Vijay Wadettiwar : "27 लाख लाडक्या बहिणींना बाद केलं आणि...", विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारचा हिशोबच मांडला
Vijay Wadettiwar On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं अनुदान बंद होणार नाही, याची काळजी घ्या, असं जयंत पाटील यांनी महायुती सरकारला सांगितलं आहे, यावर बोलताना काँग्रेसचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लाडकी बहीण योजनेबाबत विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

"जागतिक महिला दिनानिमित्त मी एक पत्र लाडक्या बहिणींना..."

विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
Vijay Wadettiwar On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं अनुदान बंद होणार नाही, याची काळजी घ्या, असं जयंत पाटील यांनी महायुती सरकारला सांगितलं आहे, यावर बोलताना काँग्रेसचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, त्यांनी 27 लाख लाडक्या बहिणींना बादच केलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त मी एक पत्र लाडक्या बहिणींना पाठवत आहे. आमच्या आदितीताई तटकरे म्हणतात, आमच्या जाहीरनाम्यात दिलं तर ते लगेच काय लागू करण्यासाठी नाही. आम्ही पाच वर्षात लागू करू. म्हणजे शेवटचे तीन महिने असताना लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार. निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले, त्यावेळी तुम्हाला निकष आठवले नाही का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
"सरकारची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे की, मागच्या बजेटमधील फक्त 40 टक्के निधीच खर्च करू शकले. ही परिस्थिती सरकारची आहे. अशा स्थितीत लाडक्या बहिणींच्या नावानं मतं घेऊन त्यांची फसवणूक होत असेल, तर त्या लाडक्या भावाला बहिणी माफ करणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत ते बंद होणार नाही. बंद झाले तर आम्ही लाडक्या बहिणींना घेऊन रस्त्यावर उतरू", असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
हे ही वाचा >>Viral Video : छावा पाहिल्यानंतर सोनं शोधण्यासाठी अख्खं गाव एकवटलं! खोदकाम करायला सुरुवात केली अन्...
पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका, असं मोठं विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं होतं. यावर विजय वडेट्टीवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "औरंजजेब कोण होता, कसा होता हे सगळ्यांना माहिती आहे. ज्याने स्वत:च्या बापाला, भावाला सोडलं नाही, अशी प्रवृत्ती औरंगजेबाची होती. सत्तेचा विस्तार करताना त्याने कोणतीही दया माया दाखवली नाही. अशा क्रूर व्यक्तीच्या नावाला कोणीही समर्थन देणार नाही. परंतु, पुरातत्व विभागाकडे जी काही कबर आता आहे, याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा.
हे ही वाचा >>Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले औरंगजेबाच्या कबरीबद्दल काय म्हणाले? कबर नेमकी आहे तरी कुठे?
औरंगजेबाच्या नावाखाली धर्मांधता पसरू नये, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होऊ नये, हीच भूमिका आहे. कारण बहुसंख्य मुस्लिम त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होते. औरंगजेब हा बाहेरचा आहे. पण स्थानिक मुस्लिम मात्र त्याच्यावर रोष काढण्यासाठी, त्याच्यावर राग काढण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळातील मंत्री करतात. ते होता कामा नये. औरंगजेब एक प्रवृत्ती होती. त्याला धार्मिक दृष्टीकोनातून बघता कामा नये. धर्मांध तर होताच तो. धर्मांचा विस्तार करण्यासाठी अनेक हिंदूंना त्याने त्याकाळी पाठवलं सुद्धा होतं. त्यामुळे त्याचा काळ हा इतिहासच आहे. उदयनराजे म्हणत असतील, त्याची कबर महाराष्ट्रात आहे. तर सरकारने त्या बाबतीत निर्णय घ्यावा, असंही वडेट्टीवार म्हणाले.