कुणाल कामराचं ते वादग्रस्त 'गाणं' जसंच्या तसं... शिंदेंच्या सैनिकांचा तुफान राडा
Kunal Kamra Poem on Eknath Shinde : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. यावेळी त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता सादर केली. त्यामुळे शिवसैनिक संतापलेले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

एकनाथ शिंदे यांचं नाव कुणाल कामराने घेतलं का?

कुणाल कामरा आपल्या व्यंगात्मक काव्यात नेमकं काय म्हटला?

कुणाल कामरा जे बोलला, तो शब्द न् शब्द... वाचा
Kunal Kamra : कुणाल कामराच्या नव्या स्टँड अप कॉमेडी व्हिडीओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव न घेता टीका करण्यात आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जिथे शूट झालं होतं, तिथे तोडफोड केली. 'द हॅबिटाट'ची तोडफोड करण्यावर न थांबत, ज्या हॉटेलमध्ये ते आहे तिथेही तोडफोड केली. यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल, की कुणाल कामरा असं म्हणाला तरी काय? असा प्रश्न पडतोय.
हे ही वाचा >>उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अत्यंत वादग्रस्त कविता करणारा कुणाल कामरा आहे तरी कोण?
कुणाल कामराने हा आपल्या स्टँड अप कॉमेडीमधून राजकीय गोष्टींवर व्यंगात्मक टीका करत असतो. राज्यात काही वर्षांपूर्वी झालेल्या सत्तेच्या उलथापालथीनंतर राज्यात वातावरण ढवळून निघालं होतं. त्यावरच कुणाल कामरा आपल्या कॉमेडीमधून व्यक्त झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता जोरदार फटकेबाजी केली. यावेळी कुणाल कामराने भोली सी सुरत, आँखो में मस्ती... या गाण्याच्या चालीवर एक व्यंगात्मक काव्य केलं.
कुणाल कामरा काय बोलला? वाचा शब्द न् शब्द... जसाच्या तसा...
जे महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल केलंय ना... त्यावर बोलावं लागेल. इथे काय झालं, आधी शिवसेने भाजपची साथ सोडली, नंतर शिवसेनेने शिवसेनेची साथ सोडली. त्यानंतर राष्ट्रवादीने राष्ट्रवादीची साथ सोडली. एका मतदाराला नऊ बटणांचा पर्याय दिला. लोक कन्फ्यूज झाले. सुरू त्यांनी केलं होतं... मुंबईत एक खूप चांगला जिल्हा आहे ठाणे... तिथले ते आहेत...
ठाणे की रिक्शा, चेहरे पर दाढ़ी आखों में चश्मा…हाये...
मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आए...
एक झलक दिखलाएँ कभी, गुवाहाटीमें छिप जाए...
मेरीं नजर सें तुम देखो गद्दार नजर वो आएँ...
ठाणे की रिक्शा, चेहरे पर दाढ़ी आखों में चश्मा…हाये...
मंत्री नहीं, वो दलबदलू हैं, और कहा क्या जाए...
जिस थाली में खाएं उसमे छेद ये कर जाए
मंत्रालयसे जादा फडणवीस की गोदी में मिल जाए,
तीर कमान मिला हैँ इसको, बाप मेरा ये चाहे...
ठाणे की रिक्शा, चेहरे पर दाढ़ी आखों में चश्मा…हाये...
घराणेशाही संपवायची होती, पण दुसऱ्याचा बापच चोरला...." असं कुणाल कामरा म्हणाला.
हे ही वाचा >>Nanded Crime : "तू पाटील, तुझी लायकी नाही..." म्हणत तरूणाला मारहाण, मारहाणीनंतर प्रियकरानं स्वत:ला संपवलं
शिंदे गटाचा कामराला इशारा
शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी X वर पोस्ट करत म्हटले की, 'एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली गेली. स्वत:च्या बळावर ऑटो चालकापासून भारतातील दुसऱ्या मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री बनलेला नेता आहे. त्यांच्यावर केलेल्या टिप्पण्यांमध्ये वर्णभेदी अहंकार असल्याचं दिसतोय. शिवसेना कार्यकर्ते देशभर कुणाल कामराला शोधून काढतील असा इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी कामरा यांना दिला. सापाच्या शेपटीवर पाय देऊ नका, कधी फणा काढेल ते कळणार नाही असं नरेश म्हस्के म्हणालेत. तर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत, कामराच्या दिल्लीतील घरातही आम्ही घुसू शकतो असं म्हटलंय.