लाइव्ह

Breaking Maharashtra LIVE: भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू! कसा घडला अपघात?

मुंबई तक

Parbhani Violence News LIVE: राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यापासून विरोधकांकडून वारंवार EVM बद्दल शंका व्यक्त केली जात आहे. सोलापूरच्या मारकडवाडी गावातील ग्रामस्थांच्या बॅलेट पेपरवर मॉक पोल घेण्याच्या मागणीलाही त्यामुळेच विरोधकांनी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. तसंच दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार यावरही सर्वांचं लक्ष लागून आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
पुण्यातील कार अपघात (प्रतिकात्मक फोटो)
social share
google news

Maharashtra Politics | EVM Issue : राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीला मिळालेल्या पराभवानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. विरोधकांकडून वारंवार EVM बद्दल शंका व्यक्त केली जात आहे. सोलापूरच्या मारकडवाडी गावातील ग्रामस्थांच्या बॅलेट पेपरवर मॉक पोल घेण्याच्या मागणीलाही त्यामुळेच विरोधकांनी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. तसंच दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार यावरही सर्वांचं लक्ष लागून आहे. 



Manoj Jarange Beed : "तुमच्या आज्याची, बापांची चालत होती, पण आता...", सरपंचाच्या हत्येनंतर जरांगेंचा कुणाला इशारा?

विशेष अधिवेशन आणि राज्यातील सर्व ताज्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी वाचत राहा 'मुंबई Tak'
 

  • 09:32 PM • 11 Dec 2024

    शिंदेंचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांना पदावरून हटवलं! कोणाची लागली वर्णी?

    राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नव्यानं महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसला आहे. कारण शिंदे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागेवर म्हणजेच मुख्यमंत्री सहाय्यत निधी विभागाच्या प्रमुखपदी डॉ.रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांनीा उधाण आलं आहे. मंगेश चिवटे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रामेश्वर नाईक यांचं अभिनंदन केलं आहे. 

     

  • 09:29 PM • 11 Dec 2024

    Maharashtra News Live Update: बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने हादरला न्यायालयाच परिसर! काय घडलं?

    गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीशांच्या सुरक्षा बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेले पोलिस गार्ड उमाजी होळी वय 42 याने स्वतःच्या बंदुकीतून स्वतःच्या पोटात सहा गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर न्यायालय परिसरात मोठा गोंधळ उडाला. घटना घडताच तेथील पोलिसांनी तात्काळ त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. प्राथमिक माहितीनुसार  मानसिक तणावामुळे ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलीस विभाग आणि न्यायालय प्रशासनाने घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, न्यायालय परिसरातील नागरिक आणि कर्मचारी या घटनेने हादरून गेले आहेत.


     

  • 06:30 PM • 11 Dec 2024

    Maharashtra News Live Update: जीप-दुचाकीची जोरदार धडक; आईसह दोन मुलांना गमवावा लागला जीव

    सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे झालेल्या भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दुचाकी स्वार विशाल म्हारगुडे गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दुचाकी आणि प्रवासी जीपची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. या  अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. हा अपघात सांगलीच्या कवलापूरजवळ झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा व आईचा समावेश आहे.
     

  • 01:26 PM • 11 Dec 2024

    Maharashtra Politics Live Updates : परभणीमध्ये वातावरण पेटलं, जाळपोळ-दगडफेकीची घटना

    परभणीमध्ये संविधानाच्या विटंबणा केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आज परभणीमध्ये बंद पुकारण्यात आला होता. या बंददरम्यान आज काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आल्याचं समोर आलं आहे. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळत असून, पोलिसांकडून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. परभणी शहरातील काही भागांमध्ये आज अत्यंत तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून, वेगवेगळ्या पक्षांच्या राजकीय मंडळींकडून शांततेचं आवाहन करण्यात येत आहे. 

  • 12:13 PM • 11 Dec 2024

    Maharashtra Politics Live Updates : राज्यात महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का? बावनकुळे काय म्हणाले?

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात महाविकास आघाडीबद्दल एक सूचक वक्तव्य केलं आहे. बावनकुळे म्हणाले, महायुतीचा दणदणीत विजय आणि काँग्रेसच्या पराभवानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते अस्वस्थ आहेत. आणि विकासाच्या अजेंड्यावर ते आमच्यासोबत येऊ इच्छिणाऱ्यांचे आम्ही नेहमीच स्वागत करतो. काँग्रेस नेत्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे काँग्रेसने लक्ष दिले नाही. नेत्यांचं भविष्य काँग्रेसमध्ये भविष्य सुरक्षित नाही. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी आम्हाला भेटून त्यांच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त केली असं बावनकुळे म्हणाले आहेत. तसंच त्यांनी पुढे सांगितलं की,  "काँग्रेस नेत्यांना असं वाटतंय की, त्यांना त्यांच्याच पक्षाचा आणि नेत्यांचा पाठिंबा नाही, ते सभाही करत नाहीत." एकूणच बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसमध्ये खिंडार पडणार का असा सवाल उपस्थित होतोय. 

  • 11:27 AM • 11 Dec 2024

    Maharashtra Politics Live Updates : फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी?

    16 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी विधानसभा अधिवेशनापूर्वी म्हणजेच 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, मागील मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेली अनेक दिग्गजांची नावे खराब कामगिरी आणि वादग्रस्त कारकिर्दीमुळे यंदा नसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 7 जणांच्या नावावर फुली मारणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

  • 11:10 AM • 11 Dec 2024

    Maharashtra Politics Live Updates : अरविंद केजरीवाल, पवारांमध्ये बैठक, EVM बद्दल काय चर्चा?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी आणि गुरदीप सप्पल हे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आता इंडिया आघाडी EVM च्या मुद्द्यावर  सर्वोच्च न्यायालयात (SC) जाणार असल्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आहे. 

    शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी काल रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारांविरोधात  इंडिया आघाडी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

follow whatsapp