विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले, ”पवार साहेबांनी आधीच…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Political Latest News : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड केल्याचे वृ्त्त हाती आले आहे.या निवडीनंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आणि कॉग्रेसची मान्यता मिळते का हे पाहावे लागणार आहे.कारण सध्य़ा महाराष्ट्रात कॉग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत.त्यामुळे ते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवडीला मान्यता देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (sharad pawar declare jitendra awhad new maharashtra opposition leader maharashtra politics)

ADVERTISEMENT

विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार साहेबांनी आधीच सांगितले होते आपण 6 तारखेला बोलूया पण त्याआधीच काही नेत्यांनी घाई करून हातमिळवणी केली आणि सरकारमध्ये जाऊन बसले असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.तसेच माझ्या भुमिकेवर शरद पवारांचे नेहमीच प्रेम होते.त्यांच्या प्रेमामुळेच मी अशा भूमिका घेऊ शकत होतो. त्यामुळे सोशितांच्या बाजूने उभा राहणाऱ्या चेहऱ्याला आज साहेबांनी आज विरोधी पक्षनेता केले आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

अवघड स्थितीत आपल्याला कोणी टाकलेय म्हणून अवघड स्थितीकडे बघायचे नाही, तर याउलट या स्थितीला संधीत कसे बदलायचे याकडे लक्ष द्यायचे असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.तसेच माझ्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते एकच आहेत, त्यांचे नाव शरदचंद्र गोविंदराव पवार आहे. आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे पक्ष आणि निषाणी ही कोणीही घेऊ शकत नाही, ती आमचीच आहे आणि आमचीच राहणार आहे, असा विश्वास देखील जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राला माहितीये. 25-25 वर्षे मंत्रिपद उपभोगली आहेत. अजून शरद पवार तुम्हाला काय देणार? त्यांचं सिल्व्हर ओक घर काढून तुम्हाला देणार आहे का? ज्या नेत्याने पराकाष्ठा केली. ज्यांनी तुम्हाला फोन करून सांगितलं की, महसूल मंत्री हो. तुम्हाला सांगावंही लागलं नाही. त्या माणसाला त्यांच्या या वयात… जो त्याचा अखेरचा काळ आहे. ज्या बापाने आपल्याला सगळी समृद्धी दिली. सगळे मानसन्मान दिले. त्या बापाला अशा परिस्थितीत आणणं आज माणुसकीला शोभणारं नाही, अशी टीका देखील जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच मला येण्याबद्दल कुणी विचारलं नाही. मला विचारलं नाही, ते बरं झालं. मी मेलो तरी शरद पवारांना सोडून जाणार नाही, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT