Dussehra Melava: अंगार-भंगारवरुन कोण भिडलं, संजय राऊत का संतापले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

dussehra melava shiv sena shinde group and thackeray group aggressive against each other why sanjay raut angry
dussehra melava shiv sena shinde group and thackeray group aggressive against each other why sanjay raut angry
social share
google news

Sanjay Raut on Dussehra Melava: विक्रांत चौहान, मुंबई: ‘जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? शिवतीर्थावर शिवसेनेची (Shiv Sena) स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत दसरा मेळावा हा शिवसेनेचा विचारांचा अंगार घेऊनच मेळावा घेत असतो. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असताना मेळावा घेत होते. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सुद्धा दसरा मेळावा घेत आहेत. ज्या मेळाव्याने देशामध्ये महत्व प्राप्त केलं आहे. त्यामुळे ‘अंगार कोण भंगार कोण’ हा येणारा काळ ठरवेल. असं म्हणत शिवसेना (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (dussehra melava shiv sena shinde group and thackeray group aggressive against each other why sanjay raut angry)

ADVERTISEMENT

संजय राऊत प्रचंड संतापले

‘तुमचे विचार ऐकण्यासाठी येत असतील तर येऊ द्या. तुमच्या विचारांना आम्ही अंगार-भंगार म्हणणार नाही, या राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेला भंगार म्हणण्याइतकी आपली जीभ घसरली आहे. आपण सध्या नड्डा-मोदी आणि शहा यांच्या कच्छपी लागले आहेत. हा काय बाळासाहेबांचा विचारांचा अंगार नाही. बाळासाहेबांचा विचार हा स्वतंत्र होता तो शिवसेनेचा होता.. नक्कीच त्यांनी भाजपा पक्षासोबत पंचवीस वर्ष युती ठेवली पण ती युती करत असताना त्यांनी शिवसेनेचा विचार सोडला नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नड्डा यांच्या स्वागतासाठी बोर्ड लावावे लागले आहेत. ही तुमच्यावर वेळ आली आहे.’ असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर तोंडसुख घेतलं आहे.

हे ही वाचा >> देशातील 5 राज्यात सत्तेचा कौल कोणाला? ओपिनियन पोल नेमकं काय सांगतो?

तुमच्या हिम्मत असेल तर तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष काढून दाखवा.
पक्ष स्थापन करून लोकांसमोर जा मग समजेल अंगार कोण आणि भंगार कोण. असं आव्हानच संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना यावेळी दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांवर जळजळीत टीका

व्हायब्रंट गुजरात प्रोग्राम मुंबईच्या ताजमहल पॅलेसला पार पडत आहे. तर ह्यावेळी मुंबईत रोड शो देखील होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. यावरुन देखील संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

हे ही वाचा >> Ncp Crises: शरद पवारांचे समर्थक ‘कलानी कुटुंब’ दादांच्या भेटीला; राजकारणात खळबळ

‘हाच तो महाराष्ट्राचे अंगार आणि भंगार मधला फरक आहे. ना की व्हायब्रंट गुजरातसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुलामासारखे जावे लागते. आत्मा काढून मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करून तुम्ही व्हायब्रंट गुजरात बनवला आणि राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम म्हणून तिथे हजर राहतात.’ अशी घणाघाती टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT