Ajit Pawar Candidates List: अजितदादांचा मोठा डाव, NCP ची पहिली यादी आली समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

अजितदादांच्या NCP ची पहिली यादी आली समोर
अजितदादांच्या NCP ची पहिली यादी आली समोर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार यांच्या उमेदवारांची यादी

point

पहिल्या यादीत बड्या नेत्यांना संधी

point

कुणाला मिळाला डच्चू ?

Maharashtra Assembly Election 2024 NCP (Ajit Pawar) 1st Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आज पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने रविवारी पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षानेही पहिली यादी जाहीर करत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पहिल्या यादीत अजित पवारांनी 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

शरद पवारांपासून फारकत घेत भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांसाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत निर्णायक आहे. कारण या निवडणुकीत अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचं सर्वस्व पणाला लागलं आहे. अशावेळी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं मोठं आव्हान अजित पवारांसमोर आहे.

अजित पवारांचा मोठा डाव

दरम्यान, यादी जाहीर करताना अजित पवार यांनी एक मोठा डाव टाकला आहे. आतापर्यंत अजित पवार हे बारामतीमधून लढणार की नाहीत असा संभ्रम कायम होता. मात्र, आता तेच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं आता समोर आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mahayuti : अजित पवारांमुळेच महायुतीला धोका? काय आहे राजकीय अर्थ?

भाजपने पहिल्या यादीत 99 जागांवर उमेदवार घोषित केले. तर आता अजित पवारांनी देखील आपल्या पक्षाकडून 38 उमेदवांरांची नावं जाहीर केली आहेत. ज्यामध्ये अनेक विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये धनंजय मुंडे, आदिती तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ या सारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढविणार हे स्पष्ट आहे. अशावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना नेमक्या किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण आता भाजपशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही यादी जाहीर झाल्याने बरंचस चित्र स्पष्ट झालं आहे.

ADVERTISEMENT

पाहा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP (Ajit Pawar) 1st Candidates List)

 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>  Vidhan Sabha: ऐन मध्यरात्री महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीचा आकडा ठरला!

  1. अजित पवार- बारामती
  2. दीलिप वळसे पाटील- आंबेगाव
  3. सुलभा खोडके- अमरावती
  4. दत्ता भरणे- इंदापूर
  5. अण्णा बनसोडे-पिंपरी
  6. निर्मला विटेकर-पाथरी
  7. सुनील शेळके-मावळ
  8. छगन भुजबळ- येवला
  9. हसन मुश्रीफ-कागल
  10. माणिकराव कोकाटे- सिन्नर
  11. नरहरी झिरवळ - दिंडोरी
  12. धनंजय मुंडे - परळी
  13. दौलत दरोडा - शहापूर
  14. हिरामण खोसकर - इगतपुरी
  15. अनिल पाटील - अमळनेर
  16. संग्राम जगताप - अहमदनगर
  17. आदिती तटकरे - श्रीवर्धन
  18. संजय बनसोडे- उदगीर
  19.  बाबासाहेब पाटील - अहमदपूर
  20. दिलीप मोहिते-पाटील - खेड-आळंदी
  21. राजकुमार बडोले - अजुर्नी मोरगाव
  22. प्रकाश सोळंखे - माजलगाव
  23. मकरंद पाटील - वाई
  24. आशुतोष काळे - कोपरगाव
  25. इंद्रनील नाईक - पुसद
  26. भरत गावित - नवापूर
  27. नजीब मुल्ला - मुंब्रा-कळवा
  28. किरण लहामटे - अकोले
  29. शेखर निकम - चिपळूण
  30. यशवंत माने - मोहोळ
  31. राजेश पाटील - चंदगड
  32. हिरामण खोसकर - इगतपुरी
  33. राजू कारेमोरे - तुमसर
  34. चंद्रकांत नवघरे - वसमत
  35. नितीन पवार - कळवण
  36. धर्मराव बाबा आत्राम - अहेरी
  37. अतुल बेनके - जुन्नर
  38. चेतन तुपे - हडपसर

2109 मध्ये फडणवीसांसोबत शपथविधी आणि 2023 मध्ये बंड

2019 विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी अचानक देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. पण त्यांचं हे सरकार अवघे 72 तासच टिकलं होतं. ज्यानंतर ते पुन्हा महाविकास आघडीत आले आणि त्यातही त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं. 

दरम्यान, ठाकरेंचं सरकार कोसळल्यानंतर अजित पवार यांनी 2023 साली पुन्हा बंड केलं. पण यावेळचं त्यांचं बंड हे यशस्वी ठरलं. कारण त्यांच्यासोबत जवळजवळ 40 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. एवढंच नव्हे तर शिवसेनेप्रमाणेच अजित पवार यांनी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. जो दावा मान्य करत आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवारांना दिलं. 

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मोठं अपयश 

दरम्यान, भाजपसोबत गेल्यानंतरही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत राज्यात फारसा फायदा झाला नाही. कारण महायुतीमध्ये त्यांच्या पक्षाला केवळ 5 जागा देण्यात आल्या होत्या. ज्यापैकी केवळ एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला. खुद्द त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देखील बारामतीत पराभव स्वीकारावा लागला. 

असं असताना आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना कोणत्याही परिस्थितीत आपला परफॉर्मन्स हा सुधारावा लागणार आहे.


 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT