Ajit Pawar भाजपासोबत जाणार? राष्ट्रवादीतील ‘त्या’ आमदारांची भूमिका काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar join bjp sources what ncp mlas says
ajit pawar join bjp sources what ncp mlas says
social share
google news

Ncp’s Ajit Pawar Joining Hands With Bjp : राज्यात शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपासोबत जाण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू झाली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांना राष्ट्रवादीच्याच 30 ते 40 आमदारांनी पाठींबा असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राज्यात मोठा राजकीय़ भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान अजित पवार यांना 2019 च्या पहाटेच्या शपथविधीदरम्यान अनेक आमदारांनी (MLAs Support) पाठिंबा दर्शवला होता. या आमदारांची यावर काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घेऊयात. (ajit pawar join bjp sources what ncp mlas says read full story)

ADVERTISEMENT

अजित पवार (Ajit Pawar) गेल्या काही दिवसांपासून ‘नॉटरिचेबल’ आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांच्यासोबत असलेल्या पुण्यातील रॅलीचा कार्यक्रम रद्द केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. या बातम्यानंतर अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्यांना बळ मिळाल होते.मात्र या बातम्यांवर नंतर त्यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले होते.

हे ही वाचा : NCP फुटणार?: शरद पवारांनी अजित पवारांचा विषयच संपवला, म्हणाले…

अजित पवार ट्विटमध्ये काय म्हणाले?

खारघर येथे झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे अपघाती मृत्युमुखी पडलेल्या सदस्यांच्या कुटुंबियांची आणि बाधितांची भेट घेण्यासाठी मी सोमवारी सकाळपर्यंत एमजीएम रुग्णालयात उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, असे अजित पवार यांनी ट्विटकरून स्पष्ट केले होते.तसेच मी मुंबईत आहे. उद्या, 18 एप्रिल मंगळवारी मी विधानभवन येथील माझ्या कार्यालयात उपस्थित राहिन आणि कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहिल, असेही ते म्हणालेत. तसेच मी मंगळवारी आमदारांची बैठक बोलावल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केले होते असे पवार यांनी नमूद करत, मी आमदार, पदाधिकाऱ्यांची कोणतीही बैठक बोलावली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

हे वाचलं का?

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

तुम्ही सर्व चॅनेलवाले एक युनिट अजितदादांच्या मागे लावा. एक कार्यक्रम रद्द केल्यानंतर असे काही होत नाही,अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली होती. अजित दादांच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही गोष्ट दादांना विचारा, माझ्याकडे गॉसिपसाठी वेळ नाही आहे. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खुप कामे आहेत. त्यामुळे मला या गोष्टीची माहिती नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले होते.

हे ही वाचा : Ajit Pawar भाजपसोबत जाणार?; संजय राऊत म्हणाले, ’20-25 आमदार जाणं म्हणजे…’

य़ाआधी देखील सुप्रिया सुळे यांनी अजित पवार अजिबात नाराज नसल्याचे स्पष्ट केले होते. छत्रपती संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीच्या झालेल्या सभेत जयंत पाटीलही बोलले नव्हते, त्यामुळे ते रागावले आहेत असे म्हणता येईल का? असे त्यांनी सांगितले होते. महाविकास आघाडीच्या प्रत्येक रॅलीत फक्त दोनच लोक बोलायचे हे आधीच ठरले होते. यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या या सर्व अफवा आहेत. ज्या झाडांना जास्त फळे येतात, त्या झाडांवरच दगड मारला जातो, असे सुळे यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रतिक्रिया…

2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी राज्यात भाजपला राष्ट्रवादीची गरज आहे.त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेणे हाच पर्याय सध्या भाजपसमोर उरला आहे. अजित पवार आणि पक्ष जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा राहील, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांचे समर्थक आणि नाशिकमधील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली होती.

ADVERTISEMENT

भाजपने राज्यात एकनाथ शिंदे समीकरण आजमावले, पण त्याचा काही फायदा होताना दिसत नाही. सर्व सर्वेक्षण, अहवाल आणि प्रतिक्रिया त्यांच्या विरोधात जात असल्याचे कोकाटे म्हणाले आहेत.तसेच पक्षाने अद्याप आम्हाला माहिती दिलेली नाही, त्यामुळे अशा काही राजकीय घडामोडी सुरू आहेत की नाही हे सांगणे योग्य नाही. आम्ही पक्षाचे आमदार आहोत आणि पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असे देखील कोकाटे म्हणाले होते.

हे ही वाचा : Ajit Pawar: ‘राष्ट्रवादी भाजपसोबत एकत्र आली तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार’

2019 दरम्यान पहाटेच्या शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहिलेले मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यावर म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार पक्ष म्हणून जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. मात्र अजित पवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विचारले असता, या सर्व अफवा असल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले होते.

अजित पवार यांचा मुंबईत येण्याचा कोणताही संदेश नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार नाशिकमध्ये होते, त्याआधी अजित पवार नाशिकमध्ये होते, मात्र पक्षीय पातळीवर तशी चर्चा नाही. खरे तर आमचे संपूर्ण लक्ष आगामी बाजार समिती निवडणुकीकडे असल्याचे निफाडचे आमदार दिलीपकाका बनकर यांनी सांगितले होते.

अद्याप अशी कोणतीही बातमी नाही, परंतु शरद पवार, अजितदादा आणि जयंत पाटील यांनी दिलेल्या सूचनांवर आम्ही ठाम राहू. नाशिकचे तीन आमदार कोकाटे, दिलीपकाका आणि मी, पक्षाचे नेते आम्हाला जे आदेश देतील त्याचे आम्ही पालन करू, अशी ग्वाही कळवण मतदारसंघातील आणखी एक आमदार नितीन पवार यांनी दिली.

विशेष म्हणजे 2019 ला झालेल्या पहाटेच्या शपथविधी दरम्यान माणिकराव कोकाटे, नितीन पवार, दिलीप बनकर आणि नाशिकचे नरहरी झिरवळ अजित पवारांसोबत उपस्थित होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT