Devendra Fadnavis: ‘काळं तोंड, नालायक.. मालक’, फडणवीस-खडसेंमध्ये पार जुंपलीच; दोघंही..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis, who came to Jalgaon, strongly criticized Eknath Khadse. On the other hand, Khadse has also responded to Fadnavis in very harsh words.
Devendra Fadnavis, who came to Jalgaon, strongly criticized Eknath Khadse. On the other hand, Khadse has also responded to Fadnavis in very harsh words.
social share
google news

Eknath Khadse: जळगाव: ‘तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ थोडी आली असती का? आता नवीन मालक सांगतो तसं करावं लागतं.’ अशी अत्यंत बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि आपलेच आधीचे वरिष्ठ सहकारी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर केली. तर याच बोचऱ्या टीकेला उत्तर देत खडसे म्हणाले की, ‘मी बरेच वर्ष देवेंद्र फडणवीसांचा मालक होतो. मी सांगेल तो कागद ते मला आणून द्यायचे.’ अशा तिखट शब्दात खडसेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. (bjp dcm devendra fadnavis jalgaon strongly criticized ncp mlc eknath khadse very harsh words news on maharashtra politics)

ADVERTISEMENT

जळगावमध्ये आज (27 जून) शासन आपल्‍या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्य‍ामुळे या कार्यक्रमासाठी जळगावात आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काळे झेंडे दाखविण्यात येणार होते. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याआधीच एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

हे ही वाचा>> PUNE: ‘तो’ देवदूतच… कोयत्याचा वार झेलला, तरुणीला जीवदान देणारा लेशपाल जवळगे आहे तरी कोण?

कापूस प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे खडसेंनी जाहीर केलं होतं. पण पोलिसांनी त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतलं होतं.

हे वाचलं का?

‘तोंड काळं केलं नसतं तर आज खडसे…’, फडणवीसांनी डिवचलं

दरम्यान, जळगाव विमानतळावर पोहचलेल्या देवेंद्र फडणवीसांनी खडसेंच्या आंदोलनाबाबत जेव्हा माध्‍यमांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की, ‘माझं तर मत आहे की, कोणाचीही धरपकड करण्याची आवश्यकता नाही. काळे झेंडे दाखवून त्यांना काय मिळणार आहे? खरं तर असं झालंय की, खडसेंना आता नवीन मालक मिळालाय. त्या नवीन मालकाने सांगितलं तसं ते वागतात. आता जमिनीमध्ये जर त्यांनी तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ थोडी आली असती? ते परिवारात राहिले असते.’

‘नवीन मालकाकडे थोडी जावं लागलं असतं? त्यामुळे अशा काळ्या झेंड्यांना थोडी घाबरत असतो आम्ही. असे काळे झेंडे किती दाखवले आम्ही जनतेचे लोकं आहोत. जनतेकरिता काम करतो. जनतेला फायदा देण्याकरिता आलो आहोत. जळगावची जनता आमच्यासोबत आहे.’ अशी झोंबणारी टीका फडणवीसांनी केली.

ADVERTISEMENT

‘मी बरेच वर्ष फडणवीसांचा मालक होतो..’ खडसेंचं तिखट प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीसांनी बोचरी टीका केल्याचं समजताच एकनाथ खडसेंनी देखील त्यांना अतिशय तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ‘मला वाटतं.. देवेंद्र फडणवीसांचा मालक मी बरेच वर्ष होतो. मी सांगायचो त्याप्रमाणे ते करायचे. कारण मी विरोधी पक्षनेता होतो, मी पक्षाचा नेता होतो.. त्यावेळी मी देवेंद्रजींना सांगायचो.. बाबा रे हा कागद आणा.. लगेच देवेंद्रजी मला कागद द्यायचे. देवेंद्रजींना म्हणायचो.. मला हे ब्रीफ करून द्या ते मला ब्रीफ करायचे.. सारं जर का मी देवेंद्रजींकडून शिकलो किंवा करून घेतलं तर त्यांचा मालक मी होतो का? ही सहकाऱ्याची भूमिका आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> PUNE: ‘आता काय गचांडी धरु का?’ म्हणणाऱ्या अजितदादांचा चढला पारा, फडणवीसांवर थेट वार

‘देवेंद्रजींनी मधल्या कालखंडामध्ये अजित पवारांना काही दिवसांसाठी, काही तासासाठी आपल्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं आणि त्यांच्याबरोबर संसार केला.. मग अजित पवार त्यांचे मालक होते का? मग मालक आता का बदलवून टाकला. त्या काळात का मालक बदलला.. अशा गोष्टी बोलणं म्हणजे बालिशपणा आहे. अशा गोष्टींपेक्षा आपलं कर्तृत्व सिद्ध करा… कापसाला भाव द्या..’

‘कोणाचं तोंड काळं केलं आणि काय केलं हे जगाला माहिती आहे.. ते कशाला बोलत राहता.. नालायक असेल तर 40-42 वर्ष मी पक्षात होतो. अशा नालायक माणसाच्या हाती तुम्ही का काम करत राहिले इतके वर्ष?’, असं म्हणत खडसेंनी फडणवीसांनाच खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT