RBI: देशात पुन्हा नोटाबंदी… 2 हजारांच्या नोटा बंद होणार!, मोदी सरकारचा मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

reserve bank of india has advised banks to stop issuing rs 2000 denomination banknotes with immediate effect
reserve bank of india has advised banks to stop issuing rs 2000 denomination banknotes with immediate effect
social share
google news

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 2000 रुपयांची नोटेचं लीगल टेंडर तर राहील, परंतु ती चलनातून बाहेर काढली जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ प्रभावाने जारी करणं थांबवण्याचा सल्ला दिला आहे. ‘क्लीन नोट पॉलिसी’अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. 2016 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट जारी केली होती. त्याच 2000 रुपयांची नोटही आता जवळजवळ बंद होणार आहे.

ADVERTISEMENT

गेल्या काही महिन्यांपासून बाजारात 2000 रुपयांच्या नोटा कमी दिसत होत्या. एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटाही बाहेर येत नसल्याचे लोकांनी सांगितले. यासंदर्भात सरकारने संसदेतही माहिती दिली होती.

एकावेळी 2000 रुपयांच्या किती नोटा बदलून मिळणार?

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत 2000 रुपयांच्या नोटा एका वेळी इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलल्या जाऊ शकतात. नोट बदलण्याची मर्यादा 20,000 रुपये आहे. म्हणजे तुम्ही एका वेली 2000 रुपयांच्या 10 नोटाच बदलून घेऊ शकतात.

2016 साली मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. ज्यानंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा जारी केल्या होत्या. पण गेल्या काही महिन्यांपासून बाजारात 2000 रुपयांच्या नोटा कमी दिसत होत्या. एटीएममधून देखील 2000 रुपयांच्या नोटाही येत नसल्याचे अनेकांनी सांगितले होते. या संदर्भात सरकारने संसदेत माहितीही दिली होती.

गेली अनेक वर्ष 2000 रुपयांच्या नोटांची छपाई नाही

रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात 2000 रुपयांच्या नोटेबाबत बरीच माहिती दिली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2019-20, आर्थिक वर्ष 2020-21 आणि आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापली गेली नाही. त्यामुळे बाजारात 2000 रुपयांच्या नोटांचे चलन कमी झाले आहे.

ADVERTISEMENT

नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेली 2000 रुपयांची नोट

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व नोटा चलनातून बाद झाल्या. या चलनांऐवजी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या. रिझर्व्ह बँकेला विश्वास होता की चलनातून बाहेर पडलेल्या नोटांच्या मूल्याची 2000 रुपयांची नोट सहजपणे भरपाई करेल.

ADVERTISEMENT

2000 च्या नोटा 2017-18 या वर्षात देशात सर्वाधिक प्रचलित होत्या. यादरम्यान बाजारात 2000 च्या 33,630 लाख नोटा चलनात होत्या. त्यांची एकूण किंमत 6.72 लाख कोटी रुपये होती. 2021 मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत माहिती दिली की, गेल्या दोन वर्षांपासून 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही.

याला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, बँकांना एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा भरण्याच्या किंवा न भरण्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. कॅश व्हेंडिंग मशीन लोड करण्यासाठी बँका त्यांची स्वतःची निवड करतात. ते गरजेचे मूल्यांकन करतात. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार 2019-20 सालापासून 2000 रुपयांच्या नोटा छापल्या गेल्या नाहीत, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT