Maratha Reservation: ‘तो GR दिला तरी आझाद मैदानावर जाणारच, कारण…’, मनोज जरांगेंनी टाकला नवा डाव
Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर आलेल्या मनोज जरांगे यांनी सरकारकडून आपल्या मागण्या करून घेण्यासाठी एक नवा डाव टाकला आहे. पाहा त्यांचं नेमकं काय आहे म्हणणं.
ADVERTISEMENT
Manoj Jarange demands on Maratha Reservation : मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज नवी मुंबईत आपला तळ टाकला आहे. यावेळी पुढची नेमकी काय भूमिका असणार हे स्पष्ट केलं. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव हे उपस्थित होते. सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, असं असलं तरी याबाबत मनोज जरांगेनी जाहीर भाषणात काही मागण्या मांडल्या आणि त्यासंबंधी थेट अध्यादेशाची मागणी केली. ‘पण जरी अध्यादेश मिळाला तरीही आपण आझाद मैदानावर जाणारच..’ असं म्हणत मनोज जरांगे यांनी एक नवाच डाव टाकला आहे. (manoj jarange made a new move by saying that even if gr is given regarding maratha reservation we will go to azad maidan)
ADVERTISEMENT
‘अध्यादेश दिला तर गुलाल उधळायला आझाद मैदानात जाणार आणि नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार..’ असं म्हणत मनोज जरांगे यांनी अध्यादेशासाठी सरकारला केवळ उद्या सकाळी 11 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.
हे ही वाचा>> Manoj Jarange : सरकारचा प्रस्ताव, जरांगे पाटलांची मोठी घोषणा
पाहा मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले:
‘माझं म्हणणं आहे की, तेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या.. तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या. आम्ही वाटल्यास आजची रात्र इथेच काढतो. आम्ही आज 26 जानेवारीचा सन्मान करू, कायद्याचा सन्मान करू. आम्ही आज आझाद मैदानकडे जात नाही. पण मुंबई मात्र, इथून सोडत नाही.
आज रात्रीत अध्यादेश दिला नाही तर उद्या आझाद मैदानात जाणार. समाजाला न्याय मिळावा म्हणून एक पाऊल मागे जायला तयार आहे. पण उपोषण सोडायला तयार नाही. कारण उपोषण सुरू केलं आहे.. सकाळी 11 वाजेपासून.. पाणी पितो फक्त.. मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा भीत नाही..
आमच्या लेकरा-बाळाला जर कोणी वाईट वागणूक दिली तर आमचा महाराष्ट्रातील समाज झाडूनपुसून मुंबईत येईल. जर काही त्रास द्यायचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातील एकाही मराठ्याने घरी न राहता करोडोच्या संख्येने मुंबईला या.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमचा सगेसोयरेचा अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीत प्रयत्न करा.. उद्या आम्हाला सकाळी 11-12 वाजेपर्यंत अध्यादेश द्या. पण त्यानंतर मी आझाद मैदानाकडे जाईन. आमची तुम्हाला साथ आहे. आमचा हेकेखोरपणा नाही. तिथं गेलो तरी आरक्षण घ्यायचंय आणि इथूनही घ्यायचंय. इथूनही उठत नसतो मग मी.
आम्ही इथे आलो ते आरक्षण घेण्यासाठीच.. मला डेटा पाहिजे, याचा अध्यादेश पाहिजे.. आणि मोफत शिक्षणाबद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याबद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे. जो अध्यादेश आपण काढणार आहात सगेसोयरेचा..
ते जर आपल्याला 15 मिनिटात अध्यादेश देत असले तरी आम्ही आझाद मैदानात जाणारच आहोत. दिलं तरी आझाद मैदानात जाणार आणि नाही दिलं तरी आझाद मैदानात जाणारच आहे.
अध्यादेश दिला तर गुलाल उधळायला जाणार आणि नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार.. आपण त्यांना आजच्या दिवसाचा वेळ दिला आहे.
हे ही वाचा>> जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा, ‘सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज द्या नाहीतर उद्या…’
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT