Kunal Kamra : वातावरण पेटल्यानंतर कुणाल कामराचं स्पष्टीकरण, शिंदेंना पुन्हा डिवचलं, अजितदादांच्या नावाचा...
Kunal Kamra Not Apologized : श्री. एकनाथ शिंदे (दुसरे उपमुख्यमंत्री) मला या जमावाची भीती वाटत नाही आणि लपून बसत शांत होण्याची वाट पाहणार नाही अशी स्पष्ट भूमिका कुणाल कामराने व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कुणाल कामराला अनेक सत्ताधारी नेत्यांकडून इशारा

स्टुडिओच्या तोडफोडीमुळे पेटलं होतं वातावरण

आता कुणाल कामराने स्पष्ट केली आपली भूमिका
Kunal Kamra : एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक कवितेनंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या या काव्यानं संतापलेल्या शिवसैनिकांनी थेट जिथे शूट झालं होतं, तो हॅबिटॅट स्टुडिओ फोडूला. कुणाल कामरला मारहाण करण्याच्याही धमक्या देण्यात आल्या. अनेक सत्ताधारी नेत्यांनी यावरुन कुणाल कामराला इशारा दिला. या सर्व गदारोळानंतर आता कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांसाठी...
"मनोरंजनाचा कार्यक्रम जिथे झाला (शुटींगचं ठिकाण) ते फक्त एक व्यासपीठ आहे. सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठीची ती जागा आहे.हॅबिटॅट (किंवा इतर कोणतेही ठिकाण) माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही. मी काय बोलतो किंवा करतो याचा त्यांच्याशी काहीही सबंध नाही, त्यांचं माझ्यावर नियंत्रणही नाही.तसाच कुठल्याही राजकीय पक्षाचाही यात संबंध नाही. विनोदी कलाकाराच्या शब्दांसाठी अशा सेटवर हल्ला करणे हे म्हणजे, निरर्थक आहे.
इशारा देणाऱ्या नेत्यांसाठी...
जरी आजची माध्यमं असं करत असली तरी, आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य हे फक्त श्रीमंत आणि मोठ्या लोकांचा लाळघोटेपणा करण्यासाठी नाही वापरलं पाहिजे. एखाद्या शक्तिशाली व्यक्तिला विनोद कळत नसेल, तर त्यासाठी मी माझा अधिकार असलेल्या गोष्टीमध्ये बदल करु शकत नाही. जेवढं मला कळतं, त्यानुसार आपल्या राजकीय व्यवस्था आणि नेत्यांच्या सर्कसची मस्करी उडवणं कायद्याच्या विरूद्ध नाही. तसं तर मी कुठलीही कायदेशीर कारवाईसाठी पोलीस आणि न्यायव्यवस्थेला सहकार्य करायला तयार आहेच.
हे ही वाचा >> आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री शिंदेंकडे का पाहत होते नजर रोखून? 'तो' VIDEO आणि 'त्या' घटनेमागची नेमकी कहाणी!
पण ज्यांनी विनोदावरु नाराज झाल्यामुळे थेट तोडफोड करण्याचा मार्ग निवडला, त्यांच्याविरुद्ध कायदा निष्पक्षपणे लागू केला जाईल का? असा सवाल कुणाल कामराने केला. पुढे खोचक टीका करताना कुणाल म्हणाला, हॅबिटॅट स्टुडिओमध्ये पूर्वसूचना न देता येऊन तोडफोड करणाऱ्या बीएमसीच्या निवडून न आलेल्या सदस्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होईल का? माझ्या पुढील जागेसाठी, मी एल्फिन्स्टन पूल किंवा मुंबईतल्या अशा एखाद्या इमारतीची निवड करेन जी, लवकर पाडणं गरजेचं आहे.
नंबर लीक करणारे, कॉल करणाऱ्यांसाठी...
मला खात्री आहे की, तुम्हाला आतापर्यंत हे समजलं असेल की, सर्व अज्ञात कॉल माझ्या व्हॉइसमेलवर जातात. तिथे तुम्हाला ज्या गाण्याचा तिरस्कार आहे तेच गाणं ऐकायला मिळेल.
या सर्कसचं प्रामाणिकपणे वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांसाठी...
प्रेस फ्रीडमच्या बाबतीत भारत 159 व्या क्रमांकावर आहे.
मी माफी मागणार नाही.
मी जे बोललो तेच श्री. अजित पवार (पहिले उपमुख्यमंत्री) हे सुद्धा बोलले होते.
श्री. एकनाथ शिंदे (दुसरे उपमुख्यमंत्री)
मला या जमावाची भीती वाटत नाही आणि लपून बसत शांत होण्याची वाट पाहणार नाही."
हे ही वाचा >> Prashant Koratkar : फरार प्रशांत कोरटकरला पोलिसांनी कसं केलं अटक? वाचा Inside Story
एकूणच, या उत्तरानंतर आता शिवसैनिक आणखी संतप्त होण्याची शक्यता आहे. तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कारवाई करण्याचा शब्द दिला आहे. तर दुसरीकडे तोडफोड करणाऱ्यांवरही कारवाई झाली आहे.