MLC Election Result: महाविकास आघाडीला मोठं यश, आणखी एक उमेदवार विजयी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Vikram Kale Won from Aurangabad Teacher Constituency: औरंगाबाद: शिक्षक-पदवीधर विधान परिषद निवडणूक (Vidha Parishad Election) ही महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) लाभदायक ठरत असल्याचं दिसत आहे. कारण महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार आता निवडून आल्याचं समजतं आहे. खरं तर या निवडणुकांमध्ये भाजपने (BJP) कोकणातून आपलं खातं उघडलं होतं. मात्र, नागपूर (Nagpur) आणि औरंगाबाद (Aurangabad) या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. (one more success for mahavikas a ghadi vikram kale won in aurangabad teachers constituency)

ADVERTISEMENT

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून मविआचे विक्रम काळे चौथ्यांदा विजयी

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विक्रम काळे (Vikram Kale) यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव केला आहे. विक्रम काळे यांच्या विजयानंतर जोरदार जल्लोष औरंगाबादमध्ये करण्यात येत आहे. या मतदारसंघात खरं तर तिहेरी लढत होती. राष्ट्रवादीचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील आणि सूर्यकांत विश्वासराव यांच्यामध्ये चुरसीचा सामना पाहायला मिळाला.

हे वाचलं का?

पण आपला तीन निवडणुकीच्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काळे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. विक्रम काळे यांनी 20195 मतं मिळवून या निवडणुकीत विजय मिळवला. तर भाजपच्या किरण पाटील यांना 13570 मतं मिळाली. तर अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी भाजपच्या पाटलांपेक्षा अधिक म्हणजेच 13604 मतं मिळवली.

दरम्यान, जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा विक्रम काळेंनी आपल्या प्रचारात अधोरेखित केला होता. त्यावेळी त्यांनी असंही म्हटलं होतं की, ‘मी एकमेव आमदार आहे की, जो म्हणतोय की.. आमदारांची पेन्शन बंद करा पण शिक्षकांची पेन्शन मात्र सुरू करा. हे मी लिहून देखील दिलं आहे.’ त्यामुळे विक्रम काळे यांचा हा जो भावनिक प्रचार होता त्याचाच त्यांना मतदानात फायदा झाल्याचं यावेळी पाहायला मिळत आहे. विक्रम काळेंच्या या विजयानंतर औरंगाबादमधील रस्त्यांवर त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करताना पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

MLC Election Result: फडणवीस उतरले मैदानात, तरीही ‘मविआ’ने नागपूर मिळवलं!

ADVERTISEMENT

पाहा विजयानंतर काय म्हणाले विक्रम काळे

दरम्यान, मतमोजणीनंतर माध्यमांशी बोलताना विक्रम काळे म्हणाले की, ‘मराठवाड्यातील शिक्षक बंधू-भगिनींनी चौथ्या वेळेस विधान परिषदेवर पाठविण्याचं काम केलं आहे. त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो विश्वास सार्थ ठरविण्याचं काम माझ्या हातून होईल. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असलो तरी सातत्याने सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळेच हा विजय मी मिळवू शकलो. त्यामुळे या पुढच्या काळात शिक्षक हीच माझी जात, शिक्षक माझा धर्म, शिक्षक हाच माझा पक्ष हे ब्रीद घेऊन मी पुढे चालेल.’

‘यापुढच्या काळात मी पहिल्या दिवसापासून कामाला लागलेला असतो. उद्यापासूनच तुम्हाला मी मराठवाड्यातील एखाद्या शाळेत दिसून येईल. कारण माझी बांधिलकी ही शिक्षक कर्मचाऱ्यांशी आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन मिळवून देणं यासारखे विविध प्रश्न सोडविण्याचं काम मी करणार आहे.’

‘टीका-टिप्पणी करत राहतात लोकं. पण तुम्ही माझ्या प्रचाराचं तंत्र पाहिलं असेल. मागील तीनही निवडणुकीत मी कोणत्याही उमदेवाराच्या टीकेकडे लक्ष दिलं नाही. मी कधीही त्याला प्रत्युत्तर देखील देत नाही. कारण माझ्यापुढे डोंगराएवढं काम आहे. ते पूर्ण करण्यासाठीच माझ्याकडे काम नाही. तर त्यांच्या टीकेला मी कुठे उत्तर देत बसू.. कारण ही काही साखर कारखान्याची निवडणूक नाही. ही बुद्धीवंत आणि विचारवंतांची निवडणूक आहे. शिक्षणाने आम्हाला विवेक आणि विचार दिलेला आहे. त्यामुळे हे विचारपूर्वक मतदान करणारे माझे मतदार आहेत.’ असं विक्रम काळे यावेळी म्हणाले.

MLC Election Results 2023 Live Updates: नाशिक निवडणूक: दुसऱ्या फेरीअंती तांबेची मोठी आघाडी

दरम्यान, नागपूरपाठोपाठ औरंगाबादमध्ये मविआच्या उमेदवाराने विजय मिळविल्याने महाविकास आघाडीमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT