ नका. चीन बॉर्डरवरचं सैन्य या ठिकाणी बोलावली तरीही चालणार आहे. मी सगळ्या शिवसैनिकांना सांगतो आहे की उद्या या आणि शपथ घ्या. लोकशाहीचा वापर दुर्दैवाने फक्त डोकी मोजण्यासाठी होतो आहे. माझ्याविरोधात कोण आहे? याचं मला काही घेणंदेणं नाही मात्र माझ्या विरोधात एक माणूस जो आपला असेल तो उभा राहिला तर मला त्रास होतो.

ADVERTISEMENT

ज्या शिवसेनेने या सगळ्यांना मोठं केलं त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरवलं हे पुण्य त्यांना मिळू द्या. अशा गोष्टी घडत असतात. मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत मुळीच नाही. माझी इच्छा होती नव्हती. आम्ही कुठेही हपापले होऊन जात नाही. जे काही करतो ते मराठी माणसासाठी करतो, हिंदूंसाठी करतो. यापुढेही करणार. ज्या लोकांना हे काही करायचं होतं ते करू द्या कुणीही त्यांच्या वाटेत येऊ नका आज मी महाराष्ट्राच्या साक्षीने माझ्या पदाचा त्याग करतो आहे. शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा आनंद त्यांना खुशाल लुटू दे. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. शिवसेना भवनात आता मी पुन्हा बसायला सुरूवात करणार आहे. माझ्या माता भगिनींना घेऊन शिवसेनेची वाटचाल नव्याने करणार आहे.

मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतो आहे. सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांचे आणि मला ज्यांनी साथ दिली आहे त्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT