‘हा जनता न्यायालयाचा इम्पॅक्ट’, चव्हाण-साळवींच्या कारवाईवरून राऊतांनी तोफ डागली
ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण आणि आमदार राजन साळवी यांच्यावर ईडी आणि एसीबीकडून कारवाई झाल्यानंतर शिंदे गटावर खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. ज्या प्रमाणे ठाकरे गटावर कारवाई केली आहे. त्याच प्रमाणे सूरच चव्हाण बरोबर असलेल्या किती ठेकेदारांवर कारवाई केली आहे तेही ईडीकडून जाहीर करावं अशी टीका करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Sanjay Raut : उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबरोबर (Shiv sena) जी लोकं निष्ठेनं सोबत आणि उभा आहेत अशाच लोकांवर ईडी आणि इतर एजन्सीकडून कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांच्या घरावर एसीबीची धाड पडल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिंदे आणि भाजपवर त्यांच्याच लोकांनी कोविड काळात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप करत ते शिंदे गटात असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
निष्ठावंत शिवसैनिकांवर कारवाई
खासदार संजय राऊत यांनी सूरज चव्हाण आणि राजन साळवी यांच्यावर कारवाई केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, ही दोन्हीही प्रमुख लोकं निष्ठेनं शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दबाव आणला जात होता. त्यांच्याबरोबरच रवींद्र वायकर यांच्यावरही दबाव असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> Suraj Chavan : काय आहे खिचडी घोटाळा, ठाकरेंचे निकटवर्तीय चव्हाणांना का झाली अटक?
धमकी वजा निरोप
‘तुम्ही जर शिवसेना सोडून आला नाही तर ईडी आणि इतर एजन्सीमार्फत तुमच्यावर कारवाया केल्या जातील, तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल अशा प्रकारचे धमकी वजा निरोप ठाकरे गटाच्या नेत्यांना येत असतात. अशीच धमकी सूरज चव्हाण यांना आली मात्र त्यांनी त्यांचे ऐकलं नाही, ते चौकशीला सामोरे गेले. त्यानंतर ठाकरे गटाने जनता न्यायालय केले, त्याचा लोकांवर प्रभाव पडल्यामुळेच सूरज चव्हाण यांना अटक केल्याचे सांगत त्यांची ही अटक राजकीय अटक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हे वाचलं का?
तो काळ काम करण्याचा
संजय राऊत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने कोरोना काळात उत्तम काम केले आहे. तो काळ होता एकमेकांना मदत करण्याचा, तो काळ होता कागदपत्रांशिवाय सेवा पुरवण्याचा, तो काळ होता झोकून देऊन काम करण्याचा, त्या संपूर्ण काळात शिवसेनेच्या लोकांनी, सामाजिक संस्थेने कोविड सेंटर चालवली, त्या काळात गोरगरीब आणि स्थलांतरीत कामगारांना खिचडी वाटपाचे काम केले. मात्र तरीही खोटी प्रकरणं उभी करून, खोटी साक्षीपुरावे उभे करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे.
ईडीनं सगळं समोर आणावं
या सगळ्या चौकशीला आम्ही सामोरे जाऊ, मात्र माझा एक प्रश्न आहे म्हणत राऊतांनी सवाल केला आहे की, 138 लोकांना खिचडी वाटपाचं काम दिलं होतं. तर त्यातील किती लोकांच्या चौकशी झाल्या ते ईडीनं समोर आणावं, किती हॉटेल्स, संस्थांच्या चौकशा झाल्या, किती लोकांवर गुन्हे दाखल झाले ते ही समोर आणावं असा थेट इशाराच त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Shiv Sena: ‘ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार हे आम्हाला माहितीच…’ भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT