BJP: ‘..तर एकनाथ शिंदे आमच्यासोबत आलेच नसते’, सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान
उद्धव ठाकरे हे कोरोना काळात जनतेच्या मदतीसाठी घरात न थांबता बाहेर पडले असते तर एकनाथ शिंदे हे आमच्यासोबत आले नसते. असं वक्तव्य भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
नागपूर: शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे लवकरच विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पण त्यांच्या याच दौऱ्यावरून भाजपचे मंत्री आणि विदर्भातील दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव ठाकरेंवर तुफान टीका केली आहे. हीच टीका करताना त्यांनी एक मोठं विधान देखील केलं आहे. हे विधान त्यांनी एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत (BJP)येण्याबाबत केलं आहे. (if uddhav thackeray help people during corona then eknath shinde would not have come with us big statement made by bjp minister sudhir mungantiwar shiv sena devendra fadnavis)
ADVERTISEMENT
‘आता उद्धव ठाकरे यांची मजबुरी आहे. जर त्यांनी पहिले म्हणजे कोरोना काळात दौरा केला असता तर कदाचित एकनाथ शिंदे हे आमच्या बरोबर आले नसते..’ असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं आहे.
पाहा सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले:
‘उद्धव ठाकरे हे लवकरच विदर्भाचा दौरा करणार आहेत. यावरही मुनगंटीवारांनी जोरदार टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरेंची मजबुरी आहे काय करतील.. पहिले कोरोना काळात दौरा केला असता तर कदाचित एकनाथ शिंदे आमच्या बरोबर आले नसते.. तेव्हा काहीच केलं नाही, घरी बसले म्हणून आता त्यांना दौरे करावे लागत आहेत. म्हणून कधी ना कधी कष्ट करावे लागतात.. आधी अभ्यास करा नंतर जीवन सुखाचं होईल.. आधी अभ्यास केला नाही तर नंतर जीवन कष्टाचं हे साधारण सूत्र असतं.. हे आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं कदाचित त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं नसेल.’ अशी अत्यंत बोचरी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> ‘सटर-फटर लोकांमुळे..’, ठाकरे गट सोडताच नीलम गोऱ्हेंनी सुषमा अंधारेवर केली टीका
कोरोना काळात घरातूनच राज्यकारभार केल्याने उद्धव ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच कोरोना संकटाने डोकं वर काढल्यानंतर संपूर्ण देशात किंबहुना जगात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी थेट आपल्या शासकीय निवासस्थानावरून राज्याचा गाडा हाकण्यास सुरुवात केली. खरं तर या कालावधी महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी मोठी यंत्रणा कमी कालावधीत सज्ज करण्यात आली होती. मात्र, स्वत: मुख्यमंत्री हे कोरोनाच्या भीतीमुळे मंत्रालयात न जाता घरातूनच कारभार करतात असं म्हणत त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांचा हा कारभार एककल्ली असल्याचा आरोप त्यावेळी केला होता.
शिंदेंच बंड अन् भाजपची सत्ता..
दरम्यान, कोरोना संकट जवळजवळ संपुष्टात आलेलं असतानाच अचानक एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसोबत पक्षात बंड केलं. अचानक एका रात्रीतून सुरत आणि नंतर गुवाहटीला गेलेल्या या शिंदे गटाने या बंडाच्या जोरावर ठाकरेंचं सरकारच पाडून टाकलं. ज्यानंतर त्यांनी भाजपच्या सोबत राज्यात सत्ता स्थापन करत थेट मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ‘तुम्हाला त्याग करावा लागेल..’, BJP आमदारांना देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
यामुळे अडीच वर्ष विरोधात असलेला भाजप पक्ष देखील सत्तेत आला. सत्तेत आल्यापासून भाजप वारंवार उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे. याच दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मूळ पक्षही उद्धव ठाकरेंकडून हिरावून घेतला. ज्या सगळ्याचा परिणाम हा ठाकरेंच्या एकूण राजकीय वाटचालीवर झाला आहे.
ADVERTISEMENT
आता या सगळ्यात उद्धव ठाकरे नेमका कसा मार्ग काढतात आणि आपल्या राजकीय विरोधकांवर कशी मात करतात हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे. मात्र, तूर्तास तरी राज्यात भाजप हे राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रबळ असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळेच उद्धव ठाकरेंसमोरील आव्हान हे प्रचंड मोठं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT