सावरकरांच्या त्यागाकडे दुर्लक्ष करू शकत नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

योगेश पांडे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचे राजकीय पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्यामुळे उद्धव ठाकरेंचीही कोंडी झाली. शरद पवारांनी मध्यस्थी केल्यानंतर महाविकास आघाडीत या मुद्द्यावर पडदा पडला. आता याच मुद्द्यावर शरद पवारांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. यावेळी त्यांनी 32 वर्षांपूर्वी संसदेत मांडलेल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या सावरकर वादाबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. राहुल गांधींच्या मतांशी तुमचा पक्ष सहमत आहे का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, “आम्ही 18 ते 20 राजकीय पक्षाचे नेते बसलो होतो. त्यावेळी झालेल्या चर्चेत कोणत्या महत्त्वाच्या समस्या आज देशासमोर आहेत, याबद्दल बोलणं झालं. त्या बैठकीत मी हे सांगितले की, आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांची जी कार्यपद्धती आहे, त्याबद्दल आपण सगळ्यांनी मिळून विचार करण्याची गरज आहे.”

सावरकरांची एक गोष्ट आवडते ती म्हणजे…; शरद पवारांची सावरकरांबद्दलची भूमिका काय?

शरद पवार पुढे म्हणाले, “आज सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही. हा जुना मुद्दा झाला आहे. सावरकरांविरोधात आम्ही लोकांनी काही बोललो होतो, ते व्यक्तिगत नव्हते, तर हिंदू महासभेच्या विरोधात होते. मात्र, दुसरी एक बाजू आहे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो त्याग सावरकरांनी केला, त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. दुसरी गोष्ट जी मी संसदेत 32 वर्षापूवी म्हणालो होतो. ते पुन्हा सांगू इच्छितो, सावरकरांची एक गोष्ट आम्हाला खूप आवडते ती म्हणजे त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोण. सावरकरांनी सार्वजनिक जीवनात काही गोष्टी अशा सांगितल्या आणि केल्या होत्या. ज्यात सामाजिक आणि वैज्ञानिक अंग होते”, असं शरद पवार म्हणाले.

हे वाचलं का?

हेही वाचा – सावरकर वाद महाविकास आघाडीला अडचणीत आणू शकतो? समजून घ्या 5 मुद्द्यांमध्ये

“सामाजिक अंग म्हणजे त्यांनी रत्नागिरीत घर बांधले आणि त्याच्यासमोर एक छोटं मंदिर बांधले. त्या मंदिरात पूजा करण्यासाठी वाल्मिकी समाजातील व्यक्तीला ठेवले. ही गोष्ट पुरोगामी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक गोष्टीबद्दल सांगितले. गाय ही उपयुक्त पशू आहे. उपयुक्तता असेल, तर त्याचा लाभ घ्या. उपयुक्त नसेल अशी स्थिती येईल, तेव्हा त्याचा अन्य वापर करावा. अशी अनेक मते आहेत, जी सावरकरांनी मांडली आहे, ती मते प्रागतिक होती. शास्त्रशुद्ध होती. त्याचे समर्थन करणे योग्य असं माझे मत होते. त्या आमच्या बैठकीत मी सांगितले की, सावरकराची ही बाजू बघुया. आज सावरकर नाहीयेत. नाहीयेत त्या लोकांबद्दलच्या गोष्टी काढणे आज त्याची आवश्यकता नाही. देशाच्या समोर सावरकरांचा मुद्दा ही समस्या नाही”, असं मत शरद पवार यांनी यावेळी मांडले.

ती राहुल गांधींची भूमिका -शरद पवार

राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले की, मी सावरकर नाही राहुल गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाही. राहुल गांधी वारंवार असं का करताहेत? त्यावर शरद पवार म्हणाले, “प्रत्येकाला स्वतःची मते मांडण्याचा अधिकार आहे की नाही. मी माझे मत मांडले, त्यांनी त्याचे मत मांडले. त्यामुळे अशी मते वाढवून समाजामध्ये कटुता वाढवू नये”, असंही शरद पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT