Amit Thackeray Mahim Assembly Election Results Live Updates: अमित ठाकरे पराभूत, किती मतं मिळाले?
Amit Thackeray Mahim Assembly Election Results Live Updates |दादर-माहिम विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. इथे अमित ठाकरे यांना दिलेली उमेदवारी या चर्चेचं कारण होती. मात्र आता अमित ठाकरेंचा संभाव्य पराभव चर्चेचं कारण होऊ शकतो.
ADVERTISEMENT
Amit Thackeray Mahim assembly election 2024 results live updates: मुंबई: अमित ठाकरे माहीम विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल लाइव्ह अपडेट: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माहिम या मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा होती. कारण याच मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढवत होते.
ADVERTISEMENT
आपला पुत्र निवडून यावा यासाठी राज ठाकरेंनी आपली सर्व ताकद इकडे पणाला लावली आहे. पण असं असलं तरी त्यांच्यासाठी हे आव्हान सोप्पं नाही. कारण मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघातील आमदार असलेले शिवसेनेचे (शिंदे गट) सदा सरवणकर यांचं तगडं आव्हान आहे. यासोबतच शिवसेना (UBT) महेश सावंत यांनीही कडवी झुंज दिली आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election Results 2024 : Maharashtra Election 2024 All Exit Poll: इथे पाहा सगळे Exit Poll, नेमकी कोणाकडे महाराष्ट्राची सत्ता?
त्यामुळे या निकालाकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमकं काय घडतंय याचे क्षणाक्षणाचे अपडेट आम्ही आपल्याला देणार आहोत.
हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election Results 2024 : राज्यात महायुतीचा झेंडा फडकणार! MVA ला फक्त 'इतक्या' जागा मिळणार, 'Chanakya Exit Poll'ने उडवली खळबळ
अशाच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल हे आपल्या mumbaitak.in या वेबसाइटवर पाहता येतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 05:06 PM • 23 Nov 2024
Amit Thackeray MNS Assembly Election Results LIVE : "कदाचित जनतेच्या मनात...", पराभवानंतर राज ठाकरेंचा लेक काय म्हणाला?
"माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे…आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो. मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे. माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती… कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून, ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची - जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं. आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहिम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी २४ तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही. मी वचन देतो - तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन… कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू!" असं म्हणत अमित ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
- 02:39 PM • 23 Nov 2024
Amit Thackeray MNS Assembly Election Results LIVE : अमित ठाकरेंना किती मतदान?
माहीम मतदारसंघात 18 व्या फेरीमध्ये झालेलं मतदान
- अमित ठाकरे (मनसे ):30703
- महेश सावंत (ठाकरे गट ):46579
- सदा सरवणकर (शिंदे गट ):45239
- 02:37 PM • 23 Nov 2024
Amit Thackeray MNS Assembly Election Results LIVE : राज ठाकरेंचा लेक पराभूत, उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराकडून धोबीपछाड
माहिममध्ये महेश सावंत विजयी झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा विजय एका अंगाने महत्वाचा असणार आहे. कारण इथे अप्रत्यक्षपणे त्यांचा लढा हा अमित ठाकरे आणि पर्यायाने राज ठाकरे यांच्याशी होता. त्यामुळे आता राज ठाकरे अमित ठाकरेंच्या माहिममधील पराभवानंतर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
- 01:46 PM • 23 Nov 2024
Amit Thackeray MNS Assembly Election Results LIVE : माहिमधून ठाकरेंच्या उमेदवाराला 39 हजार मतं, तर अमित ठाकरे...
माहिम विधानसभेमध्ये सध्या सुरू असलेल्या मतमोजणीनुसार 15 व्या फेरीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांना 40828 मतं, सदा सरवणकर यांना 39,649 मतं तर अमित ठाकरे यांना 27,324 मतं आहेत. त्यामुळे इथे ठाकरेंच्या उमेदवाराचा विजय जवळपास आहेत.
- 12:53 PM • 23 Nov 2024
Amit Thackeray MNS Assembly Election Results LIVE : राज ठाकरेंचा निर्णय चुकला?
दादर-माहिम विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. इथे अमित ठाकरे यांना दिलेली उमेदवारी या चर्चेचं कारण होती. मात्र आता अमित ठाकरेंचा संभाव्य पराभव चर्चेचं कारण होऊ शकतो. यावेळी राज ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय चुकला का अशीही चर्चा होते आहे. कारण राज ठाकरे यांनी स्वत: सांगितलं होतं की, काही लोकांनी अमित ठाकरे यांना भांडूपमधून उमेदवारी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती.
- 11:04 AM • 23 Nov 2024
Amit Thackeray MNS Assembly Election Results LIVE : राज ठाकरेंचा लेक थेट तिसऱ्या क्रमांकावर
माहिममध्ये राज ठाकरेंचा लेक अमित ठाकरे पडणार असल्याचे चिन्ह आहेत. या मतदारसंघात महेश सावंत हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे अमित ठाकरे हे तब्बल तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचं दिसतंय.
- 09:29 AM • 23 Nov 2024
Amit Thackeray MNS Assembly Election Results LIVE : माहिममध्ये महेश सावंत आघाडीवर
दादर-माहिममध्ये महेश सावंत आघाडीवर असल्याचं दिसतंय. या मतदारसंघामध्ये होणाऱ्या तिहेरी लढतीवर सध्या राज्याचं लक्ष लागून आहे. या लढतीबद्दल बोलताना राजकीय विश्लेषकांकडून महेश सावंत हेच विजयी होतील असं चित्र आहे.
- 08:27 AM • 23 Nov 2024
Amit Thackeray MNS Assembly Election Results LIVE : माहिममध्ये अमित ठाकरे आघाडीवर, मनसेचा झेंडा फडकणार?
दादर-माहिम विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे आघाडीवर
- 07:16 AM • 23 Nov 2024
Amit Thackeray MNS Assembly Election Results LIVE : माहिममधील मुस्लिम मतांचा फायदा कुणाला?
दादर-माहिम मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतांचा टक्का सुद्धा आहे. त्यामुळे हा टक्का विजयासाठी महत्वाचा असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम बांधवांकडून येणाऱ्या प्रतिक्रया पाहिल्यास त्यांना उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आवडतंय असंच दिसतंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार महेश सावंत यांना या भागात फायदा होईल असं दिसतंय.
- 06:55 AM • 23 Nov 2024
Amit Thackeray MNS Assembly Election Results LIVE : भाजप कार्यकर्त्यांचा पाठिंबा अमित ठाकरेंसाठी गेम चेंजर?
राज्याचं लक्ष लागलेल्या दादर-माहिम विधानसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या दिवशीच मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा दिलेला दिसला. या मतदारसंघातील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यावेळी राज ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली होती. त्यामुळे अमित ठाकरेंना याचा नेमका किती फायदा होतो ते पाहणंही महत्वाचं असणार आहे.
- 06:47 AM • 23 Nov 2024
Amit Thackeray MNS Assembly Election Results LIVE: दादर-माहिममध्ये कुणाचा झेंडा फडकणार?
मुंबई : दादर-माहिम मतदारसंघ हा तिकीट वाटपापासूनच चर्चेत आहे. या मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे, उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर मैदानात आहे. या मतदारसंघात ऐन मतदानाच्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचा मनसेला मिळालेला पाठिंबा अमित ठाकरेमसाठी महत्वाचा ठरू शकतो. तर दुसरीकडे मुस्लिम मतदान ठाकरेंच्या बाजूने असल्याचं दिसतंय. त्यामुळे इथली लढत कुणासाठी सोपी हे आकड्यांमधूनच स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT