Lok Sabha 2024 Opinion Poll : भाजप, काँग्रेस की आप… कोण मारणार बाजी?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

If Congress and AAP fight together under INDIA Alliance, then we can do a clean sweep in the punjab.
If Congress and AAP fight together under INDIA Alliance, then we can do a clean sweep in the punjab.
social share
google news

lok sabha 2024 opinion poll : लोकसभा 2024 निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. यावेळी निवडणुकीचे वातावरण कसे आहे? लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील 13 जागाही महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पंजाबमधील राजकीय जाणकारांचे मत काय आहे आणि यावेळी पंजाबच्या राजकारणात कुणाच्या बाजूने वातावरण तयार होत आहे, तेच समजून घ्या…

ADVERTISEMENT

एबीपी न्यूज सी-व्होटर सर्वेक्षणात काँग्रेस आघाडीवर

एबीपी न्यूज सी-व्होटरच्या नुकत्याच झालेल्या ओपिनियन पोलबद्दल सांगायचं तर, काँग्रेसला पंजाबमध्ये 27 टक्के मतांसह जास्तीत जास्त 5 ते 7 जागा मिळू शकतात. तर आम आदमी पार्टी 25 टक्के मतांसह 4 ते 6 जागा जिंकू शकते.

16 टक्के मतांसह भाजपला शून्य ते 2 जागा मिळू शकतात. अकाली दलालाही शून्य ते 2 जागा मिळू शकतात आणि मतांची टक्केवारी 14 टक्के असू शकते. हा सर्व्हे महिनाभरापूर्वीचा असला तरी, आप आणि काँग्रेस हे दोघेही 13 जागांवर स्वतंत्रपणे लढू शकतील. पण हा ओपिनियन पोल घेण्यात आला तेव्हा असे अंदाज व्यक्त केले जात होते की काँग्रेस आणि आप एकत्र लढतील.

हे वाचलं का?

भगवंत मान यांनी पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याची केली घोषणा

अलिकडेच भगवंत मान यांनी मोठे विधान करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आम आदमी पार्टी पंजाबमधील सर्व 13 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. यावरून हे जवळपास स्पष्ट झाले आहे की, पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्व जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, परंतु या दोघांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास इंडिया आघाडीचे काय होईल हे सांगणे थोडे कठीण आहे.

the recent opinion poll of ABP News C-Voter, Congress can get maximum 5 to 7 seats in Punjab with 27 percent vote share.
लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील 13 जागाही महत्त्वाच्या आहेत.

पत्रकार कमलजीत संधू यांच्या निरीक्षणानुसार, ‘आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमधील अंतर्गत भांडण या निवडणुकीत इंडिया आघाडीला नुकसान पोहोचवू शकते.’

ADVERTISEMENT

2019 च्या निवडणुकीत काँग्रेस ठरला होता सर्वात मोठा पक्ष

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांबद्दल बोलायचे, तर पंजाबमध्ये 40.6 टक्के मतांसह काँग्रेसने 13 लोकसभा जागांपैकी सर्वाधिक 8 जागा जिंकल्या होत्या. तर भाजप आणि अकाली दलाला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 9.7 टक्के, तर अकाली दलाला 27.8 टक्के मते मिळाली होती. आम आदमी पक्षाला या निवडणुकीत 7.5 टक्के मतांसह एक जागा मिळाली होती.

ADVERTISEMENT

2022 च्या विधानसभा निवडणुकीत घोंगावले आपचे वादळ

पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राज्यातील 117 जागांपैकी सर्वाधिक 92 जागा मिळाल्या होत्या आणि त्यांची मते 42 टक्क्यांहून अधिक होती. या निवडणुकीत जागांच्या बाबतीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती.

काँग्रेसला 18 जागा मिळाल्या आणि मतांची टक्केवारी 22.98 टक्के होती. अकाली दलाला 18.38 टक्के मतांसह 3 जागा मिळाल्या, तर भाजपला केवळ 2 जागा जिंकता आल्या. एकूणच पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढले तर वेगळेच समीकरण तयार होताना दिसत आहे.

जर काँग्रेस-आप INDIA Alliance अंतर्गत एकत्र लढले तर भाजपचा राज्यातून सफाया होऊ शकतो. एकत्र लढण्यात अधिक फायदा आहे, असे राजकीय तज्ज्ञांचेही मत आहे. दुसरीकडे आप आणि काँग्रेस वेगवेगळी लढली तरी दोघांनाही जास्त जागा मिळतील, असा अंदाज आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT