Devendra Fadnavis: भाजप नेत्यांना फडणवीसांनी पुन्हा दिलं दाखवून... तेच महाराष्ट्र BJP चे बॉस!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांची नेमकी काय खेळी?
देवेंद्र फडणवीसांची नेमकी काय खेळी?
social share
google news

Devendra Fadnavis BJP: मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने महाराष्ट्रातील 20 मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. ज्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. पण असं असलं तरी भाजपच्या यादीवर आपण जर बारकाईने नजर टाकली तर त्यातून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसून येते की, महाराष्ट्र भाजपचे बॉस हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हेच आहेत. (by showing that devendra fadnavis has given bjp leaders again he is the boss of maharashtra bjp)

ADVERTISEMENT

2022 साली महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. तेव्हापासून अशी चर्चा सुरू होती की, देवेंद्र फडणवीस यांचे पंख भाजपचं केंद्रीय नेतृत्व कापत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जी महाराष्ट्रातील यादी जाहीर केली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा असल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फडणवीसांना आव्हान उभं करू शकणारे नेतेच फडणवीसांनी थेट दिल्लीला पाठविण्याचा प्लॅन केला आहे. 

2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा शपथ घेतली ती भाजपमधील अनेकांसाठी आश्चर्याची बाब होती. कारण पक्षातील अनेका दिग्गजांना बाजूला सारून पंतप्रधान मोदी यांनी फडणवीसांच्या नावाला पसंती दिली होती. ज्यामुळे राज्यातील भाजपचे अनेक नेते दुखावले गेले होते. 

हे वाचलं का?

त्यावेळी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी आपली नाराजी ही वरिष्ठांकडे बोलूनही दाखवली होती. पण त्यांच्याकडे काणाडोळा करत पक्षाने फडणवीसांना सर्व अधिकार दिले होते. त्यामुळे फडणवीसांनी सुरुवातीला प्रशासनावर आपली मांड पक्की केली. त्यानंतर त्यांनी पक्षातील विरोधकांना अलगदपणे बाजूला सारलं. 

यानंतर आताही जे नेते फडणवीसांना आव्हान उभं करू शकतात त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन फडणवीसांनी आपला महाराष्ट्रातील रस्ता मोकळा केल्याचं पाहायला मिळतंय. 

ADVERTISEMENT

फडणवीसांना आव्हान देणाऱ्या 'या' भाजप नेत्यांचं नेमकं काय झालं?

एकनाथ खडसे: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्यांना विरोध करणाऱ्यांमध्ये एकनाथ खडसे हे आघाडीवर होते. पण भोसरी जमीन प्रकरणी खडसेंवर झालेल्या आरोपानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर खडसेंना पक्षांना पुन्हा कोणतीही संधी दिली नाही. 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीत देखील खडसेंना तिकीट देण्यात आलं नाही. त्यानंतर खडसेंनी थेटपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला होता. यानंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

ADVERTISEMENT

पंकजा मुंडे: पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा ही जगजाहीर आहे. त्यामुळेच त्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सगळ्या मोठ्या प्रतिस्पर्धी मानल्या जात होत्या. 2019 विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचं कुठेही राजकीयदृष्ट्या पुनर्वसन करण्यात आलं नाही. त्यामुळे मागील 5 वर्षात अनेकदा त्यांची खदखद ही बाहेर पडली होती. असं असताना आता त्यांना थेट लोकसभेचं तिकीट देऊन दिल्लीला पाठविण्याची खेळी फडणवीसांकडून झाल्याचं पाहायला मिळतंय. 

सुधीर मुनगंटीवार: महाराष्ट्र भाजपमध्ये ज्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे त्यात सुधीर मुनगंटीवार हे देखील आहेत. 2014 ला ते देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, फडणवीसांमुळे नंतरच्या काळात ते मागेच पडले. ते देखील फडणवीस यांच्यासाठी आव्हान ठरू शकतात. असं असतानाच आता लोकसभेसाठी त्यांना चंद्रपूरमधून तिकीट देण्यात आलं आहे. जर ते या मतदारसंघातून निवडून आले तर त्यांनाही महाराष्ट्र सोडून दिल्लीत जावं लागेल.  

विनोद तावडे: महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असं नेहमी विनोद तावडे यांच्याबाबतीत म्हटलं जायचं. गोपीनाथ मुंडेंच्या तालमीत तयार झालेल्या तावडेंना देखील सुरुवातीपासूनच फडणवीसांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. 2019 साली त्यांचं देखील तिकीट कापण्यात आलेलं. पण नंतरच्या काळात भाजपचं सरचिटणीस पद देत पक्षाने त्यांचं पुनर्वसनही केलं. पण अद्याप तरी राज्यात त्यांना कोणतंही पद देण्यात आलेलं नाही.  

या सगळ्या परिस्थितीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिल्यास आपल्या असं लक्षात येतं की, देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणारे महत्त्त्वाचे नेते हे एकतर पक्ष सोडून बाहेर गेले आहेत किंवा त्यांना आता थेट दिल्लीत पाठविण्यात आलं आहे. यामधून फडणवीसांनी एक गोष्टही अधोरेखित केली आहे की, महाराष्ट्रात तेच भाजपचे बॉस आहेत... 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT