अरेरे देवाSSS! केसरकरांनी कोल्हापुरात पूर न येण्याचं असं कारण सांगितलं की डोक्याला लावाल हात
मी शिर्डीत असल्याने कोल्हापूरला पुर आला नाही, असा अजब दावा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी केला होता. या दाव्यावर आता अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केसरकरांची खिल्ली उडवली आहे.
ADVERTISEMENT
News on Maharashtra Politics : राज्यात शिंदे-फडणवीस आणि अजित पवार गटाची सत्ता असली तरी नेत्यांमध्ये अद्याप तरी एकवाक्यता असल्याचे दिसून येत नाही. कारण सत्ताधारीच नेते एकमेकांवर टीका करतायत. मी शिर्डीत असल्याने कोल्हापूरला पुर आला नाही, असा अजब दावा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी केला होता. या दाव्यावर आता अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी ”तुम्ही इकडे या, देवाचा धावा करा आणि आमची धरणे लवकरात लवकर भरून द्या, अशा शब्दात त्यांनी केसरकरांची खिल्ली उडवली आहे. (ncp chhagan bhujbal criticize cm shinde minister deepak kesarkar on kolhapur flood and mumbai nashik highway)
ADVERTISEMENT
मी शिर्डीत असल्याने कोल्हापूरला पुर आला नाही, असा अजब दावा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केला होता. अंधश्रद्धा म्हणा श्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा..,पूर परिस्थिती असताना मी योगायोगाने शिर्डीत होतो…कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून पाणी सोडले की 5 फूट लेव्हल वाढते. पण यंदा योगायोगाने मी शिर्डीत होतो त्यामुळे एक फुटाने पण लेव्हल वाढली नाही, ही वस्तुस्थिती आहे, मी स्वत: तिथे ठाण मांडूण बसलो होतो. परंतू ठाण मांडून बसत असताना देवाकडे मी प्रार्थना करत होतो..पाटबंधारे कडे तुम्ही चौकशी केली तर 5-6 फूट पाण्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असती.. परंतू ती गेली नाही. शेवटी निसर्गात पण देव आहे, असे दिपक केसरकर म्हणाले होते.
दिपक केसरकर यांच्या या दाव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”तुम्ही इकडे या, देवाचा धावा करा आणि आमची धरणे लवकरात लवकर भरून द्या, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी केसरकरांची खिल्ली उडवली आहे. तसेच दिपक केसरकर यांनी मुंबई-नाशिक महामार्गवरील खड्ड्यावरून देखील दिपक केसरकर यांना सुनावले आहे.
हे वाचलं का?
महामार्गवरील खड्ड्यावर भुजबळ काय म्हणाले?
मुंबई-नाशिक महामार्गवार खड्डेच नसल्याचा दावा दिपक केसरकर यांनी केला होता. केसरकरांचा हा दावा आता छगन भूजबळ यांनी खोडून काढला आहे. थोडीशी त्यांची गाडी जरा रस्त्याच्या वरून चालत असेल, बुलेट ट्रेन कशी रुळांवर अंतर ठेवून धावते, असा टोलाच भुजबळ यांनी केसरकरांना लगावला. सगळे आमदार काय वेडे आहेत काय? सगळ्याच आमदारांनी त्याच्यावर टीका केली, मी तर पहिल्यापासूनच करत आलोय. याच खड्ड्यामुळे आम्ही सगळे आमदार ट्रेनने आलो. त्यामुळे खड्डे नाहीतच असे म्हणणे चुकीचे असल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. पावसामुळे ते बुजवता येत नाही. मुंबई महापालिका जे कोल्डमिक्स वापरते, त्याचा वापर करून तात्पुरत बुजवता येतील, असे देखील भुजबळ यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर बैठक घेतली आणि सर्व अधिकाऱ्यांना खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. आणि कुणी सांगत असेल की खड्डेच नाही, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक सुद्धा निष्फळ ठरली, असे विधान करत भूजबळ यांनी केसकरांना सुनावले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT