”अजित पवारांनी 20 वर्ष एक रूपयाही दिला नाही”, गिरीश महाजनांचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

big statement maharashtra politics
big statement maharashtra politics
social share
google news

अजित पवार (Ajit Pawar) यांनी 20 वर्षांच्या कार्यकाळात माझ्या मतदारसंघासाठी एक रुपयाही दिला नव्हता. त्यांनी मला आव्हानच दिले होते की,तुझ्या मतदारसंघात एक रुपयाही देणार नाही. आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला असल्याचा किस्सा भाजप आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितला आहे. गिरीश महाजन यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना हा किस्सा सांगितला. या किस्स्यासोबत गिरीश महाजन यांनी अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. (ajit pawar did not pay a single rupee for 20 years girish mahajan big statement maharashtra politics)

ADVERTISEMENT

भाजप आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) एका कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर गिरीश महाजन यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी गिरीश महाजन म्हणाले, अजित पवार यांनी 20 वर्षांच्या कार्यकाळात माझ्या मतदारसंघासाठी एक रुपयाही दिला नव्हता. त्यांनी मला आव्हानच दिले होते की,तुझ्या मतदारसंघात एक रुपयाही देणार नाही. आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला. अजित पवार शब्दाचे पक्के असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा : ‘हीच जागा योग्य होती, पण…’; अमित शाहांचं विधान ऐकून अजित पवारांनी जोडले हात

गिरीश महाजन पुढे म्हणाले, आता आम्ही एकत्रित सोबत आहोत.दादा आज माझे कौतुक करत होते.ते नेहमीच भेटलो की कौतुक करतात.तू अजून फीट आहेस असं विचारत असतात. मी नेहमी दादांना सांगतो की,मी रोज 7 ते 8 किलोमीटर पळतो आणि एक तास जिममध्ये जातो. मी बाहेरील काहीही खात नाही. खाण्या-पिण्यावर माझे खुप निर्बंध आहेत. मी हॉटेलमधलं कधी जेवत नाही. मी घरचचं जेवण जेवतो. प्रवासात असलो तरीपण एखाद्या कार्यकर्त्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून डब्बा घेऊन गाडीतच जेवण करतो, असे सांगत गिरीश महाजन यांनी त्यांच्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे.

हे वाचलं का?

तसेच अजित दादांचे कौतुक करताना गिरीश महाजन म्हणाले की, दादा सुद्धा सकाळी उठून दररोज चालायला जातात. मी नागपूरलाही त्यांना बघितले आहे. दादा सकाळी 5 वाजता उठून सकाळी 6 वाजता लोकांना भेटतात. राजकारणात दादा पहिले असे नेते असतील ज्यांचा सकाळी 6 वाजता दिनक्रम सुरु होतो. दादा प्रत्येक गोष्ट तंतोतंत पाळतात. त्यामुळे त्यांची तब्येतही चांगलीच आहे,असे देखील गिरीश महाजन म्हणाले आहेत.

हे ही वाचा :अमित शाह पुण्यात आल्यानंतर अजित पवारांनी काय केलं कौतुक?

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत कोणी काहीही बोलू द्या. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य नेतृत्वाखाली आम्ही तिघे एकत्र लढणार आहोत. इतकचं नाही तर आम्ही 48 च्या 48 जागा जिंकणार आहोत. एकही जागा आम्ही राज्यात हरणार नाही. हे तुम्ही आज लिहून घ्या. अंडरलाईन करा आणि निकाल लागल्यावर मला परत सांगा, असे थेट आव्हानच गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिले. तसेच राज्यात विरोध पक्ष असलाच पाहिजे कारण लोकशाही आहे. त्यामुळे बोटावर मोजण्या इतका का होईना, तो निश्चित राहिल, असे देखील गिरीश महाजन म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT