मनसेच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे; संदीप देशपांडेंनी उल्लेख केलेले ‘साहेब’ कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेत फूट पडल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडलीजात नाही. ट्विटरच्या माध्यमाने उद्धव ठाकरे यांना मनसेचे पदाधिकारी निशाणा बनवत आहेत. त्यात मनसेचे सरचिटणीससंदीप देशपांडे, गजानन काळे आणि शालिनी ठाकरे या आघाडीवर आहेत. संदीप देशपांडे यांनी कालपासून तीन ट्वीटकरत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

संदिप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेना खासदार आणि सामानाचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नाची उत्तरे दिली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले सत्ता गेली, मुख्यमंत्रीपद गेलं याचे खंत नाही. पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी हॉस्पिटलमध्ये असताना ऑपरेशनंतर गुंगीतअसताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले, असं उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले. यालाच धरून ‘अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची अडीच वर्षे “सिम्पथी” मुलाखत. असं ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी खोचक टीकाकेली आहे.

या ट्विटच्या आगोदर देशपांडे यांनी असाच खोचक ट्वीट केला आहे. एक व्यंगचित्र समान फोटो शेअर केला आहे. त्यात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे चित्र रेखाटले आहेत. त्यात ‘हे घ्या साहेबानी पाठवलेले मुलाखतीसाठी प्रश्न आणि उत्तरे’ असं संजय राऊतांच्या वर संवाद लिहला आहे. ‘बघा आता मी कशी देतो खणखणीत उत्तरे’, असं उद्धव ठाकरे म्हणताना दाखवले आहेत. तसेच या ट्विटवर ‘साहेब’ जैसा जैसा बोले, हा तैसा तैसा चाले.म्हणून यांचे आस्तित्व बुडाले. असे कॅप्शन देण्यात आले आहे.

हे वाचलं का?

आता संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये केलेले साहेब शरद पवार आहेत का? अशी देखील चर्चा होऊ लागली आहे. यापूर्वी सोमवारी संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ट्विट करत त्यावर ”अब राजा काबेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा.’ असे लिहले होते. एकूणच जर पहिले तर देशपांडे यांनी उद्धवठाकरे यांच्यावर टीका करायची एकही संधी सोडलेली नाही. तर या ट्विटच्या घाणघातात मनसेचे गजानन काळे हे पणमागे नाहीत.

गजानन काळे यांनी देखील व्यंगचित्र ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुलाखतीचाच धागा घेत गजानन काळेयांनी एक व्यंगचित्र ट्विट केले आहे. व्यंगचित्रात उद्धव ठाकरे खुर्चीवर बसलेत त्यांच्यासमोर असलेल्या आरस्यात तेस्वतःला बघत ‘हं विचार प्रश्न!’. असं म्हणताना दाखवले आहे. तर यापूर्वी शालिनी ठाकरे यांनी देखील ट्विटच्या माध्यमानेउद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT