NCP : ‘सिक्स पॅक अ‍ॅब्सवाल्या ‘दादां’ची…’, आव्हाडांनी अजित पवारांना फोटोच दाखवला

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

jitendra awhad reply ajit pawar and share her photo ncp politics sharad pawar maharashtra politics
jitendra awhad reply ajit pawar and share her photo ncp politics sharad pawar maharashtra politics
social share
google news

Jitendra Awhad Reply Ajit Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. याच आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) मिश्किल टोला मारलाय. जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांनी, दादा तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक्स अ‍ॅब्स केले असतील, पण हा तुमचा पर्वाचा फोटो ज्यात तुमची ढेरी दिसतेय, अशा शब्दात त्यांना लक्ष्य केले. आता यावर अजित पवार गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (jitendra awhad reply ajit pawar and share her photo ncp politics sharad pawar maharashtra politics)

ADVERTISEMENT

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या सोशल माध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत जितेंद्र आव्हाड लिहतात की, दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला होतात. तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन सिक्स पॅक अ‍ॅब्स केले असतील. पण हा पर्वाचा फोटो तुमची ढेरी दाखवतोय, अशा शब्दात आव्हाडांनी अजितदादांना मिश्किल टोला लगावला आहे.

हे ही वाचा : Kalyan Crime : पत्नीच्या डोक्यात घातला दांडा, नंतर…; रिक्षाचालकाच्या कृत्याने कल्याण हादरले

हे वाचलं का?

हे ही वाचा : Sukhdev Singh Gogamedi यांच्या हत्येतील आरोपी रोहित गोदरा आहे तरी कोण?

काही दिवसांपूर्वीच रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवार गटाचा वैचारीक मंथन शिबीराचा कार्यक्रम पार पडला होता. या शिबिराच्या समारोपाच्या भाषणात अजित पवार यांनी शरद पवारांवर आणि त्यांच्या गटातील नेत्यांवर जोरदार हल्ला केला होता. यावेळी अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटावरही भाष्य केले होते. अजित पवारांच्या याच टीकेवर आता जितेंद्र आव्हाडांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT