Devendra Fadnavis : ''शिवाजी महाराजांनी सूरत लुटलीच नाही'', फडणवीसांच्या विधानानंतर पेटला वाद?

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis big statement on chhatrapati shivaji maharaj oppisition leader criticized amol kolhe indrajit sawant jitendra awhad
''शिवाजी महाराजांनी सूरत लुटलीच नाही''
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवाजी महाराजांनी सूरत लुटलीच नाही.

point

काँग्रेसने ही शिकवण दिली

point

उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला

Devendra Fadnavis News : ''शिवाजी महाराजांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की शिवाजी महाराजांनी सूरत लुटली, याची माफी काँग्रेस मागणार का? असे विधान उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी केले आहे. फडणवीसांच्या या विधानावरून आता त्यांना ट्रोल केलं जातंय. त्याचसोबत विरोधकांकडून आणि इतिहासकारांकडून त्यांचा हा दावा खोडून काढला जात आहे.  (devendra fadnavis big statement on chhatrapati shivaji maharaj oppisition leader criticized amol kolhe indrajit sawant jitendra awhad)  

ADVERTISEMENT

खरं तर मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळल्याने राजकारण चांगलेच पेटले आहे. याच घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीने मोर्चा काढत जोडे मारो आंदोलन केले होते. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं होते. नेमकं ते काय म्हणाले होते? हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : Nagpur : अजित पवारांनी हेडगेवारांच्या समाधीस्थळी भेट का दिली नाही?

''मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला. याची माफी काँग्रेस  मागणार का? कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का?'' ही प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis )यांच्या या विधानानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे. 

हे वाचलं का?

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी फडणवीसांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस खोटा इतिहास सांगतायत. तुम्हाला राजकारण करायचंय तर करा पण खोटा इतिहास सांगू नका, असे आवाहन  इंद्रजीत सावंत यांनी केले आहे. तसेच ''शिवरायांनी सुरतेच्या केलेल्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबास लाहोर येथे समजली होती! पण नागपूरच्या फडणवीसांना अजून ती उमजलेली नाही!,असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.

हे ही वाचा : Rahul Gandhi : ''भाजपनेच या बदमाशांना...'', वृद्धाला मारहाण झाल्याच्या घटनेवर राहुल गांधी कडाडले!

फडणवीस साहेब महाराजांचा अपमान...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील फडणवीसांच्या या विधानावर एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. ''महाराजांनी सूरत लुटले नाही …चुकीचा इतिहास आहे...महाराजांच्या शौर्यावर आक्षेप…हा अक्षम्य गुन्हा आहे...एकदा नाही दोनदा लुटली...फडणवीस साहेब महाराजांचा अपमान का केलात?'' असा सवाल आव्हाडांनी फडणवीसांना विचारला आहे. 

ADVERTISEMENT

इतिहास पुन्हा पुन्हा मांडावाच लागणार.. 

खासदार अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. वाटलं होतं जरा विश्रांती घ्यावी…पण इतिहास पुन्हा पुन्हा मांडावाच लागणार.. 
“ मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर,किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर”
या बहिणाबाईंच्या ओळी इतिहास बदलू पाहणाऱ्यांना सुद्धा लागू होतील अस वाटल नव्हतं..,असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT