Eknath Khadse :"बायकांना बोलवायचं, फोन करायचं...", गिरीश महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध, शाहांकडे CDR..
Eknath Khadse On Girish Mahajan : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

"गिरीश महाजन महिला आयएएस अधिकाऱ्याला रात्री 100 फोन करायचे"

एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप

एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?
Eknath Khadse On Girish Mahajan : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. एका पत्रकाराने व्हायरल केलेल्या क्लिपचा हवाला देत खडसेंनी महाजनांवर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे. खडसे आणि महाजन यांच्यात पूर्वीपासून राजकीय वैर असल्याचं अनेकदा समोर आलंय. अशातच पत्रकार परिषदेत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
एकनाथ खडसे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, "गगन भेदीचे पत्रकार अनिल सत्ते यांनी एक क्लिप प्रकाशित केली. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा..त्यात त्यांनी डिटेल सांगितलं आहे की, गिरीश महाजनांचे एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. तिचं नाव मला माहिती आहे. पण ते सांगण उचित होणार नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी असंही सांगितलं आहे की, ज्यावेळी अमित शाहांकडे मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चर्चा झाली. त्यावेळी अमित शाहांनी गिरीज महाजनांना बोलावून घेतलं होतं. त्यांनी सांगितलं की, या महिला आयएएस अधिकाऱ्याशी तुझे संबंध आहे.
हे ही वाचा >> टार्गेट पूर्ण झालं नाही म्हणून, कुत्र्यासारखं गळ्यात पट्टा बांधला, कंपनीतला व्हायरल व्हिडीओ काय?
यावर त्यांनी (गिरीश महाजन) सांगितलं की, माझे अनेकांशी संबंध आहेत. मी कामानिमित्त बोलतो. अमित शाहांनी त्यांना सांगितलं तुझे कॉल डिटेल्स रेकॉर्ड आमच्याकडे आहे. मला वाटतं की या ठिकाणी जे सीडीआर आहेत, गिरीश महाजनांचे दहा वर्षांचे सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की, यामध्ये तथ्य काय आहे.. गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री..असं अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तथ्य आता बाहेर येईल. अमित शाहा साहेबांची भेट झाली, तर मी पण त्यांना विचारणार आहे की, यामध्ये तथ्य किती आहे."
एकनाथ खडसे पुढे म्हणाले, अनिल सत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भात गंभीर आरोप केला. रात्री एक वाजेनंतर एका आयएएस अधिकाऱ्यांना त्यांनी शंभर वेळा फोन केले. गिरीश महाजन आणि आयएएस अधिकाऱ्यांची जी गोष्ट आहे, ही महाराष्ट्राला सर्वश्रूत माहिती आहे. हे आजचं नाहीय. कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रात सुरु आहे. ते अधिकारी कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मलाही माहित आहे. पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही, असं अनिल सत्ते सुद्धा बोलले आहेत.
हे ही वाचा >> हॉटेल मालकाला बाहेर काढलं, लाथा-बुक्क्यांनी, बेल्टने मारलं! बारामतीतल्या 'त्या' व्हिडीओवर दादाही संतापले
मला वाटतं असे जे मंत्री आहेत, जे आयएएस अधिकाऱ्यांना फोन करतात, असा अनिल सत्तेंचा आरोप आहे. त्यात जर तथ्य असेल, तर त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा काय अधिकार आहे. नैतिकता आहे की नाय काहीतरी..बायकांना बोलवायचं, बायकांना फोन करायचं, असे जर आरोप होत असतील, तर ते गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. त्या संदर्भात सगळ्यांना माहित आहे. त्या आयएएस अधिकाऱ्याचं नाव आजचं नाहिय. गेल्या अनेक वर्षापासून जुळलेलं आहे. अशी चर्चा सर्वत्र महाराष्ट्रात आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.