Dasara Melava 2023: ‘पुढचं येणारं सरकार एका पक्षाचं नको…’, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने खळबळ
Uddhav Thackeray government without a majority: मला वाटतं एका पक्षाचं बहुमत असलेलं पाशवी सरकार नको, अजिबात नको.. जेव्हा खुर्ची थोडीशी डगमगीत असते तेव्हा देश मजबूत असतो. असं विधान उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलं आहे.
ADVERTISEMENT
Dasara Melava 2023 Uddhav Thackeray: मुंबई: शिवाजी पार्कवर (Shivaji Park) आयोजित दसरा मेळाव्यात (Dasara Melava) शिवसेना (Shiv sena UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि भाजप (BJP) सरकारवर जोरदार टीका केली. मात्र, याचवेळी उद्धव ठाकरे थेट असं म्हणाले की, आता सरकार बदललं पाहिजे, पण जे सरकार आणायचं आहे ते एका पक्षाचं नको तर अनेक पक्षाचं मिळून तयार झालेलं सरकार असायला हवं. उद्धव ठाकरेंच्या या विधानाने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (dasara melava 2023 next government should not have a majority of one party uddhav thackeray sensational statement)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांची थेट तुलना हिटलरशी केली. ‘हिटलरला देखील जर्मनीच्या लोकांनी प्रचंड बहुमत दिलं. हे मला घराणेशाहीवरुन बोलत आहेत. पण ज्यांना घराण्यांचा वारसा नसतो ते किती भयंकर असतात हे आपण जर्मनीत पाहिलं आहे.’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली.
‘देशात एका पक्षाला बहुमत असलेलं सरकार नको…’
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, ‘देशात 2014 साली एका पक्षाचे सरकारं आलं. तेव्हा आम्ही सगळे राष्ट्रपती प्रणब मुखर्जींकडे गेलो. ते म्हणाले की, देशाला एका पक्षाचं मजबूत सरकार मिळालं आहे. आता देश स्थिर होईल. पण आपण पाहत आहोत की, आताचं मजबूत सरकार कशा पद्धतीने देश चालवला जातोय.’
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ड्रग्ज प्रकरणावरून पंकजा मुंडेंनी फडणवीसांना सुनावलं, म्हणाल्या…
‘आज माझं ठाम मत आहे. याच व्यासपीठावरून बाळासाहेब म्हणाले होते की, मजबूत सरकारची गरज आहे. पण 9 वर्ष आपण मजबूत सरकार पाहतोय. मला वाटतं सरकार तर बदललं पाहिजे. आता जे सरकार आणायचं आहे ते एका पक्षाचं, बहुमत असलेलं पाशवी सरकार नको.. अजिबात नको.. जेव्हा खुर्ची थोडीशी डगमगीत असते तेव्हा देश मजबूत असतो. नरसिंहराव, मनमोहन सिंह यांनी चांगलं काम केलं. अटलजींनी देखील चांगलं काम केलं होतं एका पक्षाचं सरकार नसताना.’
‘पण आता सगळ्यांना घेऊन चालणारं सरकार पाहिजे आपल्याला.. यांचं जे चाललं होतं.. मी मागेच बोललो होतो की, हिंदुत्वाचा बुरखा फाटल्यावर त्यांचा बीभत्स चेहरा पाहायला मिळतोय. 2014 नंतर आपल्याला तो चेहरा पाहायला मिळतोय. तेव्हा काय म्हणायचे पेट्रोलचा भाव वाढला की नाही, गॅसचे भाव वाढला की नाही… आता तुम्हीच सांगा काय आहे परिस्थिती..’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Manoj Jarange: ‘अरेरे तुम्ही काय गप्प बसू नका..’, जरांगेंची धनगर समाजाला हाक
‘आज जे दमदाट्या करत आहेत त्यांना सांगून ठेवतोय. आमच्या लोकांना जो त्रास देताय तो बंद झाला नाही तर आमचं सरकार आल्यानंतर तुम्हालाही उलटं टांगल्याशिवाय राहणार नाही. उलटे टांगू तुम्हाला..’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. पण एका पक्षाला बहुमत असलेलं सरकार नको असं उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे म्हटल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीत याचे नेमके पडसाद कसे उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT