औरंगजेब महान आहे हे म्हणायची अबू आझमींना काय गरज होती? इम्तियाज जलील यांनी सांगितली भाजपची क्रोनॉलॉजी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावरुन झालेल्या वादानंतर नागपूरमध्ये हिंसाचारही झाला. या संपूर्ण प्रकरणावरुन इम्तियाज जलील यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"अबू आझमी यांना भाजपने बोलायला सांगितलं होतं"

point

औरंगजेबाच्या कबरीबद्दल काय म्हणाले इम्तियाज जलील?

Imtiaj Jaleel : इम्तियाज जलील यांनी अबू आझमी यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. "विधानसभा अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता. हे महाशय येतात आणि औरंगजेब महान आहे असं म्हणतात. काय गरज होती हे बोलण्याची? हे तुम्ही स्वत: नाही बोलले. तुम्हाला भाजपने हे बोलायला सांगितलं. त्यांना भाजपने सांगितलं होतं की, "लोक आम्हाला फार प्रश्न विचारणार आहेत. संतोष देशमुखांची हत्या, क्राइम रेट असे अनेकप्रश्न विचारतील. आम्हाला  उत्तर देता येणार नाही. त्यामुळे तुम्ही मदत करा आणि औरंगजेबाचा विषय काढा." जलील यांनी अबू आझमींवर ही आरोप केलेत. पुढे ते म्हणालेत, अबू आझमींची खूप प्रॉपर्टी आहे, खूप कनेक्शन्स आहेत. भाजपला त्यांनी कसं पाठबळ दिलं, कसा पाठिंबा दिला, माझ्याविरोधातही एक उमेदवार दिला होता. भाजपला खुला सपोर्ट त्यांनी केला."

कोणतेही मुस्लिम मुघलांशी नातं सांगत नाही...

कोणताही मुस्लिम मुघलांशी आपला नातं सांगत नाही. मी सुद्धा ते नातं सांगत नाही. महाराष्ट्राचे नाही, तर देशाच्या मुस्लिमांच्या वतीने मी हे सांगत असं जलील म्हणाले. देवेंद्र फडणवीसांना यातून काय मिळणार आहे? असा सवाल इम्तियाज जलील म्हणाले. मी तुमच्या धर्माचा आदर करतो, मग माझीही अपेक्षा आहे की तुम्हीही माझ्या धर्माचा आदर करा. लोकसभेत ए कटुए, ए आतंकी ही भाषा बोलली जाते, राज्यात मशिदीत घुसण्याची भाषा केली जाते. महाराष्ट्रात कायदा व सुव्यस्था आहे की नाही? असा सवालही जलील यांनी केला. 

हे ही वाचा >> "एवढ्या वर्षांनी उकरुन काढण्याची काय गरज? 'औरंगजेबाच्या कबरी'वरुन अजितदादांनी राणेंसह सगळ्यांचेच कान टोचले

औरंगजेबाला याच लोकांनी जिवंत केलं...

जो माणूस 400 वर्षांपूर्वी मेला, त्याला यांनीच पुन्हा जिवंत केलं औरंगजेबाला मागच्या 70 वर्षात कुणी वाचलं नसेल, तेवढं मागच्या एक महिन्यात लोकांनी वाचलं. औरंगजेबाला जिवंत करण्याचं काम याच लोकांनी केलं आहे. आम्ही मग पाण्याचा प्रश्न विचारायचा नाही, माझ्या शहरात आठ दिवसाला पाणी येतं. संतोष देशमुखच्या हत्येच्या वेळी पाणी मागितल्यावर तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे केलं, ती क्रूरता नाही का असा सवालही इम्तियाज जलील यांनी यावेळी केला.

म्हणून नागपूरमध्ये ती चादर जाळली...

इम्तियाज जलील म्हणाले, अनेक शहरांमध्ये औरंगजेबाचे फोटो जाळले. कोणत्याच शहरात मुस्लिमांनी त्याचा विरोध केला नाही. पुण्यात तर बहादूरशाह जफरचा फोटो जाळला. दाढी-टोपी दिसली म्हणून त्यांचा फोटो जाळला. मग तुम्ही एका शहरात औरंगजेबाची कबर जाळली. तसंच त्याच्यासोबत एक चादर होती, त्यावर कुरानमधील पवित्र शब्द होते. ती चादर जाळण्यात आली. ती अफवा नव्हती, ते सर्व माध्यमांच्या व्हिडीओमध्ये दिसतंय. कारण यांना वाटत होतं, औरंगजेबाच्या फोटो जाळल्यावर काहीच प्रतिक्रिया आल्या नाही. त्यामुळे हे केलं असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. 

मुस्लिम दोषी असतील तर कारवाई करा, पण...

हे ही वाचा >> जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी घेताना अटक, महिलेनं काय मागणी केली होती?

नागपूर हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे. राज्याची उपराजधानी आहे. मग तिथे सुरक्षा यंत्रणांच्या गुप्तचर संस्था नाहीत का? मुख्यमंत्री आणि गडकरींचं घर तिथे जवळ आहे. मुस्लिमांनी केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, पण एकतर्फी कारवाई करु नका असं जलील एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp