Suresh Dhas : सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्यात काय चर्चा झाली? सुरेश धस म्हणाले, "या लोकांना फाशी होईपर्यंत..."
Suresh Dhas Press Conference: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

"भेट जरी झाली असली, तरी लढ्याबाबत..."

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
Suresh Dhas Press Conference: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे धस यांनी मुंडेंचीच भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. मनोज जरांगे पाटील यांनीली सुरेश धस यांच्यावार नाराजी व्यक्त केली आहे. अशातच सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्या भेटीमागचं कारण सांगितलं आहे.
सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत म्हणाले, "प्रदेशाध्यक्षांच्या इथे मला स्वत:ला त्यांनी जेवायला बोलावलं होतं. अचानकपणे धनंजय मुंडे साहेब तिथे आले. आमच्यात अर्धा तास चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष हे माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. त्यांनी आम्हाला विचारलं होतं की हे मिटतंय का? पण मी क्लिअर सांगितलं मनभेद नाहीत मतभेद आहेत आणि या प्रकरणाच्या बाबतीत मी माघार घेणार नाही, हे त्यांना मी त्या बैठकीत स्पष्ट सांगितलं. ही बाब पंधरा-वीस दिवसांपूर्वीची आहे. एखाद्या माणसाला रात्री रुग्णालयात अॅडमिट केलंय आणि पुन्हा माघारी आणलंय. मग आपली संस्कृती आहे, त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो. याच्या व्यतिरिक्त आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही".
हे ही वाचा >> Manoj Jarange: सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीनंतर मनोज जरांगे संतापले! म्हणाले, "समाजाच्या बांधवाचा खून केलाय, तुम्ही त्याला..."
मी त्यांना परवा भेटलो. पण काल मी आणखी एक काम केलंय. 73 कोटी रुपयांचा घोटाळा, बोगस बिलं काढली त्याचं पत्र काल दुपारी तीन वाजता अजितदादांना दिलं. काल मी स्वत: कृषी कार्यालयात गेलो होतो. कृषी विभागात जो घोटाळा झालेला आहे, त्याचं साडेचार हजार पानांची कागदपत्रे मी घेतली. आमच्यात वेगळं काही असतं तर मी कशाला कागदपत्रे घेतली असती. यामध्ये कुठेही गैरसमज करू नका. आज सकाळपासून दोनदा-तिनदा धनंजय देशमुख आणि त्यांचे महुणे यांच्याशी मी बोललोय, असंही धस म्हणाले.
हे ही वाचा >> Suresh Dhas : सुरेश धस-धनंजय मुंडे यांची भेट, साडेचार तास चर्चा? बावनकुळे आणि धस काय म्हणाले?
"भेट जरी झाली असली, तरी लढ्याबाबत मी शंभर टक्के संतोष देशमुख यांच्यासोबत आहे. आज राहील आणि या लोकांना फाशी होईपर्यंत सुद्धा राहील. मी फक्त त्यांची विचारपूस करायला गेलो होतो. विचारपूस करायला जाणं, यात गैर काय आहे असं नाही. लोकांनी यामध्ये अजिबात गैरसमज करून घेऊ नये. ते मला म्हणाले माझा सहभाग नाही. मी म्हणाले तुमचा सहभाग आहे की नाही, हे तपासात निष्पन्न होईल. तपासात निष्पन्न झाल्यानंतर तुम्ही जर दोषी आढळला नाहीत, तर नंतरचा प्रश्न आहे तो..आताचा नाही. मला असं वाटतं माणुसकीच्या नात्यानं भेटायला जाणं गैर नाही, असं मोठं विधान सुरेश धस यांनी केलं आहे.