बाळा नांदगावकरांनी कुंभमेळ्यातून आणलेलं गंगेचं पाणी Raj Thackeray का प्यायले नाहीत?
Raj Thackeray Speech: महाकुंभ मेळ्यात दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावत गंगा स्नान करण्यासाठी पाण्यात डुबकी मारली. पवित्र स्नान व्हावं यासाठी लाखोंच्या संख्येत भाविक महाकुंभ मेळ्यात पोहोचले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न

राज ठाकरेंनी महाकुंभमेळ्याबाबत केलं मोठं विधान!

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Speech: महाकुंभ मेळ्यात दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावत गंगा स्नान करण्यासाठी पाण्यात डुबकी मारली. पवित्र स्नान व्हावं यासाठी लाखोंच्या संख्येत भाविक महाकुंभ मेळ्यात पोहोचले होते. राजकारणी, कलाकार, साधू-संतांसह तमाम भक्तांनी शाही स्नान करण्यासाठी महाकुंभ मेळ्यात उपस्थिती दर्शवली. अशातच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही कुंभ मेळ्यातून गंगा नदीचं पाणी आणलं होतं. परंतु, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ते पाणी प्यायले नाहीत. खुद्द राज ठाकरे यांनीच याबाबत मोठं विधान केलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन सोहळा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली.
राज ठाकरे मनसेच्या वर्धापनदिनी नेमकं काय म्हणाले?
आज फार काही बोलणार नाही.20 दिवसांवर गुढी पाडव्याच्या मेळावा आहे. तिकडे दांडपट्टा फिरवणार असेल तर इथे चाकू सुरी कशाला काढू. राजकारणाचा चिखल झाला आहे. एकमेकांची डोकी फोडत आहेत. हे लोकांना समजत नाही. सध्याचं राजकारण पाहिलं असता त्याला हंटरने फोडला असता. विषय भरकटवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी घडवत आहेत. दोन पुरुष एकत्र आले तरी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. अरे इथे महिला कुठेय. महिला दिन हा जिजाऊच्या नावाने ओळखला पाहिजे. ज्या जिजाऊच्या मनात स्वराज्य होतं. त्या जिजाऊंनी मुलाकडून स्वराज्य निर्माण केलं.
हे ही वाचा >> Mazi Ladki Bahin Yojana: प्रचंड मोठी घोषणा, महिलांना मिळणार तब्बल 3000 रुपये!
बाळा नांदगावकर यांनी कमंडलमधून पाणी आणलं ते मी पिणार नाही हे स्पष्ट सांगितलं. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिले. अनेक जण खाजवत होते आणि हे बाळा नांदगावकर म्हणतायत पाणी घ्या..आताच कोरोना गेलाय. त्याने तिथं काही केलं की सर्व जण उडी घेतात, असं म्हणत राज ठाकरेंनी कुंभ मेळ्यावरून टोला लगावला. एक नदी या देशात स्वच्छ नाही. राजीव गांधी असल्यापासून मी ऐकत आहे, गंगा साफ होणार. राज कपूर यांनी चित्रपट आणला, चित्रपटातील गंगा असेल तर आम्ही ही. अंध-श्रद्धतेतून बाहेर या, असंही आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.