बीड पोलिसांनी अखेर खोक्या भोसलेला केली अटक, खोक्याला 'इथून' उचलला
बीड पोलिसांनी सतीश उर्फ खोक्या भोसले याला अखेर अटक केली आहे. 6 दिवसांपासून फरार असलेला खोक्या भोसले याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बीड: बीडच्या शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याला अखेर आज (12 मार्च) अटक करण्यात आली आहे. बीडमधील ढाकणे पिता-पुत्रांना अमानुष मारहाण प्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. सतीश भोसले गेल्या सहा दिवसापासून फरार होता त्याच्या शोधासाठी दोन पथक तयार करण्यात आले होते. अखेर त्याला आज सकाळी प्रयागराज पोलिसांनी अटक केली आहे.
खोक्याला पकडण्यासाठी पोलिसांनी नेमकं काय-काय केलं?
भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेने अनेक गुन्हे केल्याचं समोर येत आहे. त्याने केलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर तो पोलिसांना शरण जाण्याऐवजी फरार झाला होता. याच मुद्द्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर देखील टीका केली जात होती. खोक्या भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याने त्याला पाठिशी घातलं जात आहे अशी टीका विरोधकांकडून केली जात होती.
हे ही वाचा>> Satish Bhosle: 'खोक्या'ला पकडण्यासाठी जाळ टाकलाय, पोलिसांचा 'हा' प्लॅन पाहिला का?
मात्र, आता याच खोक्या भोसलेच्या बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 'खोक्या' हा गेल्या सहा दिवसापासून फरार होता. तो सातत्याने त्याचं लोकेशन बदलत होता. पण अखेर आता त्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेसाठी बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांची देखील मदत घेतली होती. दरम्यान, खोक्याला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यास सुरुवात केली होती.
खोक्याची प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी कोणी दिलेलं पत्र?
आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी खोक्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचे पत्र पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्याकडे दिलं होतं.
हे ही वाचा>> Satish Bhosle: वृद्धाला अर्धनग्न करुन बॅटने मारलं, दात पाडले... आमदार सुरेश धसांचा तो 'शागीर्द' कोण?
सतीश भोसले याच्याकडे कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी तसेच आलिशान गाड्या आहेत. याबरोबरच तो पत्ते खेळण्याचा शौकीन होता. त्यातून त्याने लाखो रुपयांची माया गोळा केल्याची माहिती आहे.
अहिल्यानगर, आष्टी, पुणे, बीड जिल्ह्यांमध्ये तो पत्ते खेळायचा. तसेच राज्यात होत असलेल्या चोऱ्या, चोरी झालेले सोने यातून त्याने माया गोळा केली असल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. यात आमदार सुरेश धस यांचा देखील समावेश असून त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राम खाडे यांनी केली होती.