Manoj Jarange: ‘..मग तुला कचकाच दाखवतो, तुझी फडफड..’, जरांगेंनी कोणाचा केला एकेरी उल्लेख?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

let us get maratha reservation then we will show you manoj jarange patil challenged chhagan bhujbal in beed ishara sabha
let us get maratha reservation then we will show you manoj jarange patil challenged chhagan bhujbal in beed ishara sabha
social share
google news

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal: बीड: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी बीडमध्ये इशारा सभा घेत आज (23 डिसेंबर) शिंदे-फडणवीस सरकारला जाहीर इशाराच दिला. सरकारला दिलेली दोन महिन्यांची मुदत उद्या संपत असल्याने मनोज जरांगे यांनी आता 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. दरम्यान, याच सभेत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना मात्र खुलं आव्हान दिलं आहे. (let us get maratha reservation then we will show you manoj jarange patil challenged chhagan bhujbal in beed ishara sabha)

ADVERTISEMENT

‘तू थांब एकदा.. आरक्षण मिळू दे मग तुला कचकाच दाखवतो.. तुझी खूप दिवसांपासून फडफड सुरू आहे.’ अशा शब्दात मनोज जरांगे यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

‘थांब तुला कचकाच दाखवतो…’

‘आता कसं बारीक आवाजात बोलतो.. जसं काय कळ निघतंय त्याला.. जरांगे साहेब म्हणतोय आता.. पहिल्यांदा नीट राहिला असतं तर जमलं नसतं का.. दिसतंय पण कसं.. रंग बदलणारा.. रंग्या.. गप्प मरायचं ना..’

हे वाचलं का?

‘मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, जरांगे-पाटील तुम्ही बोलू नका.. मी त्याला समज दिली.. मी गप्प बसलो म्हटलो म्हाताऱ्याला कशाला बोलायचं. मी चार दिवस काही बोललो का?’

‘मग काल… हळूच बारीक आवाजात बोलतो.. द्या त्यांना सगळंच.. बंगले बांधा त्यांच्यापाशी.. येडपट, बुजगावणं कुठचं.. माझी शाळा काढतो.. कसं केलं याला मंत्री.. महाराष्ट्राला कलंक आहे.. डबडं.. तू थांब एकदा.. आरक्षण मिळू दे मग तुला कचकाच दाखवतो.. तुझी खूप दिवसांपासून फडफड सुरू आहे.’ अशा शब्दात मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना आव्हान दिलं आहे.

ADVERTISEMENT

ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांचा विरोध आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं तर ओबीसींवर अन्याय होईल असं भुजबळांचं मत आहे. त्यामुळेच यासाठी ते सातत्याने जाहीर सभा घेऊन ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत आहे. याच मुद्द्यामुळे मनोज जरांगे हे सातत्याने भुजबळांवर हल्ला चढवत आहेत.

ADVERTISEMENT

बीडमधील इशारा सभेत देखील त्यांनी अशाच प्रकारे टीका केल्यानंतर आता छगन भुजबळ हे मनोज जरांगे यांना नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT