Haribhau Bagde : "अत्याचारी नराधमांना नपुंसक करुन टाका", शिवरायांच्या आदेशाचा उल्लेख केला, बागडे काय म्हणाले?
बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत बोलताना भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथविधी समारंभात व्यासपीठावरून राज्यपालांनी हे वक्तव्य केलं आहे. हरिभाऊ बागडे यांच्या या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हरिभाऊ बागडे यांचं राजस्थानमध्ये भाषण

"अत्याचार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करा"

"छेडछाड करणाऱ्यांना बेदम चोप द्या"
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी महिलांवरील बलात्कार आणि विनयभंगाच्या वाढत्या घटनांबद्दल वादग्रस्त भाष्य केलं आहे. महिलांची छेडछाड करणाऱ्यांना बेदम मारहाण केली पाहिजे आणि जे बलात्कार करतात त्यांना नंपुसक करुन सोडून दिलं पाहिजे, तरंच असे गुन्हे कमी होतील असं बागडेंनी म्हटलंय.
सोमवारी बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत बोलताना भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथविधी समारंभात व्यासपीठावरून राज्यपालांनी हे वक्तव्य केलं आहे. "जेव्हा शिवाजी महाराजांचं राज्य होतं, तेव्हा पाटील गावाचा प्रमुख असायचा. एका पाटलानं बलात्कार केला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी आदेश काढला. ते म्हणाले, बलात्कार करणाऱ्याला मारू नका, त्याचे हातपाय तोडून त्याला सोडून द्या. तो मरेपर्यंत तसाच राहिला."
हरिभाऊ बागडे काय म्हणाले?
हे ही वाचा >> Badlapur Case : "पोलिसांवर FIR दाखल व्हायला पाहिजे...", बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात पोलीसच अडचणीत?
राज्यपाल बाहडे म्हणाले, महिलांवर अत्याचार होत असताना लोक व्हिडिओ बनवतात. हे योग्य नाही. एखाद्या महिलेचा विनयभंग होत असेल तर त्या पुरुषाला पकडा. तो माणूस आहे, तूही माणूस आहेस आणि तुझ्यासोबत 2 ते 4 लोक येतील. घटनास्थळी जाऊन विनयभंग करणाऱ्याला किंवा बलात्कार करणाऱ्याला रोखून त्याला चोप द्यायचा, ही मानसिकता आपल्या मनात आल्याशिवाय हे गुन्हे थांबणार नाहीत.
हे ही वाचा >> 'या' तारखेला जन्मलेल्या मुलींकडे मुलं हा होतात आकर्षित.. काय आहे नेमकं कारण?
हरिभाऊ बागडे म्हणाले, गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटते की नाही हेच कळत नाही. मात्र 12 वर्षांखालील मुलीचा कोणी विनयभंग केला, बलात्कार केला किंवा लैंगिक अत्याचार केले, तर त्याची शिक्षा फाशीची आहे, तरीही असे गुन्हे थांबत नाहीत आणि अशा प्रकरणांची रोजच सुनावणी होते. यावरून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक नसल्याचं दिसून येतं असं बागडे म्हणाले होते.