मुंबई Tak Chavadi: ‘पंकजाताईंना कोणीही संपवत नाहीए’, धनंजय मुंडेंनी फडणवीसांना घातलं पाठिशी?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Pankaja Munde's party leaders are ending their politics. But while speaking on Mumbai Tak Chavadi, Dhananjay Munde has made a big statement
Pankaja Munde's party leaders are ending their politics. But while speaking on Mumbai Tak Chavadi, Dhananjay Munde has made a big statement
social share
google news

Dhananjay Munde on Pankaja Munde: मुंबई: राज्याचे नवनियुक्त कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde)  मुंबई Tak च्या चावडीवर तुफान फटकेबाजी केली आहे. मात्र, याचवेळी धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंबाबत (Pankaja Munde) एक असं विधान केलं की, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवनंतर पंकजा मुंडेंचे राज्यातील भाजपच्या नेतृत्वाकडून बऱ्याचदा पंख कापण्यात आले. पण धनंजय मुंडेंना असं अजिबात वाटत नाही. त्यांनी चावडीवर बोलताना असं म्हटलं की, ‘पंकजाताईंना कोणीही संपवत नाहीए.’ त्यांच्या याच विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. (dhananjay munde said Nobody will end Pankaja munde cleancheat to devendra fadnavis mumbai tak chavadi)

ADVERTISEMENT

2019 निवडणुकीतील पराभवानंतर अनेकदा आपल्या मनातील नाराजी पंकजा मुंडेंनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. मात्र, त्यांनी थेट नाव घेणं टाळलं आहे. पण त्यांचा नेमका रोख हा देवेंद्र फडणवीसांकडेच (Devendra Fadnavis) असतो हे काही लपून राहिलेलं नाही. तर दुसरीकडे 2019 च्या निवडणुकीत धनंजय मुंडेंना भाजपनेच छुपी ताकद आणि रसद पुरविल्याचं आजवर अनेकदा बोललं गेलंय. त्यामुळे धनंजय मुंडेंना असं वाटतं की, पंकजा मुंडे यांचं राजकीय करिअर कोणीही संपवत नाहीए.

हे ही वाचा >> Loksabha सर्व्हे: महाराष्ट्राने शिंदे-अजित पवारांना नाकारलं, NDA ला मिळणार फक्त…

‘पंकजाताईंना कोणी संपवत नाहीए’, धनंजय मुंडेंकडून फडणवीसांना क्लीनचीट?

‘चावडी’वर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, ‘ एक लक्षात घ्या.. मला असं एकंदरीतच वाटत नाही की, कोण कोणाचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतं. आपण काय लोकांना दाखवतो की, आपण संपलोय.. आपल्याला कोणी तरी संपवतंय. का आपण हे दाखवायचंय की नाही कितीही वाईट प्रसंग आले.. भलेही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे पण मला कोणी संपवू शकत नाही. दोन गोष्टी आहेत.. ज्या व्यक्तीला कळल्या तो यशस्वी होतो.’

‘मला अजिबात वाटत नाही की, त्यांच्या करिअरला कधी ग्रहण लागेल किंवा कोणी लावायचा प्रयत्न करतंय आणि अशा पद्धतीने काही होईल असं मला तरी वाटत नाही. प्रत्येकाच्या राजकीय जीवनात एक बॅड पॅच, प्रारब्ध असतो.. त्यातून जावंच लागतं. 2009  माझ्या जागी पंकजाताई आल्या.. आम्ही स्वीकारलं.. त्यानंतर माझ्या जीवनात प्रसंग आला.. त्यावेळेस तर मला व्हिलन केलं होतं. लोकं माझ्या तोंडावर थुंकलेले आहेत. माझ्या गाड्या फोडलेल्या आहेत. माझ्यावर दगडफेक झालेली आहे. या सगळ्या प्रसंगातून मी गेलो त्यावेळेस काय मी संपलो? एवढे वाईट प्रसंग तर कोणावर आले नाहीत. कोणी साइडलाइन करतंय का.. यावरून कोणी कोणाचं राजकीय अस्तित्व संपतंय संपवायचं प्रयत्न करतोय.. असं बिल्कुल नाहीए.’

‘माझ्यात आणि पंकजाताईमध्ये आता संवाद होतोय, पण…’

‘माझं पंकजाताईशी स्क्रिप्टेड वैर असतं तर हे वैर अशा पद्धतीने नसतं. अचानकपणे झालं नसतं. जी तारीख मी सांगितली त्या तारखेला नसतं. त्यामुळे ज्या गोष्टी घडू नये त्या गोष्टी दुर्दैवाने घडतात तेच ते प्रसंग येतात. म्हणून मी 5 तारखेच्या भाषणात म्हटलं की, या प्रसंगातून मी गेलो आहे. हे अतिशय दुर्दैव आहे. ज्या गोष्टी घडायला पाहिजे त्या घडल्या. घडल्यानंतर मला माझं कर्तृत्व.. मी नालायक आहे की, लायक आहे हे तर जनतेच्या समोर दाखवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ना. त्यामुळे हे काही स्क्रिप्टेड नव्हतं.’

हे वाचलं का?

पाहा Video >>  Ajit Pawar यांनी बंड का केलं? Dhananjay Munde यांनी सांगितली Inside Story| Sharad Pawar Chavadi

‘जे काही वैर होतं ते राजकीय वैर होतं. राजकीय वैर विचारधारेचं आजही आहे. पण नियतीला बघा आज एक साखळी होती.. माझे वडील स्वर्गवासी झाले, मुंडे साहेब स्वर्गवासी झाले. इतर दोन चुलते ते आज नाहीत माझ्या घरात मोठे कोण तर माझे वडील. त्यानंतर ते गेल्यानंतर स्वाभाविक मी मोठा आहे.’

“https://static.tak.live/production/vod_29_Jul_2023_vod_mt_chavdi2_1024/video.mp4”

ADVERTISEMENT

‘म्हणून घरात एक संवाद तयार झाला.. संवादानंतर आपल्याला वाटतं की, हे स्क्रिप्टेड आहे आणि परळीत कोणी तयार होऊ नये.. तर ही लोकशाही आहे. ज्या वेळेस लोकांना एखाद्या वेळेस व्यक्तीमध्ये कर्तृत्व दिसतं. त्यावेळेस लोक पाठिशी उभे राहतात. त्यामुळे् स्क्रिप्टेड वैगरे काही नाही.. एक नक्की आहे कुठेतरी भगवंताची कृपा आहे की, या सगळ्या गोष्टी आमच्या घरामध्ये चांगला संवाद होतोय. राजकीय विचारधारा आजही त्यांची वेगळी आहे. माझी वेगळी आहे. पण नियतीला बघा आज घरात संवाद निर्माण झाला तसा नियतीने त्या विचारधारा सुद्धा जोडल्या. आता त्याच्यामुळे तुम्हाला स्वाभाविक वाटतं की, हे स्क्रिप्टेड आहे. तर तसं काही नाही.’ असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT