लाइव्ह

18th Lok Sabha Live : एनडीए सरकारची 'परीक्षा'; अधिवेशन वादळी ठरणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

18व्या लोकसभेत विरोधी बाकांवरील खासदारांची संख्या वाढली आहे.
18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू. वाचा लाईव्ह अपडेट्स
social share
google news

18th Lok Sabha First Session Live Updates : सोमवार, 24 जून रोजी पासून १८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू होत आहे. सर्व नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार असून, त्यानंतर २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. 

ADVERTISEMENT

२७ जून रोजी दोन्ही सभागृहांची (लोकसभा, राज्यसभा) संयुक्त बैठक पार पडणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधिक करणार आहेत. जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार असून, ८ बैठका होणार आहेत. 

नवे सरकार स्थापन झाल्यानंतर नीट पीजी, युजीसी नेट या दोन महत्त्वाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटीचे देशभरात पडसाद उमटले आहेत. यावेळी विरोधकांची ताकद वाढली असून, या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचे संकेत आहेत. त्याचबरोबर इतर मुद्द्यांवरूनही सरकार खिंडीत पकडण्याची विरोधकांची रणनीती आहे. त्यामुळे हे अधिवेशन सरकारसाठी 'परीक्षा'च ठरणार आहे. 

संसद अधिवेशनाचे ताजे अपडेट्स आणि महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये....

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 08:31 AM • 24 Jun 2024

    18th Lok Sabha live Updates : पहिल्या दिवशी काय काय?

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनामध्ये भर्तृहरि महताब यांना लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ देतील. त्यानंतर महताब संसद भवनात पोहोचतील. सकाळी 11 वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होईल. 

    लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंह सभागृहाच्या पटलावर निवडून आलेल्या खासदारांची यादी ठेवतील. त्यानंतर महताब सभागृह नेते म्हणून पंतप्रधान मोदी यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी बोलावतील. त्यानंतर नवनिर्वाचित खासदारांना 24,25 जून रोजी शपथ दिली जाईल. 

    बुधवारी लोकसभा अध्यक्षांची निवड

    लोकसभा अध्यक्षपदासाठी 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. 27 जून रोजी राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर 28 जूनपासून चर्चा सुरू होईल. 2 किंवा 3 जुलै रोजी पंतप्रधान मोदी या चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT