Rahul Gandhi: ‘रावणाप्रमाणेच मोदीजी सुद्धा दोन जणांचं…’, राहुल गांधींनी मोदींना भयंकर डिवचलं!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

rahul gandhi has directly compared prime minister modi to ravana no confidence motion in the lok sabha on manipur violence
rahul gandhi has directly compared prime minister modi to ravana no confidence motion in the lok sabha on manipur violence
social share
google news

Rahul Gandhi: नवी दिल्ली: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मणिपूर हिंसेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर (PM Modi) थेट आणि अत्यंत आक्रमक शब्दात हल्ला चढवला. ‘तुम्ही मणिपूरमध्ये भारताची हत्या केली..’ असं म्हणत राहुल गांधींनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट रावणाशी (Ravan) तुलना केली. रावणाला रामाने नाही तर त्याच्या अंहकाराने मारलं.. तसंच रावण फक्त दोघांचंच ऐकायचं, तुम्ही देखील फक्त दोघांचं ऐकता.. असं म्हणत राहुल गांधींनी मणिपूरच्या मुद्द्यावरून मोदींच्या मौनावर हल्ला चढवला.. पाहा राहुल गांधी यावेळी नेमकं काय म्हणाले. (rahul gandhi has directly compared prime minister modi to ravana no confidence motion in the lok sabha political news headlines india)

ADVERTISEMENT

‘रावण फक्त दोन लोकांचं ऐकायचा, मोदीजी सुद्धा…’

‘जसं मी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणालो की, भारत एक आवाज आहे. त्या आवाजाची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. याचा अर्थ भारतमातेची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारलं. मणिपूरच्या लोकांना मारुन तुम्ही भारताची हत्या केली आहे. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही देशभक्त नाही.. तुम्ही देशप्रेमी नाही तर देशद्रोही आहात. तुम्ही देशाची हत्या मणिपूरमध्ये केली.’

‘यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही. कारण त्यांनी देशाची हत्या केली आहे मणिपूरमध्ये.. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. तुम्ही भारतमातेचे रक्षणकर्ते नाही आहात.. आपण भारतमातेचे खुनी आहात..’

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Rahul Gandhi Speech : ‘तुम्ही देशद्रोही आहात’, राहुल गांधींचं मोदींवर शरसंधान

‘मी माझ्या मातेच्या हत्येबाबत बोलतोय… मी मणिपूरमध्ये माझ्या मातेच्या झालेल्या हत्येबाबत बोलतोय. मी आदराने बोलतोय.. आपण माझ्या आईची हत्या केलीए मणिपूरमध्ये.. एक माझी आई इथे बसली आहे आणि दुसऱ्या आईला आपण मणिपूरमध्ये मारलं आहे.’

‘जोपर्यंत आपण हिंसा बंद करणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात.. भारताचं लष्कर मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता प्रस्थापित करू शकतं. पण तुम्ही भारताच्या लष्काराचा वापर करत नाही. कारण तुम्हाला भारताला मणिपूरमध्ये मारुन टाकायचं आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> No-Confidence Motion: ‘मोदीजी, तुम्ही मणिपूरमध्ये भारताची हत्या केली’, राहुल गांधींनी लोकसभा हादरवली!

‘जर नरेंद्र मोदीजी हे भारताचा आवाज ऐकत नाही.. जर भारताच्या मनातली गोष्ट ऐकत नाही.. तर कोणाचा आवाज ऐकतात? तर दोन लोकांचा आवाज ऐकतात.. यांचा आवाज ऐकतात.. यासाठी ऐकतात कारण.. पाहा अदानींसाठी मोदींनी काय काम केलंय.. पाहा.. हे पहिले आणि हे नंतर..’ (यावेळी राहुल गांधींनी काही पोस्टर दाखवले.. ज्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला.)

ADVERTISEMENT

‘रावण फक्त दोनच लोकांचं ऐकायचा.. एक मेघनाथ आणि दुसरं कुंभकर्णाचं.. तसंच नरेंद्र मोदी हे दोन लोकांचं ऐकतात.. अमित शाह आणि अदाणी.. लंकेला हनुमानाने नव्हतं जाळलं.. लंकेला रावणाच्या अंहकाराने जाळलं होतं.’

‘रामाने रावणाला नव्हतं मारलं… रावणाच्या अंहकाराने रावणाला मारलं होतं. आपण संपूर्ण देशावर रॉकेल फेकत आहात.. तुम्ही मणिपूरवर रॉकेल फेकलं आणि नंतर आग लावली.. आता आपण हरियाणामध्ये तेच करत आहात.. संपूर्ण देश आपल्याला जाळून टाकायला सुरुवात केली आहे. तुम्ही संपूर्ण देशात भारतमातेची हत्या करत आहात..’ अशा शब्दात राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. ज्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT