लाइव्ह

Independence Day PM Modi Speech LIVE : बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी तिरंगा फडकावला- संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Independence Day 2024 LIVE updates : देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिवस आज साजरा केला जात आहे. शिंदे सरकारकडून राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या स्वातंत्र्य दिनी अकराव्यांदा राष्ट्रीय ध्वज फडकवला जात आहे. नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार आहेत. मोदी यावेळी काय बोलणार? याकडे देशाचं विशेष लक्ष असणार आहे. कारण मोदी यांच्या नेतृत्वात देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार देशात स्थापन झालं आहे.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

लाइव्हब्लॉग बंद

  • 11:03 AM • 15 Aug 2024

    Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची जोरदार तयारी सुरू

    विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जोरदार तयारी सुरू.  महायुतीच्या संयुक्त मेळाव्यास २० ऑगस्ट रोजी कोल्हापूरपासून प्रारंभ होणार.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार

    संवाद यात्रांनाही सुरुवात होईल. राज्यात महायुतीचे ९ मोठे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. ‘ एकजूट महाराष्ट्राच्या अभिमानाची, विकासाची, कल्याणाची’ अशी मेळाव्याची टॅगलाईन ठरवण्यात आली आहे.

     

  • 10:43 AM • 15 Aug 2024

    Sanjay Raut : बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी तिरंगा फडकावला- संजय राऊत

    Independence Day 2024 : मोदी अल्पमतातले पंतप्रधान, त्यांनी बहुमत गमावलंय. बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी तिरंगा फडकावला.  मोदींच्या राज्यात चर्चेला वाव आहे का ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

     

  • 08:46 AM • 15 Aug 2024

    PM Modi : मेडीकल शिक्षणासंदर्भात पीएम मोदींकडून महत्त्वाची घोषणा

     

    “भारत सरकारने संशोधनासाठी सपोर्ट वाढवला आहे. नॅशनल रिसर्च फाऊंडेशन बनवलं आहे. बजेटमध्ये 1 लाख कोटी रुपये रिसर्चसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशाच्या युवकांकडे ज्या कल्पना आहेत, त्या प्रत्यक्षात येऊ शकतील. मेडीकल शिक्षणावर लाखो रुपये खर्च होतात. यात आम्ही मागच्या 10 वर्षात मेडीकल सीट वाढवून 1 लाख केल्या आहेत. दरवर्षी 25 हजार युवांना मेडीकल शिक्षणासाठी परदेशात जावं लागतं. पुढच्या पाच वर्षात मेडीकल क्षेत्रात 75 

  • 08:44 AM • 15 Aug 2024

    Independence Day PM Modi Speech : पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

    • आजचा दिवस देशासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य ‘आझादी के दिवाने’यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. हा देश सदैव त्यांचा ऋणी राहील.
    • गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे आपल्या सर्वांची चिंता वाढली आहे, नैसर्गिक संकटामुळे अनेक लोकांनी स्वकीयांना गमावलं आहे. काहींनी संपत्ती गमावली. देशातील संपत्तीचही मोठं नुकसान झालंय. मी त्या सगळ्यांप्रती आज संवेदना व्यक्त करतो आणि हा विश्वास देतो की हा देश या संकटाच्या काळात त्यांच्यासोबत उभा आहे.
    • स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आठवा. शेकडो वर्षांची गुलामगिरी होती, प्रत्येक काळ संघर्षाचा होता. तरुण, महिला, आदिवासी, शेतकरी या सगळ्यांनीच अविरत लढा दिला. 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या आधीही देशाच्या अनेक आदिवासी भागांमधून स्वातंत्र्याचा लढा दिला जात होता, याला इतिहास साक्षी आहे. गुलामगिरीचा एवढा मोठा काळ, जुलुमी शासक, अखंड यातना, सामान्यांचा विश्वास तोडण्याचा प्रत्येक मार्ग हे सगळं असूनही तेव्हाच्या लोकसंख्येनुसार स्वातंत्र्यापूर्वी 40 कोटी देशवासीयांनी संघर्षाचा संकल्प केला. भारताच्या स्वातंत्र्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं.
    • आपल्या नसांमध्ये त्यांचच रक्त आहे याचा आपल्याला गर्व आहे. 40 कोटी लोकांनी जगाच्या महासत्तेला उचलून फेकून दिलं. 40 कोटी लोक स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात, तर 140 कोटी देशवासीय, नागरिकांनी ठरवलं, संकल्प केला तर कितीही आव्हानं आली, कितीही कमतरता असल्या, कितीही साधनांसाठी लढा द्यावा लागला तरी सर्व संकटं पार करून आपण समृद्ध भारत, 2047 सालच्या विकसित भारताचं ध्येय साध्य करू शकतो.
    • विकसित भारत 2047 हे फक्त भाषणाचे शब्द नाहीत. यामागे कठोर कष्ट सुरू आहेत. कोट्यवधी नागरिकांच्या सूचना घेतल्या जात आहेत. आम्ही देशवासीयांकडून सूचना मागवल्या. देशाच्या कोट्यवधी नागरिकांनी विकसित भारत 2047 साठी अगणित सूचना केल्यात.
    • लाल किल्ल्यावरुन देशातील 18 हजार गावात वीज पोहोचणार असं सांगितलं जातं आणि वीज तिथे पोहोचते त्यावेळी विश्वास दृढ होतो” असं पीएम मोदी म्हणाले.
    • बँका संकटात होत्या. बँकिंग सेक्टर मजबूत बनवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे बँका मजबूत झाल्या. मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बँकांमध्ये आहे. शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी तसच अन्य कामांसाठी लोन हवं असेल तर ते बँकांमुळे शक्य होतं.
    • लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. या गोष्टी नसताना दलित आणि आदिवासी जगत होते. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्याचे परिणाम सर्वांसमोर आहेत. आम्हाला आनंद आहे की आज प्रत्येक जिल्हा उत्पादने बनवत आहे. आज संपूर्ण जग भारताकडून काही ना काही शिकत आहे.
    • कोरोनाचं संकट विसरता येणार नाही. जगात सर्वात वेगाने कोट्यवधी लोकांना लसीकरणाचं काम आपल्या याच देशात झालं. कोरोनाच्या काळात आम्ही करोडो लोकांना लसीकरण केले.
    • याच देशात कधीकाळी दहशतवादी आपल्याला येऊन मारून निघून जायचे. पण जेव्हा देशाचे सैन्य जेव्हा सर्जिकल स्ट्राईक करते , जेव्हा हवाई हल्ला करतं तेव्हा सर्व देशवासियांचं हृदय अभिमानाने फुलतं, असं पंतप्रधान म्हणाले.
  • ADVERTISEMENT

  • 08:18 AM • 15 Aug 2024

    राष्ट्रहिताला सर्वोच्च मानून आम्ही सुधारणा केल्या, राजकारणासाठी नाही- PM मोदी

    देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत. जबाबदारी मिळाल्यावर आम्ही मोठ्या सुधारणा केल्या. आम्ही बदलासाठी सुधारणा निवडली. आपण केवळ टाळ्या वाजवण्यापुरते सुधारत नाही. आम्ही बळजबरीने सुधारणा करत नसून ती मजबूत करण्यासाठी करत आहोत. राजकारणासाठी आम्ही सुधारणा करत नाही. आमचे एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे नेशन फर्स्ट, म्हणजेच राष्ट्रहित सर्वोच्च. माझा भारत महान व्हावा, या संकल्पाने आपण पावले टाकत आहोत.

     

  • 08:17 AM • 15 Aug 2024

    PM Modi : ‘स्वातंत्र्य मिळालं पण लोकांना मायबाप कल्चरचा सामना करावा लागला’

    “बँका संकटात होत्या. बँकिंग सेक्टर मजबूत बनवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे बँका मजबूत झाल्या. मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बँकांमध्ये आहे. शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी तसच अन्य कामांसाठी लोन हवं असेल तर ते बँकांमुळे शक्य होतं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण लोकांना मायबाप कल्चरचा सामना करावा लागला. सतत सरकारकडे मागावं लागायचं. आम्ही गर्व्हन्सच हे मॉडल बदललं. आज सरकार स्वत: लोकांपर्यंत जातय” असं पीएम मोदी म्हणाले.

follow whatsapp

ADVERTISEMENT