‘केसीआर यांच्या डोक्यात किडा घुसलाय’, ठाकरेंचे दोन सवाल अन् इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Warns k chandrashekhar Rao. called him as bjp's team b
Uddhav Thackeray Warns k chandrashekhar Rao. called him as bjp's team b
social share
google news

KCR Maharashtra : महाराष्ट्रात सध्या ज्या नावाची चर्चा सुरू आहे, ते म्हणजे केसीआर, अर्थात के. चंद्रशेखर राव! केसीआर यांनी महाराष्ट्र दौऱ्यात प्रचंड शक्तिप्रदर्शन केले. राव महाराष्ट्रातील मतदारांवर किती प्रभाव टाकणार याबद्दल वेगवेगळे कयास लावले जात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केसीआर यांच्यावर भाजपची टीम बी असल्याचा शिक्का मारला आहे. काही महिन्यांपूर्वी मातोश्रीवर येऊन गेलेल्या केसी राव यांच्यावर ठाकरेंनी तोफ डागली आहे. ठाकरेंनी सामना अग्रलेखात काय म्हटलंय, तेच पाहुयात…

ADVERTISEMENT

केसीआर महाराष्ट्रात आले, ते भगीरथ भालके यांच्या पक्षप्रवेशानिमित्ताने. त्यांनी केलेले शक्तिप्रदर्शन चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं. त्यांनी विठुरायाचे दर्शनही घेतले. या सगळ्यांवर भाष्य करताना ठाकरेंनी सामना अग्रलेखातून सुनावलं आहे.

राष्ट्रीय राजकारणाचा किडा

अगदी सुरुवातीलाच सामना अग्रलेखात राव यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेबद्दल भाष्य केलंय. “तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिती असा पक्ष स्थापून राष्ट्रीय राजकारणात येण्याचे नक्की केले. खरं तर त्याची गरज नव्हती. त्यांचा एक प्रादेशिक पक्ष होता व त्यांचे उत्तम चालले होते, पण राष्ट्रीय राजकारणाचा किडा राव यांच्या डोक्यात घुसला तो घुसलाच”, असं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Devendra Fadnavis: ‘काळं तोंड, नालायक.. मालक’, फडणवीस-खडसेंमध्ये पार जुंपलीच; दोघंही..

“2024 मध्ये केसीआर यांचा पक्ष सत्तेत राहील की जाईल, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. केंद्रीय तपास यंत्रणा दबावाचे राजकारण करीत असल्या तरी आम्ही त्यांच्यापुढे झुकणार नाही, लढत राहू, अशी गर्जना केसीआर यांनी केली. मात्र त्यानंतर ते जी राजकीय पावले टाकत आहेत ती भाजपास अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचीच आहेत”, असं म्हणत ठाकरेंनी केसीआर हे भाजपला मदत करत असल्याचा ठपका ठेवला आहे.

केसीआर यांना दोन सवाल

सामना अग्रलेखात पुढे म्हटलंय की, “2019 सालापासून भाजप ज्या ‘एमआयएम’च्या ओवेसींचा वापर मतविभागणीच्या कामासाठी करून घेत आहे, त्या ओवेसी यांचे ‘हेडक्वॉर्टर’सुद्धा हैदराबादच आहे. ओवेसी हे मतांचे विभाजन करण्यासाठी तेव्हा महाराष्ट्रात व इतर राज्यांत गेले. त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली, पण आता ओवेसींचा डाव लक्षात आल्याने मुस्लिम व दलित हे एमआयएमच्या कच्छपी लागणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भाजपने आता ओवेसी यांच्या जागी केसीआर यांना उतरवले आहे काय? केसीआर व त्यांचा पक्ष भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम करत आहे काय? असा प्रश्न पडला आहे.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> BRS : तेलंगणात एकहाती सत्ता, आता महाराष्ट्रावर नजर; कोण आहेत केसीआर?

भाजपसाठी मतविभाजन

“हा पक्ष महाराष्ट्रात निवडणुका लढविणार व जमेल तितकी मतविभागणी घडवून भाजपच्या राजकारणास सहाय्य करणार हा डाव मऱ्हाठी जनतेने वेळीच ओळखायला हवा. वरकरणी केसीआर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत. मात्र त्यांचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष भाजपसाठी मतविभागणीचे ‘कार्पेट’ अंथरण्याचे काम करेल, असेच एकंदर चित्र आहे”, असं म्हणत केसीआर हे भाजपला मदत करत असल्याची टीका ठाकरेंनी केलीये.

ADVERTISEMENT

ठाकरेंचा केसीआर यांना इशारा

“तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाच्या पायाखाली हादरे बसत आहेत. मात्र त्याचा बदला ते महाराष्ट्रात घेत असतील तर ते देशहिताला चूड लावीत आहेत. केसीआर यांच्या कर्तबगारीविषयी कुणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही, पण ते ज्या प्रकारचा डाव खेळू पाहत आहेत तो त्यांचा डाव नसून दुसरेच कोणीतरी त्यांना वापरून घेत आहे. त्यामुळे तेलंगणातले त्यांचे तेलही जाईल व महाराष्ट्रातले तूपही हाती लागणार नाही”, असा इशारा ठाकरेंनी केसीआर यांना महाराष्ट्रातील पक्ष विस्तारानंतर दिला आहे.

हेही वाचा >> Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?

भाजपच्या बी टीम आणि केसीआर

सामना अग्रलेखात भाजपवर निशाणा साधताना म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात आधीच भाजपने अनेक घोडे व खेचरे ‘बी’ टीम म्हणून सजवून ठेवली आहेत. त्यात तेलंगणातील आणखी एका पक्षाची भर पडली आहे इतकेच. केसीआर यांच्याकडे धन-संपत्तीची कमी नाही. ते बेफाम वाटप करीत आहेत. त्यानिमित्ताने अडगळीत पडलेल्यांची गरिबी हटणार असेल तर ती त्यांनी खुशाल हटवून घ्यावी. पंढरपूरचा विठोबा हा जागृत आहे. हे सर्व तो उघडय़ा डोळय़ाने पाहतो आहे, चिंता नसावी!”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT