Lok sabha 2024: भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार, अश्लील व्हिडीओप्रकरणी घेतली शपथ
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केल्या नंतर आता बाराबंकीचे खासदार उपेंद्र रावत यांनी माघार घेतली आहे. कारणही तसंच घडलं आहे, कारण त्यांचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्यांनी हे जाणीवपूर्वक केल्याचे सांगत हे खोटं आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मी निवडणूक लढविणार नाही असंही त्यांनी म्हटले आह.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार
अश्लील व्हिडीओप्रकरणी भाजप खासदाराने घेतली शपथ
Uttar Pradesh News : भारतीय जनता पक्षाकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी अनेकांना धक्का बसला आहे. बाराबंकी जिल्ह्यातील राजकारणातही पहिली यादी जाहीर होताच खळबळ उडाली असली तरी याठिकाणी भाजपने पुन्हा एकदा खासदार उपेंद्र सिंह रावत यांच्या नावाची घोषणा करून राजकारणात अनेकांना धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
मात्र त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता त्यांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळेच लखनऊला लागून असलेल्या बाराबंकी जिल्ह्यातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे. कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर आता त्यांनीही मोठी घोषणा केली आहे.
निवडणूक लढविणार नाही
व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत बोलताना उपेंद्र सिंह रावत यांनी थेट सांगितले आहे की,आपण जोपर्यंत या प्रकरणातून निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केली आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Video : बापरे! माऊथ फ्रेशनर खाल्ल्याने तोंडातून आलं रक्त
याबाबत ट्विट करून त्यांनी म्हटले आहे की, जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो एडिट केला असून जोपर्यंत मी या प्रकरणातून निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण निवडणूक लढविणार नाही असं जाहिरपणे त्यांनी सांगितले आहे.
सर्व व्हिडीओ बनावट
सध्या सोशल मीडियावर या प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मात्र हा व्हिडीओ भाजप खासदार उपेंद्र सिंह रावत यांचा असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच हे सर्व व्हिडीओ अश्लील आहेत. त्यावर बोलताना रावत यांनी सांगितले की, हे सर्व व्हिडीओ बनावट असल्याचे रावत यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप खासदार उपेंद्र सिंह रावत यांचे नाव भाजपकडून शनिवारी घोषित करण्यात आले. त्यानंतर 24 तासांच्या आत त्यांचा हा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
ADVERTISEMENT
एडिट करून व्हायरल
हा प्रकार घडल्यानंतर रावत यांचे खाजगी सचिव दिनेश चंद्र रावत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याविषयी सांगितले की, त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा व्हिडीओ एडिट करून व्हायरल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
याप्रकरणी खासदार उपेंद्र सिंह रावत यांच्या या व्हिडीओ प्रकरणी आता त्यांचे खाजगी सचिव दिनेश चंद्र रावत यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, खासदारांविरुद्ध व्हायरल झालेले ते अश्लील व्हिडीओ एडिट केले असून खासदारांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे व्हिडीओ व्हायरल केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा >> शिंदेंच्या आमदाराचा बचत गटांसाठी दंडाचा फतवा, रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT