Ashok Chavan : आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार, 'पोटदुखी होत असेल तर जंताची गोळी...'

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ashish shelar reply uddhav thackeray on bjp president from congress statement maharashtra politics
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपची घौडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर जंताची गोळी घ्या आणि जंतापासून मुक्त व्हा, असा टोला आशिष शेलारांनी ठाकरेंना लगावला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शेलारांनी ठाकरेंच्या नेत्यांची उडवली खिल्ली

point

भास्कर जाधवांनी पक्षाचा दशावतार केला

point

संजय राऊतांनी पक्षाची "राष्ट्रवादी" केली

Ashish Shelar Reply Uddhav Thackeray : 'कधीकाळी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केलेला भाजप आज काँग्रेसव्याप्त झाला आहे. उद्या भाजप अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल', अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी छत्रपती  संभाजी नगरमधून भाजपवर केली होती. या टीकेला आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार(Ashish Shelar)  यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपची घौडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर जंताची गोळी घ्या आणि जंतापासून मुक्त व्हा, असा टोला आशिष शेलारांनी ठाकरेंना लगावला आहे.  (ashish shelar reply uddhav thackeray on bjp president from congress statement maharashtra politics) 

ADVERTISEMENT

आशिष शेलार यांनी एक्स सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर ट्वीट करून ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी आशिष शेलारांनी ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांची नावे घेऊन त्यांची खिल्ली उडवली आहे. संजय राऊतांनी पक्षाची "राष्ट्रवादी" केली, भास्कर जाधवांनी पक्षाचा दशावतार केला, सुषमा अंधारेंनी पक्षाची "समाजवादी सेना" केली, तर प्रियांका चतुर्वेदी पक्षाला "पेज थ्री" केले, आदेश बांदेकर पक्षाचा "होम मिनिस्टर शो" केला, असा शेलारांनी हल्ला चढवत उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे काय होईल, आमचे अध्यक्ष कोण होईल याची चिंता करु नये, असा सल्ला शेलारांनी ठाकरेंना दिला. 

◆ मूळ शिवसैनिक नसलेल्या
बाहेरून आलेल्या संजय राऊत यांना घेऊन ज्यांनी आपल्या पक्षाचे "राष्ट्रवादी" केले.

◆ उलटे सूर्य नमस्कार घालणाऱ्या भास्कर जाधव यांना घेऊन पक्षाच्या दुर्दैवाचे दशावतार केले.

◆ बाहेरून आलेल्या सुषमा अंधारेंना घेऊन आपल्या पक्षाची "समाजवादी सेना" केली.

◆…

हे वाचलं का?

हे ही वाचा : Bhavana Gawali : शिंदेंच्या खासदाराला शेतकऱ्यांनी घेतलं फैलावर

तसेच भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर राज्यात शासनातर्फे जंत विरोधी मोहीम आहेच..एक जंताची गोळी घ्या आणि जंतापासून मुक्त, आणि सशक्त राजकीय भविष्य?, असा टोला शेलारांनी ठाकरेंना लगावला होता. 

ADVERTISEMENT

ठाकरे काय म्हणाले होते? 

ADVERTISEMENT

'कधीकाळी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केलेला भाजप आज काँग्रेसव्याप्त झाला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना भाजपत प्रवेश, हीच मोदी गँरंटी आहे. उद्या भाजप अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल', असा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं होतं. 

हे ही वाचा : Ashok Chavan : 'मुंबई काँग्रसचे अध्यक्ष...' चव्हाण बोलून फसले मग फडणवीसांनी सुधारली चूक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT