"महाराष्ट्रात गुंडांचं राजकारण, त्या आरोपीला...", कैलास बोराडे मारहाण प्रकरणावरून अंजली दमानीया संतापल्या!

मुंबई तक

Anjali Damania Latest Tweet :  जालना जिल्ह्यात भोकरदान तालुक्यातील अनवा गावात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला.

ADVERTISEMENT

Anjali Damania Latest Tweet
Anjali Damania Latest Tweet
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कैलास बोराडे मारहाण प्रकरणावरून अंजली दमानीयांचं मोठं ट्वीट

point

"संशयित सोनू उर्फ भागवत दौड याने...."

point

अंजली दमानीया ट्वीटरवर नेमकं काय म्हणाल्या?

Anjali Damania Latest Tweet :  जालना जिल्ह्यात भोकरदान तालुक्यातील अनवा गावात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला. लोखंडी सळईने चटके देऊन त्याला अमानुष मारणाह करण्यात आली. याप्रकरणी आरोपी भागवत दौडला पोलिसांनी अटक केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते नवनाथ दौड यांच्या सांगण्यावरून त्यांच्या भावाने म्हणजे भागवतने कैलासला मारहाण केल्याचं समजते. याप्रकरणी मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. अशातच सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी याप्रकरणी ट्वीट करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केलीय.

अंजली दमानीया ट्वीटरवर काय म्हणाल्या ? 

"महाराष्ट्रात एका नंतर एक भयानक कृत्य..कैलास बोराडे नावाच्या माणसाला अतिशय भयानक पद्धतीने चटके दिले. काय हे गुंडांचे राजकारण झाले आहे. संशयित सोनू उर्फ भागवत दौड याने माजी .प. सदस्य तथा शिवसेना ठाकरे गटाचा तालुकाप्रमुख नवनाथ दौड यांच्या सांगण्यावरुन कैलासला पकडले. यानंतर पेटत्या चुलीमध्ये एक मोठा रॉड टाकून तो तापवला. तापलेल्या रॉडने कैलासच्या पायाला, पोटाला, पाठीला, मानेवर,गळ्याजवळ, दंडावर, डाव्या तळहातावरचटके देत संशयितांनी जीवे मारण्याच्या प्रयत्नकेला. पण जालन्याचे एसपी श्री अजय भंसाल आणि कलेक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी ताबडतोब दाखल घेतली, आरोपीला अटक झाली व ३०७ चा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीला खूप कडक शिक्षा झाली पाहिजे". 

हे ही वाचा >> "घटना अंधारात कोपऱ्यात झाली नाही, त्या मुलीला...", पुणे बलात्कार प्रकरणावर सुप्रिया सुळेंचं खळबळजनक विधान!

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास बोराडे एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी जुन्या वादातून आरोपी दौडने कैलाससोबत हुज्जत घातली. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने कैलासला मारहाण करत तापलेल्या लोखंडी रॉडने चटके दिले. याप्रकरणी पारध पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिवसेना ठाकरे गटाचा तालुकाध्यक्ष नवनाथ दौड आणि त्याच्या भावा विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, राजकीय हेतूने मला संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं नवनाथ दौड म्हणाले आहेत. 

हे ही वाचा >> IIT बाबाकडे सापडला गांजा! पोलिसांनी अटक करताच म्हणाला 'महाकुंभचा प्रसाद', नेमकं घडलं तरी काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp