live blog active
लाइव्ह

Haryana Election Result 2024 : जम्मू-काश्मीरच्या निकालावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Jammu and Kashmir Haryana Election Results 2024: लोकसभा निवडणूक 2024 नंतर आज देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर ही ती दोन राज्य आहेत. हरियाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. मागच्या 10 वर्षांपासून हरियाणामध्ये भाजपाची सत्ता आहे. हरियाणामध्ये काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीशिवाय जेजेपीही निवडणुकीच्या रिंगणात आहे. 

तर, आर्टिकल 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झालं. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेसची युती होती. परंतु महबूबा मुक्ती यांची पीडीपी आणि भाजप स्वबळावर रिंगणात उतरले होते. 

J&K, Haryana Election Results 2024 Live: यासंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

ADVERTISEMENT

  • 03:32 PM • 08 Oct 2024

    अनेक जागांवर मतमोजणी थांबलीय, हरियानाचे माजी CM भुपेंद्र सिंह हुड्डा असं का म्हणाले?

    हरियानाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंग हुड्डा यांनी हरियाना विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठं विधान केलं आहे. भुपेंद्र म्हणाले, अनेक ठिकाणी मतमोजणी थांबली आहे, अशी माहिती आहे. रोहतक शहरातली मतमोजणी थांबली आहे. आम्हाला बहुमत मिळत आहे. हा एक गेम आहे. कधी चेंडू इकडे, तर कधी तिकडे, पण आम्हाला अंतिम निकालाची प्रतिक्षा करावी लागेल.

     

  • 02:45 PM • 08 Oct 2024

    J&K Election Result 2024 : जम्मू-काश्मीरच्या निकालावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

    जम्मू-काश्मीरमधील भाजपाचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स चांगला आहे. प्रचंड मतदान झालं. पाकिस्तानचा प्रपोगंडा संपुष्टात आला. निष्पक्ष निवडणुका होतात हे दाखवून दिलं. ही निवडणूक म्हणजे पाकिस्तानला चपराक आहे. 370 हटवल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील असं म्हणायचे, रक्ताच्या नद्या सोडा, लोक लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाले. जम्मू-काश्मीरमध्ये लोकाशाही लोकनियुक्त सरकार सत्तेवर येणार आहे.

     

  • 02:44 PM • 08 Oct 2024

    Haryana Election Result 2024 : काँग्रेस नेते भूपेंद्र हुड्डा यांच्या घराबाहेर 2 विजय रथ

     

    मतमोजणीच्या फेऱ्या सुरु आहेत. भूपेंद्र हुड्डा यांच्या घराबाहेर 2 विजय रथ सजवण्यात आले आहेत. काँग्रेसच्या विजयानंतर या रथामधून विजय यात्रेची तयारी आहे.

     

  • 02:00 PM • 08 Oct 2024

    Haryana Election Result 2024 : हरियाणातून विनेश फोगाटचा दणदणीत विजय!

    हरियाणाच्या जुलानामधून काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट विजयी झाल्याची बातमी आहे. भाजपाने कॅप्टन योगेश बैरागी, यांना उमेदवारी दिली होती. भाजपाने जुलानामध्ये एक दलित चेहरा दिला होता. इंडियन नॅशनल दलने सुरेंद्र लाठर, आम आदमी पार्टीकडून कविता देवीसह एकूण 12 उमेदवार रिंगणात होते.

     

  • ADVERTISEMENT

  • 12:29 PM • 08 Oct 2024

    पराभवानंतर इल्तिजा मुफ्ती नेमकं काय म्हणाल्या?

    जम्मु-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांचा पराभव झाला आहे. इल्तिजा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव मान्य केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इल्जिजा यांनी म्हटलं, बिजबेहरामध्ये सर्वांकडून मिळालेलं प्रेम आणि आपुलकी नेहमीच माझ्या स्मरणात राहील. जनतेनं जो काही निर्णय दिला आहे, तो मला मान्य आहे. पीडीपीच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत खूप मेहनत घेतली, मी त्यांचे आभार मानते.

     

  • 10:29 AM • 08 Oct 2024

    Haryana Election Result 2024 : हरियाणात काँग्रेसची चिंता वाढली

    हरियाणामध्ये चित्र पूर्णपणे पालटलं आहे. काँग्रेसला धक्का बसणार असं दिसतंय. काँग्रेस आता 34 जागांवर आघाडीवर आहे. भाजपा 48 म्हणजे भाजपाने बहुमताचा आकडा गाठलाय.

    हरियाणात अटी-तटीचा सामना सुरु आहे. पहिल्या तासाभरात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. बहुमतापेक्षा जास्त जागा त्यांच्याकडे होत्या. पण आता चित्र पालटलं आहे. आता भाजपाने बहुमताचा आकडा गाठलाय. पारडं कुठल्या बाजूला झुकेल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. भाजपा 47 तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे.

     

     

  • ADVERTISEMENT

  • 10:28 AM • 08 Oct 2024

    Haryana Election Result 2024 : हरियाणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया काय?

    मोदींचा कुत्रिम मुखवटा पूर्णपणे उतरला आहे. काँग्रेसच्या टॉनिकचा प्रभाव महाराष्ट्रात दिसेल. हरियाणात काँग्रेसचच सरकार येणार. संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

     

  • 09:37 AM • 08 Oct 2024

    J&K Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची स्थिती काय?

     

    जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 48 जागांवर आघाडीवर आहे. भाजपाला 30 जागांची आघाडी मिळाली आहे. पीडीपी 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत.

     

  • 09:36 AM • 08 Oct 2024

    Haryana Election Result 2024 : हरियाणातील महत्त्वाच्या मतदारसंघात काय स्थिती?

    मुख्यमंत्री नायब सिंह सैनी लाडवा विधानसभा क्षेत्रातून आघाडीवर

    जुलानामधून विनेश फोगाट आघाडीवर

    अंबाला कँटमधून अनिव विज पुढे

    कैथलमधून आदित्य सुरजेवाला आघाडीवर

    रानियामधून अर्जुन चौटाला आघाडीवर

    गढी सांपला-किलोईमधून भूपेंद्र सिंह हुड्डा पुढे

    तोशाममधून श्रुती चौधरी आघाडीवर

    हरियाणाच्या इंदरवालमधून अपक्ष उमेदवार जीएम सरूरी आघाडीवर.

     

  • 09:23 AM • 08 Oct 2024

    Assembly Election Results: भाजपा विरुद्ध काँग्रेस, तासाभरानंतर कोण आघाडीवर?

    हरियाणात पोस्टल निकालात काँग्रेसची आघाडी
    जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, भाजपात टक्कर

    जम्मू-काश्मीर – बडगावमधून ओमर अब्दुल्ला आघाडीवर
    हरियाणा – विनेश फोगाटची पोस्टल मतदानात आघाडी

    हरियाणा: काँग्रेसने पोस्टल मतदानात घेतली आघाडी

    हरियाणा: भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर
    जम्मू-काश्मीर : भाजपने पहिल्या टप्प्यात आघाडी घेतली

    जम्मू-काश्मीर : भाजप आणि काँग्रेस आघाडीत रस्सीखेच
    जम्मू-काश्मीर : खोऱ्यामध्ये नॅशनलिस्ट कॉन्फरन्सची आघाडी

    हरियाणा: पोस्टल मतदानात काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला

    हरियाणा: EVM च्या मतमोजणीत विजयाचं गणित बदलू शकतं

    हरियाणा: अपक्षांची निराशाजनक कामगिरी, भाजपाची चिंता वाढवणारी

    हरियाणा: काँग्रेसकडून जिलेबीचे वाटप करत जल्लोष सुरू
    हरियाणा: प्रचारात राहुल गांधींचं जिलेबीवरील विधान चर्चेत आलं होतं

    हरियाणा: पहिल्या टप्प्यात काँग्रेसने गाठला 60 चा आकडा
    हरियाणा: काँग्रेसनी EVM मतमोजणीत आघाडी ठेवल्यास नवा इतिहास

    हरियाणा: एक्झिट पोलचे निकाल मतमोजणीत खरे ठरताना दिसतायत

    जम्मू-काश्मीर : काँग्रेस आघाडी आणि भाजपात रस्सीखेच सुरूच
     

  • 09:06 AM • 08 Oct 2024

    Haryana Election Result 2024 : हरियाणात 'या' जागांवर कोण आघाडीवर?

    • लाडवा मतदारसंघातून मुख्यमंत्री नायबसिंग सैनी आघाडीवर
    • जुलाना मतदारसंघातून विनेश फोगट आघाडीवर
    • अंबाला कॅन्टमधून अनिव विज आघाडीवर
    • आदित्य सुरजेवाला कैथलमधून आघाडीवर
    • रानियामधून अर्जुन चौटाला आघाडीवर
    • गढी सांपला-किलोई येथून भूपेंद्रसिंग हुडा आघाडीवर
    • तोशाम येथून श्रुती चौधरी आघाडीवर
    • हरियाणाच्या इंदरवाल जागेवरून अपक्ष उमेदवार जीएम सरुरी आघाडीवर
  • 08:57 AM • 08 Oct 2024

    Haryana Election Result 2024 : हरियाणामध्ये काँग्रेसला प्रचंड बहुमत

    हरियाणामध्ये परिवर्तनाची लाट आहे. काँग्रेसची प्रचंड बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. काँग्रेस 63, भाजपा फक्त 16 जागांवर आघाडीवर आहे. 90 पैकी 85 जागांचे कल आले आहेत.

     

  • 08:34 AM • 08 Oct 2024

    Haryana Election Result 2024 : हरियाणामध्ये सत्ता पालट होणार? काँग्रेसची तुफान आघाडी

    हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. प्राथमिक कल आहेत त्यामध्ये, काँग्रेसच तुफान आलय. काँग्रेस 40 पेक्षा जास्त आणि भाजपा 16 जागांवर आघाडीवर आहे. इतर 4 जागांवर आघाडीवर आहे. 10 वर्षानंतर हरियाणामध्ये सत्ता पालट होणार असं चित्र दिसतंय.

     

  • 08:33 AM • 08 Oct 2024

    Assembly Election Results: काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसला आघाडी

    जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. प्राथमिक कल आहेत त्यानुसार, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसला 34 जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपा 19, पीडीपी 1 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत.

     

  • 08:17 AM • 08 Oct 2024

    Assembly Election Result 2024 LIVE: पोस्टल मतांची आधी मोजणी

    हरियानात बादशाहपूर, गुरुग्राम आणि पतौडी विधानसभा जागांसाठी प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्रे, तर उर्वरित ८७ मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ९० मतमोजणी निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पोस्टल मतपत्रिकांची प्रथम मोजणी केली जाईल, त्यानंतर 30 मिनिटांनंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) मतांची मोजणी केली जाईल.

  • 08:14 AM • 08 Oct 2024

    Assembly Election Results: भाजप प्रदेशाध्यक्षांकडून करण्यात आलं हवन

     

    जम्मू काश्मीर भाजपचे अध्यक्ष आणि नौशेराचे उमेदवार रवींद्र रैना यांनी निकालापूर्वी हवन केलं आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून हाती येणार आहेत.

follow whatsapp

ADVERTISEMENT