"गुंडगिरी दहशत संपवण्यासाठीच मी राजकारणात...", काळे झेंडे दाखवल्यानंतर सुरेश धस यांनी मुंडे समर्थकांना दिला इशारा
Suresh Dhas Press Conference : परळीच्या दौऱ्यावर असताना भाजप आमदार सुरेश धस यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवले. परळी शहरात धस यांच्याविरोधात मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धनंजय मुंडे समर्थकांनी सुरेश धस यांना दाखवले काळे झेंडे

"पोलिसांनी आंदोलकांना पाबंदी घातली, आता पुढे..."

सुरेश धस माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?
Suresh Dhas Press Conference : परळीच्या दौऱ्यावर असताना भाजप आमदार सुरेश धस यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवले. परळी शहरात धस यांच्याविरोधात मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिरसाळा येथेही सुरेश धस यांच्या ताफ्यासमोर मुंडे समर्थकांनी विरोध प्रदर्शन केलं. यावर सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय. धस म्हणाले, "आष्टीला आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवू. मात्र लोकशाही मार्गाने रस्त्याच्या कडेला उभे राहून.. ही लोकशाही नाही तर ठोकशाही आहे. जेलमध्ये गेले असताना देखील यांना कळत नाही मग काय म्हणावं.. परळी पोलिसांनी आंदोलकांना पाबंदी घातली. आता पुढे पाहतो कुणाकुणाला पाबंदी घालतात. मी पाच टर्म आमदार आणि राज्यमंत्री राहिलेला एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. माझ्या गाडी समोर अशाप्रकारचे पोरकटपणाचे लक्षण..आम्ही यांच्यासाठी कायतरी करतो, असं दाखवण्याची ही स्पर्धा आहे. ही गुंडगिरी दहशत संपवण्यासाठीच मी राजकारणात उतरलो आहे."
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय. तुम्हाला काळे झेंडे दाखवायचेत..दाखवा ना तुम्ही..साईडला उभे राहून झेंडे दाखवा. आमचा निषेध करा. पोलिसांच्या समोर एक जणाने दगड उचलला. या लोकांची दगड उचलण्यापर्यंत मजल जाते. इथले पोलीस आणि जे गुंड लोक आहेत..परळीत जे 10-12 लोक होते. पोलिसांनी उचलायला सुरुवात केली, तर दोन राहिले. माजी पालकमंत्री यांच्या या भागात लोक कशापद्धतीने वागतात. मी पाच टर्म आमदार आणि राज्यमंत्री राहिलेला एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. माझ्या गाडी समोर अशाप्रकारचे पोरकटपणाचे लक्षण..आम्ही यांच्यासाठी कायतरी करतो, असं दाखवण्याची ही स्पर्धा आहे. ही गुंडगिरी दहशत संपवण्यासाठीच मी राजकारणात उतरलो आहे", असंही सुरेश धस म्हणाले.
हे ही वाचा >> Amit Shah : "राष्ट्रासमोर दोन संकल्प ठेवले आहेत, या देशाला 2047 पर्यंत...", पुण्यात अमित शाहांचं सर्वात मोठं विधान!
सुरेश धस यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मराठ्यांच्या संघर्षासाठी मैदानात उतरावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावर बोलताना धस म्हणाले, ते आमचे दैवत आहेत. दैवतावर मी काहीही बोलणार नाही. शिरसाळा गावाचं मी अनेक वेळा नाव घेतलेलं आहे. इथे मार्केट कमिटीनं चुकीच्या ठिकाणी (गायरानावर) गाळ्याचं बांधकाम केलेलं आहे. मार्केटला दिलेली जागा एकदम पाठीमागे आहे. 17 सदस्यांपैकी 14 जणांची घरं अतिक्रमणात आहेत, असंही धस यांनी म्हटलं आहे.