एग्जिट पोल

Exit Poll Result : जम्मू काश्मीरात भाजपला बसणार झटका? 'हा' पक्ष पोहोचला बहुमतानजीक

मुंबई तक

ADVERTISEMENT

jammu kashmir  vidhan sabha election exit poll result narendra modi mehbooba mufti pdp national conference omar abdullah bjp congess rahul gandhi assembly elction result
जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षानंतर विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत.
social share
google news

Jammu Kashmir Exit Poll Result : जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षानंतर विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. या निवडणुकीनंतर आता आजतक आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोलसमोर आला आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपला जम्मू काश्मीरमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर नॅशनल कॉन्फरेन्स काँग्रेस ही बहुमतानजीक पोहोचली आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षानंतर कुणाची सत्ता येणार आहे? हे एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समजून घेऊयात. (jammu kashmir  vidhan sabha election exit poll result narendra modi mehbooba mufti pdp national conference omar abdullah bjp congess rahul gandhi assembly elction result) 

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागांवर 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांत मतदान पार पडले झाले. तर 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी, आज तक आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले आहेत.

हे ही वाचा : Narendra Modi: "मी आनंदाची बातमी घेऊन महाराष्ट्रात आलोय...",ठाण्यात PM नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने युती करून निवडणूक लढवली आहे, तर मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर एकट्याने लढत आहेत. मात्र, यावेळी इंजिनिअर रशीद यांचा अवामी इत्तेहाद पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापण करण्यासाठी 46 जागा हा बहुमताचा आकडा गाठणे महत्वाचे आहे. त्यामुळे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नेमक्या कोणाला किती जागा मिळाल्या आहेत. हे पाहूयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नॅशनल कॉन्फरेन्स आणि काँग्रेस पक्ष बहुमताच्या नजीक पोहोचला आहे. नॅशनल कॉन्फरेन्स आणि काँग्रेस 40 ते 48 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 44 जागा पकडल्यास नॅशनल कॉन्फरेन्स आणि काँग्रेसला बहुमतासाठी आणखी 2 ते 3 जागांची आवश्यकता असणार आहे. अशाप्रकारे नॅशनल कॉन्फरेन्स आणि काँग्रेस जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करू शकते. 

भाजपला 27 ते 32 जागा मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. त्यामुळे बहुमताचा 46 चा आकडा गाठण्यासाठी भाजपला पीडीपी आणि अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. भाजपनंतर पीडीपी 6 ते 12 जिंकण्याचा अंदाज आहे. तर अपक्षांना 6 ते 11 जागा जिंकण्याचा अंदाज आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : NCP अजित पवार गटाचे नेते सचिन कुर्मीकर यांची हत्या, भायखळा परिसरात नेमकं काय घडलं? 

एक्झिट पोलचा निकाल 

नेशनल कॉन्फरन्स-काँग्रेस : 40-48 
भाजप 27-32
पीडीपी 6-12 
अपक्ष 6-11

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT