Chhagan Bhujbal : ''ओबीसींच्या अंगावर येणाऱ्यांना सोडू नका'', भुजबळांचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

chhagan bhujbal attack manoj jarange patil on maratha reservation sangali obc melava speech
सगळेच मराठे वाईट नाहीत
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हल्ले करतात

point

आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या.

point

कुणबी व्हायचं आहे तर मग मराठा शिल्लक राहील का?

Chhagan Bhujbal News : ''सगळेच मराठे वाईट नाहीत, पण ओबीसींच्या अंगावर येणाऱ्यांना सोडू नका'' असं आवाहन छगन भुजबळांनी समाजाला केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि आपल्याच लोकांवर हल्ले करतात. आज गावागावात ओबीसींवर हल्ले होत आहेत. आरक्षण कायद्यानुसार द्या ही आमची भूमिका आहे. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. सर्वांनाच कुणबी व्हायचं आहे तर मग मराठा शिल्लक राहील का? असा सवाल भुजबळांनी जरांगेंना केला आहे. (chhagan bhujbal attack manoj jarange patil on maratha reservation sangali obc melava speech) 

ADVERTISEMENT

सांगलीत ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यात भुजबळ बोलत होते.  ''महायुतीचं सरकार आहे. मी तुम्हाला नक्की सांगतो. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही. ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. चार-चार आयोगांनी ते शक्य नसल्याचं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शक्य नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही 54 टक्के, बिहारमध्ये मोजले तर 63 टक्के निघाले, बाकीचे कमिशन वगैरे मी मानत नाही'', असं छगन भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा : Vinesh Phogat : 'या' खेळाडूला कोर्टाने दिला न्याय, आता विनेशला रौप्य मिळणार?

''छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि आपल्याल लोकांवर हल्ले करतात. तिथला नवा नेता हा मागच्या ऑगस्ट, सप्टेंबर दोन महिने मला शिव्या देत होता. मी काही बोललो नाही. पण बीडला त्याने आमदारांची घरे जाळली, ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल जाळले, हल्ले केले, त्यांच्या बायका-पोरांचे जीव धोक्यात टाकले. त्यांच्या घरांची राखरांगोळी केली. त्यावेळी छगन भुजबळ तिथे गेला आणि सांगितलं की, छगन भुजबळ आता गप्प बसणार नाही. तुम्ही अशा रितीने ओबीसी आणि सर्वांना वेठीस धरु शकत नाहीत. तुम्हा लोकांची घरेदारे जाळण्याचे काय अधिकार आहेत?'', असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

हे वाचलं का?

तसेच छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना पुन्हा थेट आव्हान दिलं. राज्यात 288 जागांवर उमेदवार उभे करू असं ते म्हणतात, अरे 88 जागा लढवून दाखव आणि त्यातले 8 निवडून आणून दाखव असं आव्हान भुजबळांनी मनोज जरांगे यांना दिलं. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही, सगेसोयऱ्यांना देखील आरक्षण देता येणार नाही हे जरांगेंनी समजून घ्यावं असं देखील ते म्हणाले. 

हे ही वाचा : Mumbai tak Baithak 2024 Schedule: विधानसभेआधी उडणार धुरळा! ‘मुंबई Tak बैठक’मध्ये 'हे' दिग्गज मांडणार व्हिजन

सांगलीचे वसंतदादा कुठे आणि आता त्याचे वारसदार कुठे असं म्हणत भुजबळांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली. तसेच  आरक्षण हे आर्थिक स्थितीवर नसून सामाजिक मागासलेपणावर आहे, हे त्याला कसं समजणार असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. सगळे मराठे वाईट नाहीत, पण जो ओबीसीच्या आरक्षणावर उठेल त्याला मात्र सोडू नका असं भुजबळांनी म्हटलंय. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT